जगभरात मर्सिडिझ बेन्झच्या ‘सी एडिशन’च्या तब्बल एक कोटी गाडय़ांची विक्री झाली. १९८२ मध्ये बेबी बेन्झच्या स्थापनेनंतर प्रथमच जगभरात एक कोटी गाडय़ांची विक्री झाली आहे. या विक्रीचा उत्सव साजरा करण्यासाठी मर्सिडिझने खास भारतीय ग्राहकांसाठी ‘सी एडिशन’चे लाँचिंग केले आहे. केवळ ५०० गाडय़ाच विक्रीला असतील. चार सिलिंडर डिझेल इंजिन असलेली ही सी क्लास गाडी एन्ट्री लेव्हल लक्झरी सेडान सेगमेंटमधील सर्वाधिक खपाची गाडी आहे. हिची मुंबईतली किंमत ३९.१६ लाख असून ती एक्स-शोरुम आहे.