होंडा कार्स मोटर इंडिया आवृत्ती असलेली सुधारित मोटार २५ नोव्हेंबरला बाजारात येत आहे. मध्यम आकाराच्या भारतातील सेडानसारखीच होंडा सिटी गाडी ही १९९६ पासून भारतात विक्रीस आहे. या गाडीने कंपनीसाठी ब्रँड तयार केले व किमतीला साजेशी गाडी ग्राहकांना दिली आहे. पेट्रोल किमतीमधील वाढीमुळे होंडा सिटी गाडय़ांच्या विक्रीवर काही काळ परिणाम झाला होता, पण आता पुन्हा स्थिती सुधारत आहे. आता जपानच्या होंडा सिटी कंपनीने त्यांच्या होंडा सिटी गाडीला नवे रूप देण्याचे ठरवले असून त्यात नवीन डिझेल इंजिनचा समावेश आहे. होंडा सिटी २०१४ ही गाडी नवीन जॅझ व फिट प्लॅटफॉर्मवर आधारित असून तिची रचना अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहे. होंडा सिटीला नवीन आवृत्तीत दोन इंजिन पर्याय असतील त्यात एक दीड लीटरचे आय-व्हीटेक व दुसरे अ‍ॅमेझ सेडानचे दीड लिटरचे आय डीटेक डिझेल इंजिन असे ते पर्याय आहेत. संपूर्णपणे अ‍ॅल्युमिनियमचे असलेले दीड लीटरचे हे डिझेल इंजिन असून त्यात काही बदल करण्यात आले आहेत. होंडाच्या इंजिनमधून येणारा आवाज व त्यामु़ळे गाडीची होणारी थरथर हे दोन प्रश्न होते त्यावरही मार्ग काढण्यात आला आहे. व्हीडीटीनंतर होंडा सिटी डिझेल गाडी १२० बीएचपी इतकी कमाल ऊर्जा निर्माण करू शकेल, एक्सायटिंग हाय डिझाइन हे
तत्त्व होंडा सिटीने अंगिकारले असून गाडीचे सौंदर्यही यात जपले आहे. यात पुढच्या बाजूला हेडलँपमध्ये प्रोजेक्टर लाइट वापरले असून मागच्या बाजूला एलईडी लँप वापरले आहेत. ह्य़ुंदाई वेरना, व्होक्सव्ॉगन पोलो व स्कोडा रॅपिड या गाडय़ांशी स्पर्धा करण्यात होंडा सिटीची सी प्लस वर्गातील ही गाडी आहे.
होंडा सिटी गाडीची किंमत पेट्रोल आवृत्तीसाठी ७ लाख तर डिझेल आवृत्तीसाठी ८ लाख रुपये असेल असा अंदाज आहे. २५ नोव्हेंबरला नवी दिल्ली येथे ही गाडी प्रदर्शित होत असून देशातील होंडा वितरकांनी ५०,००० नाममात्र रकमेवर बुकिंग सुरू केले आहे.