News Flash

महाआघाडीच राहुल गांधींना मानत नाहीत पंतप्रधानपदाचा उमेदवार – नरेंद्र मोदी

या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी राहुल गांधींसह त्यांच्या मित्र पक्षांच्या नेत्यांवर टीका केली.

महाआघाडीच राहुल गांधींना मानत नाहीत पंतप्रधानपदाचा उमेदवार – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या प्रचारादरम्यान तामिळनाडूत आहेत. येथील एका सभेत त्यांनी काँग्रेसला पाठींबा देण्यावरुन द्रमुकवर निशाणा साधला. डीएमकेचे अध्यक्ष स्टॅलिन यांनी पंतप्रधानपदासाठी राहुल गांधीच्या नावाला पाठींबा दिला. मात्र, त्यांच्या या भुमिकेला आणि राहुल गांधींना महाआघाडीतील इतर पक्षांचा विरोध आहे. कारण, या आघाडीतील सर्वच जण पंतप्रधानपदाची स्वप्ने पाहत आहेत, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.


आपल्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिलयानवाला बाग हत्याकांडच्या शताब्दीवर्षानिमित्त श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोर तामिळनाडूतील दिग्गज आणि दिवंगत नेते एमजीआर आणि जयललिता यांनाही श्रद्धांजली अर्पण करताना त्यांनी म्हटले की, देशाला अशा नेत्यांवर गर्व आहे. ज्यांनी गरीबांसाठी काम केले.


दरम्यान, माजी केंद्रीय गृहमंत्री आणि अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचे नाव न घेता टीका करताना मोदी म्हणाले, वडील अर्थमंत्री होतात आणि मुलगा देशाला लुटतो, आम्ही सर्वजण या गोष्टीचे साक्षीदार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2019 1:07 pm

Web Title: mahamilawat does not believe rahul gandhi as pm candidate says narendra modi
Next Stories
1 जम्मू-काश्मीर : शोपियाँमध्ये चकमकीत दोन दहशतवादी ठार
2 मोदीजी, तुम्ही आमच्या राष्ट्रवादाला तर घाबरता; नवाब मलिकांचा पलटवार
3 पार्थसाठी उदयनराजे भोसले मैदानात; आज संध्याकाळी निगडीत जाहीर सभा
Just Now!
X