01 March 2021

News Flash

‘बोटावरील मतदानाची शाई काढायची कशी?’; गुगल सर्च करण्याचे भारतातील प्रमाण वाढले

आज सकाळपासूनच नेटकरी करतायत शाई काढण्यासंदर्भातील सर्च

गुगल सर्चचे प्रमाण वाढले

देशभरात आजपासून १७ व्या लोकसभेसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. सात टप्प्यांमध्ये होणारा या मतदानामधील पहिल्या टप्प्यात आज देशभरातील ९१ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. अनेक ठिकाणी मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा दिसून येत आहेत. पहिल्या टप्प्यामधील मतदानामध्ये महाराष्ट्रातील सात लोकसभा मतदारसंघामध्येही मतदान होत आहे. मात्र आज मतदानाच्या पहिल्याच दिवशी मतदान केल्यानंतर लावली जाणारी शाई कशी काढावी यासंदर्भातील गुगल वरील सर्च करण्याचे प्रमाण वाढल्याचे गुगल ट्रेण्ड्समध्ये दिसत आहे.

गुगल ट्रेण्डसवरील माहितीनुसार ९ एप्रिलपासूनच ‘How to remove vote ink’ या टर्मच्या सर्चचे प्रमाण वाढले आहे. त्यातही आज पहाटे साडेचार वाजल्यापासूनच मतदान केल्यानंतर बोटावरील शाई कशी काढावी यासंदर्भात भारतातून होणाऱ्या सर्चच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. आज सकाळी दहा वाजल्यापासूनच भारतीयांनी मोठ्या प्रमाणात ‘How to remove vote ink’ सर्च करण्यास सरुवात केल्याचे गुगल ट्रेण्डसवर दिसत आहे. सकाळी दहा ते बारा या दोन तासांमध्ये मोठ्याप्रमाणात यासंदर्भातील गुगल सर्च झाले असले तरी दुपारनंतर अचानक हे प्रमाण वाढल्याचे या आलेखामध्ये दिसत आहे.

                                                                 सकाळपासून सर्चचे प्रमाण वाढले

बोटांवरील शाई कशी काढावी यासंदर्भात सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये दक्षिणेतील राज्ये आघाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. आंध्रप्रदेश, तेलंगण, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये शाई काढण्यासंदर्भात गुगल सर्च करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

कोणत्या राज्यातून सर्वाधिक सर्च झाले

दक्षिणेतील राज्यांमध्ये शाई काढण्यासंदर्भातील सर्चमध्ये वाढ होण्यामागील प्रमुख कारण म्हणजे आज पहिल्या टप्प्यामध्ये आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील सर्व लोकसभा जागांवर मतदान होत आहे. बोगस मतदान होऊ नये यासाठी निवडणूक आयोगाने अनेक उपाय योजना केल्या असल्या तरी मतदारांना हातावरील शाई काढण्याची घाई लागल्याचे चित्र सध्या तरी गुगल ट्रेण्डमधून समोर येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2019 2:23 pm

Web Title: search for how to remove vote ink surges on google
Next Stories
1 पाकिस्तानला पत्रकारांना बालाकोटमध्ये घेऊन जायला दीड महिना का लागला ?
2 नितीन गडकरींच्या नावापुढे ‘रिजेक्टेड’ चा शिक्का
3 कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दोन स्थानिक नेत्यांचा मृत्यू
Just Now!
X