ड्रायिव्हग शिकणं हा एक भन्नाट अनुभव असतो. तुमचा ड्रायिव्हग शिकण्याचा अनुभव कसा होता, शिकल्यानंतर तुम्ही लाँग ड्राइव्हला कुठे गेलात, थोडक्यात तुमची ‘कार’कीर्द कशी घडली, याची माहिती तुम्ही ‘लोकसत्ता’कडे शेअर करायची.  मेल करा. ls.driveit@gmail.com

ये दिल मांगे मोअर
आपल्याला गाडी चालवता यावी असे प्रकर्षांने वाटत होते. आम्ही पहिली गाडी घेतली ती म्हणजे मारुती ’अल्टो’. छोटेखानी सुटसुटीत अशी ही गाडी नवशिक्यांसाठी फारच छान आहे. आधी माझे यजमान गाडी शिकले व ते लवकरच सफाईदारपणे गाडी चालवू लागले. त्यामुळे मलाही हुरूप आला व मी लगेच क्लास लावला. यापूर्वी मी कधीही गीअरची गाडी चालविलेली नव्हती. त्यामुळे क्लच-गीअर-ब्रेक हे नाते अंगवळणी पडण्यास फारच वेळ लागत होता. क्लासचे सर शांतपणे गाडी शिकवत असत. तिथे सराईतपणे चालवूनही घरच्या मदानावर (गाडीवर) मात्र काहीच प्रगती दिसत नव्हती. मनातून भीती वाटणे, गाडी सतत बंद पडणे, क्लच-गीअर गुळपीठ न जमणे, यजमानांचा ओरडा, मुलीची गोड कुरकुर (आईला अजूनही गाडी कशी येत नाही!) या सगळ्या अडथळ्यांमुळे रीतसर लायसन्स मिळवूनही मला ही शर्यत काही जिंकता येत नव्हती!जवळपास वर्षभराने पुन्हा मनाशी निर्धार करून गाडीला हात लावला. हळूहळू आत्मविश्वास वाढला. यू टर्न, राईट टर्न, गर्दीतून गाडी काढणे, पाìकगमधल्या अरुंद जागेत रिव्हर्स घेऊन गाडी लावणे सहज जमू लागले. आता आम्ही मारुतीचीच ‘फ्टि डिझायर’ ही गाडी घेतली. नवीन व मोठी गाडी म्हणून मनात धाकधूक होतीच, पण चालवायला घेताच तिच्याशी लगेच सूर जुळले! या गाडीचे सर्वच कंट्रोल उत्तम असल्याने या गाडीवर मी चांगलाच जम बसवला! पाहुण्यांना सोडणे-आणणे, शाळेत जाणे-येणे व इतरही कामांसाठी मी आता सराईतपणे गाडी चालविते. तरीही हा एक प्रसंग मात्र अगदी लक्षात राहणारा!आमच्या पाìकगची जागा अगदी जेमतेम व उताराची आहे. त्या दिवशी मी रिव्हर्स घेऊन गाडी लावली मात्र हँड ब्रेक लावायला विसरले. गाडीतून उतरून मागे वळताच मुलीच्या लक्षात आले की गाडी  उतारावरून हळूहळू पुढे जाते आहे! अरुंद जागा, गाडीने वेग घेतलेला, काय करावे सुचेना! गाडी समोरच्या िभतीवर जाऊन जोरात आदळणार असे दिसू लागले! तेवढय़ात प्रसंगावधान राखून आम्ही समोरचे दोन्ही दरवाजे उघडून हातांनीच गाडी थांबविण्याचा प्रयत्न करू लागलो. गाडी थांबली नाही, पण तिचा वेग कमी झाला. समोर जाऊन आदळायच्या आत गाडी जेमतेम थांबली व निष्कारण होणारी एक दुर्घटना टळली. असो.

What Bacchu Kadu Said?
अमरावतीतल्या मैदान राड्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मला अटक व्हावी म्हणून राणा दाम्पत्याने…”
satej patil
“बारक्यांनी नादाला लागू नका, कोणाला कधी चितपट करायचं…”, सतेज पाटलांचा महायुतीला इशारा; म्हणाले, “या चौकात काठी घेऊन…”
Manmohan Singh
अग्रलेख: बडबड बहरातील मौनी!
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?

गाडी चालवण्याची इच्छा तर पूर्ण झाली; पण म्हणतात ना ये दिल मांगे मोअर! अजूनही हायवे ड्रायिव्हगचा रोमांच अनुभवलेला नाही. त्यामुळे हायवे ड्रायिव्हग व तेही मुंबई-पुणे महामार्गावर ही सुप्त इच्छा मनात आहे! बघू या कधी संधी मिळते!

– रेणुका मुजुमदार,
नागपूर.