Worlds Biggest Titanoboa Snake: : सर्वात मोठा साप म्हटलं की तुम्हाला नक्कीच वाटलं असेल, इथे अॅनाकोंडा सापाविषयी बोललं जात आहे. पण तुमचा अंदाज पूर्णपणे चुकीचा आहे. अॅनाकोंडा साप जगातील महाकाय सापांपैकी एक आहेत. कारण ते खूप लांब आणि विशाल असतात. हे साप बकरी किंवा हरणाला सहज गिळतात. पण तुम्हाला माहितेय, एका जमान्यात पृथ्वीवर अॅनाकोंडापेक्षाही कित्येक पटीने मोठे साप राहत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मगरीला सहज गिळतात हे साप

डायनोसोरच्या काळात टायटेनोबोआ नावाचे साप जमिनीवरील आतापर्यंतचे सर्वात मोठे साप म्हणून ओळखले जायचे. हे खूप महाकाय साप असायचे. याच कारणामुळं त्यांना ‘मॉन्स्टर’ स्नेक ही बोललं जातं. हा साप इतका विशाल होता की, एखाद्या मोठ्या मगरीलाही सहज गिळू शकत होता.

या नदीत आजही आढळू शकतात अशाप्रकारचे खतरनाक साप

डायनासोरच्या काळात सर्वा मोठे जीवजंतु ६.६ कोटी वर्षांपूर्वी जमिनीवर उल्कापिंड कोसळल्याने मारले गेले, असंही बोललं जातं. परंतु, २०१८ मध्ये अमेरिकेच्या काही शास्त्रज्ञांनी टायटेनोबोआ साप आजही जिवंत असल्याचा दावा केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. जगातील सर्वात मोठ्या अॅमेझॉन नदीत दैत्यरुपी जीव आजही राहत आहेत, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

नक्की वाचा – हा रेल्वे स्टेशन इतका मोठा आहे की, याला बांधण्यासाठी दररोज १० हजार माणसं एकत्र काम करत होते.

१५०० किलो वजनाचे साप

हा साप जवळपास ५० फूट लांब आणि ४ फूट रुंद असल्याचं बोललं जातं. टायटेनोबोआ सापाचं वजन जवळपास १५०० किलोपर्यंत असतं. २००९ मध्ये कोलंबियात खोदकाम सुरु असताना या सापांचे अनेक अवशेष मिळाले होते. यावर संशोधन केल्यानंतर असा अंदाज वर्तवण्यात आला होता की, ते साप जवळपास ४२ फूट लांब आणि त्यांचं वजन जवळपास ११०० किलो इतकं असू शकतं.

सापाला टायटेनोबोआ का म्हणतात?

या सापाचं नाव टायटेनोबोआ, टायटेनिक जहाजाच्या नावानुसार ठेवण्यात आलं आहे. कारण हा साप टायटेनिक जहाजासारखाच विशाल होता आणि प्राचिन काळातील सर्वात मोठा साप म्हणून ओळखला जायचा. टायटेनोबोआ साप आता जिवंत आहेत की नाही? याबाबत फक्त दावेच करण्यात येत आहेत. पण, अॅमेझॉन नदी आणि अॅमेझॉन जंगल इतका मोठा आहे की, यामध्ये त्यांचा शोध घेणं अशक्यच होईल.

मराठीतील सर्व FYI बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Worlds biggest snake can be found in amazon river according to scientist titanoboa snakes weight around 1500 kg nss
First published on: 24-02-2023 at 10:44 IST