General Knowledge : आपल्या आयुष्यात रंगाना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक रंगाला स्वत:ची एक ओळख आहे. तुम्ही जर काळजीपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की, कोणत्याही स्कुलबसचा रंग पिवळा असतो. पण, तुम्ही कधी विचार केला की शाळेच्या बसचा रंग का पिवळा का असतो? तुम्ही अनेकदा शाळेची बस बघितली असेल पण पिवळ्या रंगामागील कारण कधी शोधण्याचा प्रयत्न केला नसेल.
शाळेच्या बसला पिवळा रंग देण्यामागे एक खास कारण आहे. ते कारण कोणते? आज आपण या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

शाळेच्या बसचा रंग पिवळा का असतो?

लाल रंगाची वेवलेन्थ जास्त असते त्यामुळे लाल रंग दूरवरून लवकर दिसून येतो. त्यामुळे धोका टाळण्यासाठी लाल रंग वापरला जातो. वेवेलेन्थचा विचार केला तर लाल रंगाच्या खाली पिवळा रंग येतो. त्याची वेवलेन्थ लाल रंगापेक्षा कमी असते पण इतर रंगापेक्षा जास्त असते.
पाऊस, धुके किंवा दवबिंदू असो पिवळा रंग दुरवरुनही दिसतो. पिवळया रंगाची परिघीय दृष्टी लाल रंगापेक्षा जास्त असते.शाळेच्या बसचा अपघात होण्याचा धोका टाळावा, यासाठी शाळेच्या बसचा रंग पिवळा असतो. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून विचार करुन शाळेच्या बसला पिवळा रंग दिला आहे.

हेही वाचा : जिलेबी भारतात कशी आली? काय आहे सगळ्यांना आवडणाऱ्या जिलेबीचा इतिहास?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुप्रीम कोर्टाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार, “शाळेची बस पिवळ्या रंगाचे असावी याशिवाय या बसवर दोन्ही बाजूला आडवी हिरव्या रंगाची पट्टी असावी. बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूला ‘स्कुल बस’ लिहिणे गरजेचे आहे.
झेब्रा क्रॉसिंग किंवा रस्त्यावरील गावांची नावे किंवा सुचना सुद्धा पिवळ्या रंगामध्ये दिल्या जातात. रात्रीच्या अंधारात पिवळ्या रंग लवकर दिसून येतो.
चालकाला दुरवरुन स्टेशनचे नाव दिसावे, यासाठी रेल्वे स्टेशनचे नाव सुद्धा बोर्डवर पिवळ्या रंगांमध्ये लिहिले जातात.