dr01* होंडाच्या गाडय़ा चांगल्या आहेत काय? मला मित्रांनी सांगितले की, होंडाची सíव्हस चांगली नाही. मला अमेझ आणि मोबिलिओ खूप आवडतात. पण द्विधा मन:स्थितीत आहे.
– किशोर पोफळे
   dr03 *होंडाच्या अमेझ आणि मोबिलिओ या इंजिन आणि क्वालिटी या दोन्ही प्रकारांत उत्तम आहे. पण वजनाने थोडय़ा हलक्या असल्यामुळे पाच जण बसल्यावर त्या थोडय़ा खाली बसतात आणि टायर खड्डय़ांमध्ये गेल्यावर गार्डला थडकते. या दोन्हींच्या तुलनेत मारुती, शेवरोले, स्कोडा आणि टोयोटा या गाडय़ा उत्तम आहेत. पण होंडाच्या गाडय़ा वेल रिफाइन्ड असल्याने लोडसाठी बनवलेल्या नाहीत. एक किंवा तीन जणांसाठी या गाडय़ा उत्तम आहेत. मोबिलिओ ही प्रशस्त गाडी आहे पण उंचीने कमी असल्यामुळे तिसऱ्या सीटवर आरामशीर नाही वाटत. लेग रूम आणि हेड रूम कमी वाटतो.
* आगामी वर्षांत मला कार घ्यायची आहे. मला काहीही माहिती नाही कारविषयी. कोणती कार घेणे आíथकदृष्टय़ा परवडेल.
– रमेश गंगावणे, नाशिक
dr04* विचार करीत असाल तर मारुती अल्टो के१० घेणे जास्त सयुक्तिक ठरेल. कारण या गाडय़ा टिकाऊ आहेत आणि त्यांची रिसेल व्हॅल्यूही चांगली आहे. तुम्हाला विकावीशी वाटली तरी तुम्हाला ते सहज शक्य होते.
* तुमचा कॉलम मी रेग्युलर वाचते. मला गाडय़ांविषयी खूप आवड आहे. मात्र, कोणती घ्यावी, कशी घ्यावी, कोणती चांगली आहे, याविषयी काहीच माहिती नाही.
– तृप्ती शिर्के, सांगली
* धन्यवाद. गाडी घेताना नेहमी आपले बजेट, तिचा सुयोग्य वापर, किंमत, तिला बाजारात असलेली रिसेल व्हॅल्यू, तिचा मेन्टेनन्स, मायलेज, सíव्हस सेंटर्स यांचा प्राधान्याने विचार करावा. तुम्हाला तुमच्या गरजेनुसार गाडीप्रकार ठरवता येतो. म्हणजे तुमच्या कुटुंबाचा आकार चौकोनी असेल तर सेडान, हॅचबॅक या गाडय़ा चांगल्या असतात. मात्र, तुमच्या कुटुंबात सदस्यसंख्या जास्त असेल तर तुम्ही एसयूव्ही, एमयूव्हीचा विचार करावा. तुम्ही नवशिक्या असाल तर नक्कीच वॅगन आर ही गाडी घ्यावी, कारण तिची सीट हाइट उंच आहे, शिवाय समोरचेही स्पष्ट दिसते व गाडीची लांबी कमी असल्यामुळे टìनग रेडिअसही कमी आहे व चालवायलाही सोपी आहे.
* माझे बजेट चार ते पाच लाख रुपये असून मला किमान पाच ते सहा लोक आरामात बसू शकतील अशी गाडी घ्यायची आहे. पेट्रोल अथवा सीएनजीवर चालणारी, चांगली मायलेज देणारी, चांगले सस्पेन्शन असलेली, कमी मेन्टेनन्स असलेली किफायतशीर अशी सर्वगुणसंपन्न कार हवी आहे.
-निरंजन घाटपांडे
dr05* तुम्हाला चांगली सीएनजी कार हवी असेल तर तुमच्यासमोर ईको आणि वॅगन आर हे दोन उत्तम पर्याय आहेत. दोन्ही गाडय़ा तुमच्या बजेटमध्ये अगदी आरामात उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला पाच जण बसू शकतील आणि आरामदायी व चांगले सस्पेन्शन असलेली कार हवी असेल तर तुम्ही वॅगन आर ही गाडी घ्यावी. तुम्हाला सहा-सात लोकांसाठी गाडी हवी असेल तर मात्र ईकोच घ्या. परंतु ईको ही पॅसेंजर कार आहे आणि भार वाहून नेण्यासाठी तिचे सस्पेन्शन चांगले आहे. तुम्ही एक-दोघांनी ईकोने प्रवास केला तर खराब रस्त्यावर ती उधळेल. तेव्हा तुम्ही यापकी एकाची निवड करा. वॅगन आर सीएनजीचा मायलेज २४ किमीचा आहे, तर ईकोचा १९ आहे. तुम्हाला जर लोड वाहून नेणारी गाडी घ्यायची असेल तर ईकोच घ्या.
समीर ओक
या सदरासाठी तुमचे प्रश्न ls.driveit@gmail.com वर पाठवा.