 सुधारित आवृत्ती निन्जा ३०० ही काही दिवसांपूर्वीच भारतात बाजारपेठेत उतरविण्यात आली. इतर तुल्यबळ दुचाकींची कट्टर स्पर्धा असताना ही दुचाकी ग्राहकांच्या कितपत पसंतीस उतरते हे काळच ठरवेल. स्पोर्ट्स बाइक्स निर्मितीत असणारी कट्टर स्पर्धा लक्षात घेता निन्जाचीच आधीची आवृत्ती निन्जा २५०आरमध्ये अनेक बदल करून व कित्येक बाबींमध्ये सुधारणा करून ही दुचाकी निर्मिलेली आहे, असा कंपनीचा दावा आहे.
सुधारित आवृत्ती निन्जा ३०० ही काही दिवसांपूर्वीच भारतात बाजारपेठेत उतरविण्यात आली. इतर तुल्यबळ दुचाकींची कट्टर स्पर्धा असताना ही दुचाकी ग्राहकांच्या कितपत पसंतीस उतरते हे काळच ठरवेल. स्पोर्ट्स बाइक्स निर्मितीत असणारी कट्टर स्पर्धा लक्षात घेता निन्जाचीच आधीची आवृत्ती निन्जा २५०आरमध्ये अनेक बदल करून व कित्येक बाबींमध्ये सुधारणा करून ही दुचाकी निर्मिलेली आहे, असा कंपनीचा दावा आहे.
निन्जा २५०आर व निन्जा ३००
 निन्जा ३००च्या काही बाबी अगदी ठळकपणे दिसून येतात. निन्जा ३००चे इंजिन हे इंजिन २५०आरच्या तुलनेत अधिक मोठे केले आहे. इंजिन क्षमता ही २४९ सीसी वरून २९६ सीसी इतकी वाढविण्यात आली आहे. हे बदल साध्य करण्याकरिता गाडीचा स्ट्रोक अधिक मोठा करण्यात आला आहे. याचबरोबर, २५०आर व ३०० या दोन दुचाकींची तुलना करायची झाल्यास निन्जा ३०० मध्ये इंजिन पॉवर ही ३३ PS  वरून ३९ PS  , तर टोर्क २२  NM वरून वाढवून २७   NM इतका करण्यात आला आहे. या सर्व बाबी विचारात घेता कावासाकी-बजाजने निन्जा ३००ची निर्मिती करताना चालकास ऊर्जेने परिपूर्ण सफर करता येईल याची खबरदारी घेतलेली दिसते. स्पोर्ट्स बाइकचे वजन कमीत कमी असणे केव्हाही अधिक योग्य. या बाबीचाच विचार करून निन्जा ३००मध्ये लोखंड अथवा पोलादऐवजी अॅल्युमिनियमचा अधिक प्रमाणात वापर करण्यात आला आहे. लोखंड व पोलादचा वापर कमीत कमी करण्यात आल्यामुळे गाडीचे वजन १७२ किलोग्राम इतके कमी ठेवण्यात कंपनीला यश आले आहे.
निन्जा ३००- एक दृष्टिक्षेप
गाडीला एकूण सहा गीअर्स आहेत. गाडीचे इंजिन अॅल्युमिनियम ब्लॉकचे बनले असून ते दोन सििलडरचे इंजिन आहे. प्रत्येक सििलडरला चार व्हॉल्व्ह आहेत. गाडीचा व्हीलबेस १४०५ मिमी. इतका ठेवण्यात आला असून इंधनक्षमता १७ लिटर्स इतकी आहे. निन्जाच्या आधीच्या मॉडेल्सपेक्षा निन्जा ३००चा जमिनीपासूनचा क्लिअरन्स अधिक ठेवण्यात आला आहे. मोठा व्हीलबेस व अधिकच्या ग्राऊंड क्लिअरन्समुळे चालकास नियंत्रण ठेवणे सोपे व अधिक सोयीचे आहे. त्याचबरोबर वळणदार रस्त्यांवरदेखील चालकास गाडीवर चांगले नियंत्रण ठेवता येते. निन्जा ३००चा डॅशबोर्डदेखील सर्व आवश्यक मीटर्सनी परिपूर्ण असून २ ट्रीप मीटर्स देण्यात आले आहेत. गाडीचा अधिकतम वेग हा १७० किमी. प्रति तास इतका असून निन्जा ३०० ० ते १०० किमी प्रति तासाचा वेग ८ सेकंदांहून कमी वेळात गाठते असा कंपनीचा दावा आहे. डय़ुअल थ्रोटल तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गाडीचा पिक-अप निन्जा २५०आरच्या तुलनेत काही प्रमाणात वाढला आहे. याचबरोबर अन्य काही बाबींमध्येदेखील चालकास सुधारणा जाणवेल. गाडीचे गीअर्स बदलण्यास अधिक सोपे व स्मूथ आहेत. निन्जा ३०० शहरी रस्त्यांवर २५ किमी. प्रति लिटर इतके मायलेज देईल असा कंपनीचा दावा आहे.
