Elephant Ivory : विशाल देह असणारा प्राणी म्हणून हत्तीला ओळखले जाते. हिंदू धर्मानुसार हत्तीला गणपतीचे रुप मानले जाते. हत्तीचे दात खूप महागडे असतात, असे आपण अनेकदा ऐकतो किंवा वाचतो; पण एखाद्या प्राण्याचे दात एवढे महाग असतात? आणि तेही सोन्यापेक्षाही महाग? आज आपण त्या विषयी सविस्तर जाणून घेऊया.

दागिने बनवले जातात

हत्तीच्या दातांचा उपयोग दागिने बनवण्यासाठी केला जातो. या दातांपासून कधी गळ्यातला हार, कधी कानातले; तर कधी बांगड्या बनवल्या जातात. महिलांकडून हत्तीच्या दातांपासून बनलेल्या दागिन्यांना विशेष मागणी असते. त्यामुळे हत्तीचे दात खूप महाग असतात.

हेही वाचा : भारतातील ‘या’ गावात लोक पायात कधीही चप्पल घालत नाही, कारण वाचाल तर थक्क व्हाल

ऐतिहासिक वारसा

पुरातन काळापासून हत्तीच्या दातापासून दागिने बनवले जातात. पूर्वी राजघराण्यात या दागिन्यांची विशेष मागणी असायची. हत्तीच्या दातांपासून बनविलेले दागिने काही विशेष संस्कृतीचे अविभाज्य घटक होते. त्यामुळे सोन्यापेक्षाही हे दात महागडे असतात. एवढंच काय तर हस्तिदंताला श्रीमंतीचं प्रतीकसुद्धा मानलं जातं.

धार्मिक महत्त्व

हिंदू धर्मानुसार हत्तीला गणपतीचे रुप मानले जाते. गणपतीच्या प्रतिमेत दात दिसतात. त्यामुळेच हिंदू लोक हत्तीला आणि हत्तीच्या दाताला खूप मानतात.

हेही वाचा : Gold Rate : काय सांगता! अमेरिकेत भारतापेक्षा खरंच सोने स्वस्त मिळतं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हत्तीच्या दातांची तस्करी

हत्तीच्या दातांची तस्करी करणे कायद्याने गुन्हा आहे. ‘वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२’ कलम ९ अंतर्गत हस्तिदंताचा बेकायदेशीर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई केली जाते.