30 September 2020

News Flash

पाक लष्कर प्रमुखांना मारलेल्या मिठया भारतीयांना आवडत नाहीत – कॅप्टन अमरिंदर

पाकिस्तानबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज सुनावले.

पाकिस्तानबद्दल सहानुभूती बाळगणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आज सुनावले. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांना मारलेल्या मिठया भारतीयांना विशेष करुन सैनिकांना अजिबात आवडत नाहीत असे कॅप्टन अमरिंदर म्हणाले.

सिद्धू यांनी केलेला निवडणूक प्रचार आणि त्यांच्या पाकिस्तानविषयीच्या भूमिकेबद्दल विचारले असता अमरिंदर सिंग यांनी हे उत्तर दिले. गुरदासपूरमधून अभिनेता सनी देओल आघाडीवर असून काँग्रेस उमेदवार सुनील जाखर पिछाडीवर आहेत त्याबद्दलही त्यांनी खेद व्यक्त केला.

सुनील जाखर चांगले उमेदवार आहे. त्यांनी गुरदासपूरमध्ये भरपूर काम केले आहे. लोक अनुभवापेक्षा कलाकारांना कसे प्राधान्य देतात ते मला अजून समजलेले नाही असे कॅप्टन अमरिंदर म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2019 5:25 pm

Web Title: indians will not tolerate hugging the pakistani army chief amarinder singh
Next Stories
1 जाणून घ्या पार्थ पवार यांच्या पराभवाची ६ कारणं….
2 अमोल कोल्हे विजयी, १५ वर्षानंतर शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीचा झेंडा
3 साक्षी महाराजांनी मोडला आपलाच विक्रम, चार लाख मतांनी विजयी
Just Now!
X