देखणे रूप
निन्जा ३००चे रूप देखणे बनविण्यात आले आहे. स्पोर्ट्स बाइकमध्ये दिसण्यात जी खुबी असणे गरजेचे आहे ती खुबी निन्जा ३०० मध्ये पुरेपूर उतरविण्यात आली आहे. बाजूने एक नजर टाकताच निन्जाच्या रूपातील गतिमानता जाणवून येते. तिच्या एकंदर रूपासोबत अलॉय व्हील्स फारसे उठून दिसत नसले, तरीदेखील एकंदर परिणाम चांगला साधला जातो.
निन्जा ३००- काही सुधारणा
ABS (Anti Lock Breaking System) हे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेले फीचर निन्जाच्या सर्व मॉडेल्समध्ये उपलब्ध नाही. या गाडीचे अत्यंत शक्तिशाली इंजिन, स्पोर्ट्स बाइक्स म्हणून तिचा होणारा वापर, गतिमान वेग या सर्व बाबी विचारात घेता सुरक्षिततेच्या दृष्टीने अइर असणे फार गरजेचे होते. निन्जा ३००चे मायलेज विचारात घेता तिचा दैनंदिन वापरासाठी उपयोग करणे तितकेसे सोयिस्कर नाही. जर मायलेज थोडे अधिक असते तर कदाचित तिचा स्पोर्ट्स बाइकच्या बरोबरीनेच रोजच्या वापराची बाइक म्हणून वापर करणेदेखील सोयीचे ठरले असते. निन्जा ३००ची दिल्ली शोरूम किंमत साडेतीन लाख इतकी असून काही वर्जन हे अजून महाग आहेत. ही किंमत प्रथमदर्शनी जरी अधिक वाटत असली तरी या श्रेणीतील सर्वसामान्य दुचाकींची किंमत पाहता ती योग्य आहे. पण ही किंमत अजून कमी राखण्यात जर यश आले असते तर कदाचित निन्जा ३००ला अधिक मोठय़ा ग्राहक वर्गाची पसंती मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निन्जा ३००- किती यशस्वी, किती अयशस्वी?
थोडक्यात, कावासाकी-बजाजने आजच्या तरुणाईला एक शक्तिशाली व वेगवान बाइक द्यायचा त्यांच्या परीने प्रयत्न केला आहे. ग्राहकासमोर बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असताना त्याला आपल्याकडे आकर्षति करणे खरेच फार कठीण आहे. इतर उत्पादकांच्या तुलनेत निन्जा ३००मध्ये काही अधिक गुण आहेत, तर काही गुण इतर गाडय़ांमध्ये आढळून येतात. अधिक शक्तिशाली इंजिन, चांगला पिक-अप, वापरण्यास सोपी इत्यादी बाबी निश्चितपणे निन्जा ३००च्या बाजूने आहेत. अइर, डिस्क ब्रेक्स, मायलेज, सुरक्षितता इत्यादी अनेक घटक प्रत्येकच दुचाकी निर्मिती करणारी कंपनी अधिकाधिक चांगल्या दर्जाचे पुरवीत आहे. या सर्व वाढत जाणाऱ्या गुणवत्तेच्या प्रवासात देखणेपणा, विक्रीनंतरची सेवा, गाडीचा दीर्घकाळ टिकाऊपणा व  दीर्घकाळासाठी तीच गुणवत्ता या गोष्टीदेखील फार महत्त्वाच्या आहेत. निन्जा ३०० या दीर्घकाळाच्या कसोटीवर किती खरी उतरते, हे काळच ठरवेल.
  संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2013 रोजी प्रकाशित  
 निन्जा ३००
ह्य़ोसंग, केटीएम, यामाहा इत्यादी दुचाकीनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाधिक इंजिन क्षमतेच्या बाइक्स बाजारात येऊ लागताच बजाज-कावासाकीने त्यांची ‘निन्जा’ ही दमदार दुचाकी बाजारपेठेत आणली. काहीसा संमिश्र प्रतिसाद मिळालेल्या याच बाइकमध्ये भर घालून याच निन्जाची अधिक शक्तिशाली,

  First published on:  25-04-2013 at 02:12 IST  
मराठीतील सर्व Drive इट बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ninja 
 
  
  
  
  
 