28 September 2020

News Flash

‘फिनिक्स’ भरारी..

दुचाकी बाजारात आताशा अनेकानेक मोटारसायकली, स्कूटर्स दाखल केल्या जात आहेत. अगदी १०० सीसीपासून ते २००-२५० सीसी ताकदीच्या दुचाकींचा हा जमाना आहे. १२५ सीसी इतक्या

| June 27, 2013 06:00 am

दुचाकी बाजारात आताशा अनेकानेक मोटारसायकली, स्कूटर्स दाखल केल्या जात आहेत. अगदी १०० सीसीपासून ते २००-२५० सीसी ताकदीच्या दुचाकींचा  हा जमाना आहे. १२५ सीसी इतक्या ताकदीच्या मोटारसायकली म्हणजे त्यातल्या त्यात आदर्श. यातही हीरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज या कंपन्यांनी बाजारात आणलेल्या मोटारसायकलींमुळे चांगलीच स्पर्धा निर्माण झाली आहे. या स्पर्धेतील एक कंपनी म्हणजे टीव्हीएस. टीव्हीएसने नुकतीच ‘फिनिक्स’ ही १२५ सीसीची मोटारसायकल बाजारात दाखल केली. या गाडीची टेस्ट ड्राइव्ह खास ‘लोकसत्ता’ला करायला देण्यात आली. या ड्राइव्हमध्ये जाणवलेली  ‘फिनिक्स’..

तांत्रिक तपशील..
इंजिन – १२५ सीसी
मॅक्सिमम पॉवर – १०.८ बीएचपी @ ७५०० आरपीएम
मॅक्सिमम टॉर्क – १०.८ एनएम @ ६००० आरपीएम
गीअर्स – फोर स्पीड
क्लच – वेट मल्टिपल
कूलिंग टाइप – एअर कूल्ड
उंची – १०६५ मिमी
लांबी – १९८५ मिमी
रुंदी – ७४० मिमी
वजन – ११४ किलोग्रॅम

या रंगांमध्ये उपलब्ध
मोरोक्कन रेड
अलास्कन ग्रीन
हेलसिंकी ब्लॅक सिल्व्हर
बेल्जियन ब्लॅक रेड
ऑक्सफर्ड ग्रे
स्वस्त किंवा मग किफायतशीर.. मायलेज जास्त.. पिक-अप चांगला आणि लूकही स्पोर्टी..

बाइक घेऊ इच्छिणाऱ्यांच्या एवढय़ाच तर साध्या (?) अपेक्षा असतात. या अपेक्षापूर्तीसाठी किती तरी मोटारसायकली उत्पादक कंपन्या ग्राहकांसमोर हात जोडून उभ्या असतात.. आहेत. यातील किती अपेक्षांची पूर्तता होते हा काही या ठिकाणचा चच्रेचा विषय नाही, तर या तीनही अपेक्षांची पूर्तता करू शकणारी बाइक टीव्हीएसने बाजारात आणली आहे आणि ती म्हणजे फिनिक्स १२५ सीसी.. तिचं एका शब्दात वर्णन करायचं म्हणजे ‘पिक अप’ फिनिक्स.. बस्स..
वजनाला हलकी, उंचीही फार नाही, चालवायला सोप्पी आणि विशेष म्हणजे या श्रेणीमधील मोटारसायकलीत फिनिक्सचा पिक-अप जबरदस्त.. म्हणजे तुम्ही हायवेवरून जात असाल तर बिनधास्त ताशी १०० किलोमीटर इतक्या वेगाने जरी मोटारसायकल चालविली तरी .. ती कुठे व्हॉबल होणार नाही की रस्ता सोडून तिरकी चालणार नाही.. शिवाय गाडीवरच्या सीटची व्यवस्था आदर्श.. म्हणजे मागच्या सीटवर बसलेली व्यक्ती चालकापेक्षाही उंच दिसणे किंवा स्पोर्टी बॅक सीटच्या नावाखाली त्रासदायक आसन वाटणे वगरे .. असले काही प्रकार फिनिक्समध्ये नाहीत. स्टाइलच्या नावाखाली दिली जाणारी आसनव्यवस्था त्रासदायी ठरू शकते, तो प्रकार जाणीवपूर्वीक टाळला गेला आहे. सर्वसामान्यांना वापरण्यासाठी सुलभ, किफायतशीर व वजनाने हलकी असणारी फिनिक्स लांबवरच्या प्रवासासाठीही सुरक्षित वाटते.  शिवाय पावसाळ्यात आपल्याकडच्या रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेऊन गाडीला शॉक अॅब्झॉर्बर्सही एवढे नेटके आहेत की, पाठीमागे बसणाऱ्याला खड्डय़ांचा जास्त त्रास जाणवणारच नाही. दुहेरी स्प्रिंग्ज वरखाली देण्यात आल्याने रस्त्यावरील खड्डय़ांपासून मागील सहप्रवाशाला बसणारे धक्के कमी होतात.त्याचप्रमाणे चांगला जाडजूड माणूसही या मागील आसनावर आरामात प्रवास करू शकेल, अशी सस्पेंशनची व्यवस्था करण्यात आल्याचे जाणवते.

