मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मतदान यंत्रामध्ये गडबड होत असल्याचा विरोधकांकडून आरोप होत असतानाच, प्रत्यक्ष मतदानादरम्यान तशी अफवा पसरविणाऱ्यांविरोधात निवडणूक आयोगाने कारवाईचा बडगा उगारला आहे. मंगळवारी रावेर मतदारसंघात आपले मत दुसऱ्याच उमेदवाराला पडल्याचा कांगावा करणाऱ्या अमोल सुरवाडे या मतदाराविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या निवडणूक आयोगाने बहुजन वंचित आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही नोटीस बजावली आहे. मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान घेण्यास आक्षेप घेत विरोधकांनी देशभर रान उठविले आहे. मात्र मतदान यंत्रात कोणताही फेरफार करता येत नसल्याच्या मुद्दय़ावर निवडणूक आयोग मात्र ठाम असून मतदान यंत्रात फेरफार होत असल्याच्या अफवा परसरविणाऱ्या विरोधातच आयोगाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. आंबेडकरांचा खुलासा आल्यानंतर याबाबत पुढील कार्यवाही केली जाईल असेही या अधिकाऱ्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 25th Apr 2019 रोजी प्रकाशित
‘ईव्हीएम’ घोटाळ्याच्या आरोपावरून प्रकाश आंबेडकर यांनाही नोटीस
मतदान यंत्राच्या माध्यमातून मतदान घेण्यास आक्षेप घेत विरोधकांनी देशभर रान उठविले आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 25-04-2019 at 04:02 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ec notice to prakash ambedkar over evm scam allegation