नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकच्या प्रचारसभेत लगावला. चौथ्या टप्प्याचे मतदान सोमवारी होते आहे. त्यामुळे प्रचार संध्याकाळी पाच वाजता संपला आहे. नाशिकमध्ये आज मुख्यमंत्र्यांची सभा झाली त्या सभेत मुख्यमंत्र्यांनी शरद पवार, छगन भुजबळ आणि राज ठाकरे यांच्यावर टीकेचे ताशेरे झाडले.

निवडणूक सध्या निर्णायक टप्प्यावर आहे. राष्ट्रवादीचे कॅप्टन असलेले शरद पवार यांनी मैदानात उतरण्याआधी मैदान सोडावं लागलं आहे. राष्ट्रवादीने इंजिन भाड्याने घेतलं आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे राज ठाकरेंचे दुकान बंद झाले म्हणूनच त्यांचा जळफळाट झाला असंही मुख्यमंत्री म्हटलं आहे.

आपल्याला ठाऊक आहेच की राज ठाकरेंनी दहा सभा घेऊन मोदी आणि अमित शाह यांना हटवा असं आवाहन केलं आहे. राज ठाकरेंनी त्यासाठी हरिसाल गाव डिजिटल कसं झालं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वप्नं दाखवूनही देशाला कसं फसवलं हे आणि यासंदर्भातले व्हिडिओ त्यांनी सादर केले. आता त्यांच्या या सगळ्या टीकेला यााधीही मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे. तसेच आज नाशिकमध्ये झालेल्या सभेत त्यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर निशाणा साधला.

नोटाबंदीच्या निर्णयावर काय म्हटले होते राज ठाकरे?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक झटका आला आणि त्यांनी देशाचे अर्थमंत्री, अर्थतज्ज्ञ यांच्यापैकी कुणालाही विश्वासात न घेता नोटाबंदीचा निर्णय घेऊन टाकला. त्यांच्या या निर्णयामुळे देशातले साडेचार कोटी लोक बेरोजगार झाले. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यावर ५० दिवसात परिस्थिती स्थिरस्थावर झाली नाही तर तुम्ही सांगाल त्या चौकात मी येईन तुम्हाला हवी ती शिक्षा तुम्ही मला द्या असं मोदी म्हटले होते आता मोदींनी सांगावं की कोणत्या चौकात यायचं आहे. नोटाबंदीचा निर्णय घेऊन मोदींनी काहीही साधलं नाही उलट देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आणली असाही टोला राज ठाकरेंनी लगावला होता.

आपल्या दहा सभांमधून झालेल्या भाषणांमध्ये राज ठाकरेंनी नोटाबंदी, जीएसटी आणि इतर निर्णयांवर कडाडून टीका केली होती. त्याच सगळ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.