मायलेज
वजनाने हलकी असली तरी एकंदर बॉडी दणकट आहे. टीव्हीएसच्या स्टार सिटीपेक्षा ही वजनाने हलकी करण्यात आल्याचे जाणवते. पण त्यामुळे मिळणारे मायलेज वाढले आहे.  विशेष करून शहरात तुम्हाला फिनिक्स प्रतिलिटर ५५ ते ६० किमीपर्यंतचा मायलेज देते, तर हायवेवर किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासात हेच मायलेज आणखी पाच किमीने वाढू शकतो. त्यामुळे लांबच्या प्रवासासाठीही ही गाडी उपयुक्त अशीच आहे.

इंजिन
टीव्हीएस फिनिक्स १२५ मध्ये मोने सििलडरसह १२४.५ सीसी इंजिनाचा वापर करण्यात आला आहे. एअर कूल्ड फोर स्ट्रोक इंजिन यात आहे.

सुलभ गीअर्स
चार गीअर्स असलेली फिनिक्स जशी हायवेवर चालवायला आदर्श आहे तशीच ती शहरातल्या गर्दीतून आणि वाहतूक कोंडीतून चालवायलाही आदर्श अशीच आहे. तुम्ही गर्दीच्या ठिकाणी अगदी दुसऱ्या गीअरवर गाडी चालवली तरी तिच्या फायिरगमध्ये बदल होत नाही की ती खडखड आवाज करत नाही किंवा तुम्हाला पहिल्या गीअरवर गाडी आणणे भाग पडत नाही. या मोटारसायकलीला मिळालेली ही १२५ सीसीची ताकद त्यामुळेच नक्कीच पुरेशी वाटते. गीयर्स टाकताना ते कठीण जाणवत नाहीत, सुलभपणे ते टाकता येतात. त्यामुळेच गीअर्स टाकण्यातील ही सुलभता  व सहजपणा हे या गाडीचे आणखी एक वैशिष्टय़.

ठळक वैशिष्टय़े
सुरक्षा कवच
गाडीच्या सीटखाली बऱ्यापकी स्टोअरेज स्पेस देण्यात आला आहे. तसेच मागे बसणाऱ्याला साडी गार्डही गाडीवर उपलब्ध आहे. चालकाच्या सुरक्षेसाठी फ्रण्ट लेग गार्ड आणि पासिंग बटन उपलब्ध करून देण्यात आले आहे.
ग्राऊंड क्लीअरन्स
गाडीचा ग्राऊंड क्लीअरन्सही चांगला आहे. त्यामुळे गतिरोधकावर वेग फारसा कमी नाही केला तरी चालू शकतो. याचा अर्थ असा नाही की गतिरोधकावरूनही गाडी सुसाट नेली तरी चालू शकेल.
हेडलाइट, टेललॅम्प, साइड लॅम्प यांसाठी एलईडी पायलट लॅम्प्सचा वापर करण्यात आला आहे. पेटल डिस्क ब्रेक, काळ्या रंगाचे अॅलॉय व्हील्स, डय़ुएल िस्प्रग सस्पेन्शन आदी या गाडीची ठळक वैशिष्टय़े आहेत. स्पीडोमीटर डिजिटल असून गाडीचे फायिरगही स्मूद आहे. त्यामुळे गाडी न्यूट्रलला उभी करून ठेवली असता इंजिनाचा फारसा आवाजही येत नाही. याशिवाय डिजिटल टेकोमीटर, ओडोमीटर आणि फ्यूएल गॉज हेही आहेतच. सíव्हस रिमाइंडर, डिजिटल घडय़ाळ आणि इतर डिजिटल इंडिकेटर्स हीही या गाडीची ठळक वैशिष्टय़े आहेत.
उणिवा
टीव्हीएसने गेल्या दोन वर्षांमध्ये मोटारसायकल व स्कूटर या उत्पादनांमध्ये आणलेल्या नवीन मॉडेल्समुळे मुंबई, ठाणे या शहरात आपले वेगळे स्थान प्राप्त केले आहे. मात्र असे असूनही सेवा केंद्रांची कमतरता व त्यासाठी असणारी एकसूत्र आकारणी नसल्याने देखभालीचा प्रश्न काही ठिकाणी नक्कीच जाणवतो. नव्या नव्या तंत्राच्या अवलंबनाने उत्पादनाला जरी गुण प्राप्त होत असले तरी त्या वाहनाची देखभाल नीटपणे झाली नाही तर उपयोग काय, यामुळेच चांगल्या उत्पादनाला देखभालीद्वारे नीट व अद्ययावत राखण्यासाठी अशी देखभाल केंद्रे पुरेशी हवीत, ती नाहीत, हा टीव्हीएसचा दोष म्हणावा लागतो.
उपलब्धता – डिस्क आणि ड्रम ब्रेक या दोन्ही प्रकारांत.
किंमत – ४९,९९० (एक्स शोरूम किंमत)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2013 6:00 am

Web Title: phoenix take off
Next Stories
1 देखणी सेदान
2 शर्यतीत यामाहा!
3 सुरक्षित चालक व्हायचंय?
Just Now!
X