देशात भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. भाजपाने ३०३ तर एनडीएने ३५० च्या वर जागा जिंकल्या आहेत. अशात भारताला एका चांगल्या आणि वैचारिकदृष्ट्या ठाम असलेल्या विरोधी पक्षाचीही गरज आहे. मात्र सध्या जो विरोधी पक्ष आहे तो भ्रष्टाचारी आणि मूर्ख आहे अशी टीका भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे. यासंदर्भातला एक ट्विट करून त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्याला ठाऊक आहेच की काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीमध्ये दारूण पराभव झाला. या पराभवानंतर काँग्रेसवर टीका होता दिसते आहे. काँग्रेस पक्षातले दिग्गज नेतेही राहुल गांधी यांनाच या पराभवासाठी जबाबदार धरत आहेत. राहुल गांधी यांनी नकारात्मक प्रचार केल्यामुळेच काँग्रेस अपयश आलं अशी तक्रार आता काँग्रेसचेच ज्येष्ठ नेते करत आहेत. अशात सुब्रमण्यम स्वामी यांनी एक ट्विट करून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचारी आणि मूर्ख असल्याची टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.

काय म्हटलं आहे ट्विटमध्ये?

भाजपाचा अभूतपूर्व विजय झालेला आहे. अशात मला असं वाटतं की देशाला एका चांगल्या, स्वच्छ प्रतिमा असलेल्या, बुद्धीमान विरोधी पक्षाची आवश्यकता आहे. यामुळेच लोकशाहीचा आदर राखला जाईल असं मला वाटतं, मात्र सध्याचा विरोधी पक्ष भ्रष्टाचाराने बरबटलेला आणि मूर्ख आहे या आशयाचं ट्विट स्वामी यांनी केलं आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेली टीका काँग्रेसला चांगलीच झोंबली असणार यात शंका नाही. मात्र या टीकेला अद्याप तरी काँग्रेसने काहीही उत्तर दिलेले नाही. देशात अशी परिस्थिती निर्माण होईल हे निकालाच्या आधी विरोधकांपैकी एकाही दिग्गजाला वाटलं नव्हतं. मात्र या निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ झाला. काँग्रेसची देशातली, महाराष्ट्रातली अवस्था वाईट आहे. राहुल गांधी यांनी मोदींविरोधात केलेला प्रचार कामी आला नाही हेच दिसून आलं. आता येत्या काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. अशात आता सुब्रमण्यम स्वामी यांनी विरोधकांवर आणि विशेषतः काँग्रेसवर निशाणा साधत ट्विट केला आहे.