News Flash

आता विरोधकांचा पराभव किती मोठा असेल एवढेच ठरणार – पंतप्रधान मोदी

उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भाजपाचा विजय किती भव्य असेल आणि विरोधकांच्या पराभवाचे अंतर किती मोठे असेल एवढेच ठरणार आहे.

चार टप्प्याच्या मतदानानंतर विरोधकांचा पराभव निश्चित झाला आहे. आता उर्वरित तीन टप्प्यांमध्ये भाजपाचा विजय किती भव्य असेल आणि विरोधकांच्या पराभवाचे अंतर किती मोठे असेल एवढेच ठरणार आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुझफ्फरपूर येथील प्रचारसभेत म्हणाले. जे तुरुंगात आहेत, जे तुरुंगाच्या दरवाजावर आहेत, जे बेलवर आहेत, जे जामिनासाठी कोर्टामध्ये फेऱ्या मारत आहेत त्या सर्वांना एक मिनिटासाठीही केंद्रामध्ये मजबूत सरकार नको आहे असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

विरोधी पक्ष विजयासाठी निवडणूक लढवत नसून संपलेली ताकत अजून कमी करण्यासाठी ते निवडणूक लढत आहेत असे मोदी म्हणाले. त्यांना पुन्हा ताकत मिळाली तर बिहारमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे राज्य उरणार नाही. मुली घराबाहेर सुरक्षित राहणार नाहीत. अंधार पडल्यानंतर लोकांना घरात थांबावे लागेल असे मोदी म्हणाले.

आपल्या सरकारने गरीबी दूर करणारी धोरणे राबवतानाच प्रत्येक गरीबाच्या घरापर्यंत आम्ही वीज पोहोचवली असे मोदी म्हणाले. मोदींनी बिहारमध्ये एनडीएला निवडून देण्याचे आवाहन केले. भाजप, लोक जनशक्ती पार्टी आणि जेडीयू या तीन पक्षांपैकी तुम्ही कोणालाही मतदान केले तरी तुमचा पाठिंबा मोदींनाच असेल असे मोदी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 4:13 pm

Web Title: last three phases of polls will determine scale of opposition defeat pm modi
Next Stories
1 तुमच्या राजकीय भूमिकेत आम्हाला रस नाही, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना फटकारले
2 गदर इफेक्ट… सनी देओलला चाहत्यांनी भेट दिला हॅण्ड पंप
3 PNB Bank : पंजाब नॅशनल बँकेची ‘ही’ सेवा होणार आजपासून बंद!
Just Now!
X