पाथरी येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांचा सवाल

लष्कराचे अधिकार काढून घेण्याची भाषा काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत हा जाहीरनामा काँग्रेसचा की जैश ए मोहम्मदचा आहे, असा प्रश्न पडतो. बालाकोटच्या हल्ल्यात अतिरेकी मारल्यानंतर फक्त दोघांनीच पुरावे मागितले त्यात पाकिस्तान आणि काँग्रेसचा समावेश आहे. पाकिस्तानसोबत काँग्रेसही आपल्या सन्याला हल्ल्याचा पुरावा मागणार, असे माहीत असते तर जे रॉकेट सोडले त्यासोबत काँग्रेसचा नेता बांधून सोडला असता, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

युतीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ फडणवीस यांची पाथरी येथे जाहीर सभा पार पडली. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर, उमेदवार संजय जाधव, आमदार मोहन फड, डॉ. राहुल पाटील, माजी आमदार विजय गव्हाणे, रामप्रसाद बोर्डीकर आदींसह शिवसेना-भाजपचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात अनेक लोकोपयोगी विकासकामे झाली असून पंतप्रधान नरेंद  मोदींच्या नेतृत्वाखाली आज देश सक्षम झालेला आहे.

देशविरोधी कारवाया करणाऱ्या शत्रूंना घरात घुसून मारण्याचे सामर्थ्य आजवर केवळ अमेरिका आणि इस्रायल देशांमध्ये होते. त्यात आता भारताचा समावेश झालेला आहे. आपल्या जवानांवर हल्ला झाल्यानंतर या हल्ल्याचा बदला घ्या असे पंतप्रधानांनी लष्कराला सांगितले.

त्यानुसार  रात्री साडेतीन वाजता बालाकोटमध्ये हल्ला झाला. भारताच्या लष्करात ही ताकद होती. मात्र, आजवर काँग्रेसच्या सरकारने त्यांना कधीही परवानगी दिली नाही, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

राहुल यांचे पणजोबा, आजी, वडील, आई सर्वच जणांनी गरिबी हटावची भाषा केली. मात्र गेल्या साठ वषार्ंत हे गरिबी हटवू शकले नाहीत. याउलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याचा निर्णय घेतला. शेतकऱ्यांना सहा हजार रुपये पेन्शन देण्याचा निर्णय घेतला. आधीच्या सरकारसारखा गरव्यवहार न करता पसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे काम या सरकारने केले असेही मुख्यमंत्री म्हणाले.