News Flash

राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसमध्येच राहणार; सुजय विखेंचे स्पष्टीकरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगरमध्ये सभा घेणार आहेत. याच सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती.

राधाकृष्ण विखे पाटील (छायाचित्र-गणेश शिर्सेकर)

काँग्रेसचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र, या चर्चेला आता खुद्द त्यांच्या मुलानेच पूर्णविराम दिला आहे. विखे-पाटील हे काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे सुजय विखे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

वडील काँग्रेसमध्ये असताना मी भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे. ही वैयक्तिक बाब आणि निवडणूक आहे. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सुजय विखे यांनी म्हटले आहे.

भाजपाचे उमेदवार सुजय विखे-पाटील यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अहमदनगरमध्ये सभा घेणार आहेत. याची जय्यत तयारीही करण्यात आली आहे. याच सभेत राधाकृष्ण विखे-पाटील भाजपात प्रवेश करतील अशी चर्चा होती. मात्र, आता ही केवळ अफवाच ठरली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 10:22 am

Web Title: radhakrishna vikhe patil will remain in congress explanation of sujay vikhe
Next Stories
1 मॉर्निंग बुलेटिन : पाच महत्त्वाच्या बातम्या
2 भारताची लोकसंख्या पोहोचली १३६ कोटींवर; वाढीचा दर चीनपेक्षा दुप्पट
3 मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनला अल्टिमेटम
Just Now!
X