लहानपणी हस्तकलेसाठी बऱ्याचदा फेविकॉलचा वापर केला जातो. मोठ्या मंडळींना देखील अनेकवेळा फेविकॉलची गरज भासते. याचा वापर करून सहज एखादी गोष्ट चिकटवता येते. फेविकॉल वापरताना तो सहज बाटलीतून बाहेर येतो. फेविकॉल लावल्यास एखादी वस्तु चिकटते पण ज्या बाटलीमध्ये फेविकॉल असतो त्या बाटलीला तो का चिकटत नाही असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. यामागे काय कारण आहे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फेविकॉल किंवा गोंद कसे बनवले जाते?

फेविकॉल किंवा कोणत्याही प्रकारचे गोंद बनवताना त्यात पॉलिमर्स केमिकल वापरले जाते. पॉलिमर्स लांब चिकट स्ट्रॅण्ड असतात. फेविकॉल बनवताना अशा चिकट स्ट्रॅण्ड्सचा वापर केला जातो जे वस्तु खेचण्यास सक्षम असतील. ते बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यात पाणी मिसळले जाते. ज्यामुळे ते द्रव स्वरूपात उपलब्ध होते. पाण्यामुळे ते कधीही सुकत नाही. यामुळेच ते नेहमी द्रव स्वरुपात उपलब्ध असते.

आणखी वाचा: पिवळ्या रंगाच्या बोर्डवर का लिहिले जाते रेल्वे स्टेशनचे नाव? जाणून घ्या यामागचे कारण

फेविकॉलने वस्तु कशा चिकटतात?
जेव्हा फेविकॉल बॉटलमधुन बाहेर काढतो तेव्हा ते हवेच्या संपर्कात येते, यामुळे त्यातील पाण्याची वाफ होऊन ते निघून जाते आणि केवळ पॉलिमर्स उरतात. त्यामुळे पॉलिमर्स पुन्हा मुळ चिकट स्वरूपात येतात आणि वस्तु चिकटवण्यास त्याची मदत होते.

आणखी वाचा- SBI WhatsApp Banking: बँक बॅलन्स, मिनी स्टेटमेंट, पेन्शन स्लिप व्हॉटसअ‍ॅपवर मिळवा; जाणून घ्या सोप्या स्टेप्स

फेविकॉल ज्या बाटलीत असते त्या बाटलीला का चिकटत नाही?
फेविकॉल ज्या बाटलीत असतो ती बॉटल नेहमी बंद असते, जेव्हा वापरायची असेल तेव्हा त्याचे झाकण उघडून आपण ते पुन्हा बंद करतो. यामुळे फेविकॉलमध्ये असणाऱ्या पॉलिमर्सचा हवेशी संबंध येत नाही. त्यामुळे ते कायम द्रव (लिक्विड) स्वरूपात असते. त्यात असणाऱ्या पाण्यामुळेच ते बाटलीला चिकटत नाही. जर तुम्ही कधी फेविकॉलचे झाकण उघडे ठेवले तर त्यातील सर्व फेविकॉल सुकतो, असा अनुभव बऱ्याच जणांना आला असेल. कारण हवेच्या संपर्काने त्यातील पाण्याची वाफ होते. अशाप्रकारे द्रव स्वरूपात असल्याने, त्यात पाणी असल्याने फेविकॉल ज्या बाटलीत असतो त्या बाटलीला चिकटत नाही.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why does fevicol or glue does not stick to its container know scientific reason behind this pns
First published on: 12-01-2023 at 13:03 IST