भारत हा एक महान देश आहे. मात्र सध्या हा देश अहिरावण-महिरावण म्हणजेच मोदी आणि अमित शाह यांच्या मुठीत सापडला आहे. या दोघांना कसे हाकलायचे हा भाजपालाही पडलेला प्रश्न आहे अशी खरमरीत टीका ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केली आहे. आपला देश दोन महाभक्तांच्या मुठीत सापडला आहे. हे दोघेजण म्हणजे अहिरावण महिरावण आहेत. ज्यातले एक मोदी आणि दुसरे अमित शाह आहेत असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडमध्ये साहित्य, कला, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा रंगला होता. त्यावेळी रामदास फुटाणेंनी हे मत व्यक्त केले.

यावेळी रामदास फुटाणे, सचिन इटकर, मेघराजे भोसले,तुकाराम पाटील, राज अहिरराव, सविता इंगळे, सुरेश कंक, राजेंद्र घावटे, संतोष रासणे, नंदकुमार मुर्डे, चंद्रकांत नगरकर, प्रशांत साळवी, शिवा बागुल, दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.

पहा व्हिडिओ

जेष्ठ साहित्यिक फुटाणे म्हणाले, हा देश दोन महाभक्तांच्या मुठीत चाललेला आहे. भाजपाच्या ताब्यात असता तर काही वाटलं नसतं. वाटलं असतं ठीक आहे भाजपाचे राज्य आहे, पण राज्य भाजपाचे सुद्धा नाही. या देशावर अहिरावण आणि महिरावण जे दिल्लीत बसलेले आहेत, एक अमित शहा आणि दुसरा मोदी हे अहिरावण आणि महिरावण कसे हकलायचे हा प्रश्न देशालाच नाही तर भाजपालाही पडला आहे, तुमचं आमचं सोडाच असा घणाघात फुटाणे यांनी केला. या अहिरावण महिरावण यांना हाकलण्याची मोठी जबाबदारी साहित्यिकांची आहे असंही फुटाणे यांनी म्हटलं आहे. नंतर काँग्रेसचे राज्य आले तरी त्यांना झोडपून काढू. शेवटी ते म्हणाले की, कवी रंग शोधत राहतील विसंगती शोधत राहतील.