मनाचं जोवर न-मन झालेलं नाही, तोवर ‘नाहीं भवअभवभावना’ ही स्थिती साधणं शक्य नाही. नाथ सांगतात, माझ्या मनाचं न-मन झाल्यानं तुला नमन करीत आहे. या न-मनामुळे ‘भव’ म्हणजे काही असणं आणि ‘अभव’ म्हणजे काही नसणं, यो दोन्हींत काही फरकच वाटेनासा झाला. त्यामुळे  जे हवंसं वाटतं ते असण्याचा आनंद नाही किंवा जे नकोसं वाटतं ते असण्याचं दु:खं नाही आणि जे हवंसं वाटतं ते नसण्याचं दु:खंही नाही! ही पूर्ण स्वीकाराची स्थिती आहे. ‘जैशी स्थिती आहे तैशापरी राहे’ची स्थिती आहे. पण ही स्थिती सहजसाध्य आहे का हो? अर्थात नाही! या दोन्ही चरणांमधे वर्णिलेला आंतरिक घडवणुकीचा पल्ला फार मोठा आहे. तो सद्गुरूकृपेशिवाय आणि आधाराशिवाय शक्यच नाही. नाथांची ही आंतरिक जडणघडण कशी झाली आणि त्यानं त्यांची स्थिती काय झाली, हे आता तीन अभंगांच्या आधारे आपण पाहणार आहोत. त्यातले पहिले दोन अभंग जनार्दन स्वामींचे नाथांना बोधपर असे आहेत, तर तिसरा अभंग खुद्द नाथांचा आहे. नाथ जेव्हा जनार्दन स्वामींकडे गेले, तेव्हा स्वामींनी त्यांची अंतर्बाह्य़ घडण केली. यातला बोधपर असा पहिला अभंग अतिशय विख्यात आहे. हा अभंग असा :

देह शुद्ध करुनी भजनीं भजावें।

itching all over body but no rash sign of something serious illness
Health Special: अंगभर खाज येते व पुरळ कुठेच नाही… ‘ही’ असू शकते गंभीर आजाराची सुरुवात!
What Sanjay Raut Said?
संजय राऊत नवनीत राणांबाबतच्या विधानावर ठाम! “नाचीला ‘नाची’ नाही तर मग…?”
deepak kesarkar
माझ्या विरोधात गंभीर गुन्हा दाखल नाही! शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे स्पष्टीकरण
Personality Traits According to Zodiac Signs in Marathi
Personality Traits : प्रेमात पडण्यापूर्वी ‘या’ राशींचे लोक खूप वेळ घेतात; सहज प्रेमात पडत नाही

आणिकांचे नाठवावें दोषगुण।। १।।

साधनें समाधी नको या उपाधी।

सर्व समबुद्धी करी मन।। २।।

म्हणे जनार्दन घेई अनुताप।

सांडी पा संकल्प एकनाथा।। ३।।

साधनेच्या सुरुवातीस आसनशुद्धी आणि देहशुद्धीचे मंत्र म्हटले जातात. म्हणजे साधनेची जी बैठक आहे ती आणि ही साधना ज्या देहाद्वारे केली जाणार आहे तो देह या दोन्हींत पावित्र्याची भावना केली जाते. पण सद्गुरू या स्थूल देहापुरतं पाहात नाहीत! ते स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण देहापर्यंतचं अशुद्धीचं मूळ पाहतात आणि त्यावरचा उपाय सांगताहेत.. देह शुद्ध करूनी भजनीं भजावे! हा देह अगदी मूळापर्यंत कधी शुद्ध होईल? तर ‘भजनीं भजावे’ झालं तरच होईल. म्हणजे भजनात राहून भजन केलं पाहिजे! आता खरं ‘भजन’ किती विराट आहे, हे एकनाथी भागवतातच सांगितलं आहे आणि ते आपण ओघानं पाहणारच आहोत. पण या घडीला आपल्याला माहीत असलेल्या शब्दार्थानुसारचं भजन लक्षात घेऊ. तर आपण भजन करतो खरं, पण सर्व लक्ष त्या भजनाबाहेरच कलंडलं असतं. भजन देवाचं असतं, पण देहाच्या सुखात कधीच कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हाच त्या भजनामागचा सुप्त हेतू असतो. म्हणजे देवाच्या नावाखाली खरं तर देहाचंच भजन सुरू असतं. तेव्हा देहभान विसरून आणि देवभाव स्मरून भजन सुरू झालं पाहिजे. आपण तालासुरात भजन ‘गातो’. पण भजन हे गळ्यातून नव्हे, हृदयातून आलं पाहिजे. ते हृदयातून यायचं तर हृदयात आपल्या असहाय्यतेच्या भावनेनं आणि भगवंताच्या परम आधाराच्या जाणिवेनं त्या आधाराच्या प्राप्तीसाठीची तळमळ पाहिजे. मी कोण तुला आळवणारा? काय माझा अधिकार? तरी मला यावाचून दुसरं काही साधत नाही अन् सुचत नाही. तुझा धावा केल्याशिवाय राहवत नाही, या आर्ततेतून शब्दांचं बोट अनन्य भावानं घट्ट पकडून जे तळहृदयातून उसळून येतं ते खरं भजन. ते मन, चित्त आणि बुद्धीला शांतसात्त्विकतेचा स्पर्श केल्याशिवाय राहात नाही. अशा भजनात देवही तल्लीन होतो, मग देह का लीन होणार नाही?

– चैतन्य प्रेम