निसर्गातील प्रत्येक पक्षाचे स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे. कोणताही पक्षी पाहिला की, सर्वात आधी जसे त्यांचे रंग आपल्या नजरेत भारतात तसेच त्यांची चोचही लक्ष वेधून घेते. चोच हा पक्षांचा मुख्य अवयव असतो. पक्षी त्यांच्या चोचीपासून अन्न गोळा करतात, स्वतःचे सुरक्षित घरटे बांधतात तर पिल्लांना भरवतात. त्यामुळे पक्षांचा हा अवयव त्यांच्यासाठी खूप उपयोगी ठरतो. पण, तुम्हाला हे माहिती आहे का, जगातील कोणत्या पक्ष्याची सर्वात लांब चोच आहे? नाही… तर आज आपण या लेखातून त्याबद्दल अधिक जाणून घेऊ.
डिस्कव्हर वाइल्डलाइफ वेबसाइटच्या वृत्तानुसार, जगात हमिंगबर्ड्सच्या ३५० प्रजाती आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, या पक्ष्याचा आकार खूपच लहान आहे. जगातील सर्वात लहान हमिंगबर्ड, ज्याला ‘बी हमिंगबर्ड’ असेही म्हणतात. पक्षाचा आकार ५ सेंटीमीटर आणि वजन ५ ग्रॅमपर्यंत आहे; तर सामान्य हमिंगबर्डचे वजन ४ ग्रॅम ते ५ ग्रॅमपर्यंत असू शकते. पण, हमिंगबर्ड्सच्या प्रजातींमधील या सगळ्यात लहान पक्षाची चोच त्याच्या शरीरापेक्षाही आणि खंजीरासारखी लांब आहे. कारण या पक्षाची चोच १२ सेमी लांबीपर्यंत पोहोचू शकते
हेही वाचा…पुण्यातील प्रसिद्ध ‘सारसबाग’ कोणी बांधली? पाहा काय आहे इतिहास…
स्वॉर्डबिल्ड हमिंगबर्ड्स दक्षिण अमेरिकेतील अँडियन प्रदेशात सुमारे १,७०० ते ३,५०० मीटर उंचीवर राहतात आणि हमिंगबर्डच्या प्रजातींपैकी हा एक त्यातलाच पक्षी आहे, ज्याची चोच सगळ्यात लांब आहे. हा एकमेव पक्षी आहे ज्याची चोच सुमारे १२ सेमी लांबीपर्यंत पोहोचू शकते; जी त्याच्या इतर शरीराच्या भागापेक्षा लांब आहे. हमिंगबर्डची (Swordbilled Hummingbird) ही लांबसडक चोच सर्वात लांब, पातळ फुलांमधून अमृत सहज मिळवू शकते. तसेच हा पक्षी एका सेकंदात १२ वेळा पंख फडफडवू शकतो. तर आज आपण या लेखातून कोणत्या पक्ष्याची सर्वात लांब चोच आहे हे जाणून घेतलं.