लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. १९ एप्रिल ते १ जून अशा सात टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रात पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. हा सगळा कार्यक्रम आज मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी जाहीर केला. ज्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक पोस्ट केली आहे. जी चांगलीच चर्चेत आली. त्यांनी एक महत्त्वाचा विश्वास व्यक्त केला आहे.

लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं

देशात लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून केंद्रीय निवडणूक आयोगाने सात टप्प्यातील निवडणूक कार्यक्रम आज जाहीर केला. त्यानुसार १९ एप्रिलपासून देशात लोकसभा निवडणूक होणार असून ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. तर, महाराष्ट्रातही ५ टप्प्यांत निवडणूक होणार आहे. यंदा १८ व्या लोकसभेसाठी निवडणूक होत आहे.

४ जून रोजी निकाल

२०१९ साली स्थापन झालेल्या मोदी सरकारचा कार्यकाळ ६ जून रोजी संपुष्टात येणार आहे. त्यामुळे देशात लोकसभेच्या निवडणुका घेण्यात येत आहे. त्यानुसार, १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात होणार असून १ जून रोजी सात टप्पे संपणार आहेत. तर ४ जून रोजी निकाल लागणार आहे. या सगळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी एक्स या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट केली आहे जी चर्चेत आहे. त्यांनी ४०० पारचा विश्वास पु्न्हा एकदा व्यक्त केला आहे.

हे पण वाचा- लोकसभेच्या निवडणुका जाहीर होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी तर…”

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट?

लोकशाहीतील सर्वात मोठा महोत्सव जाहीर
4 जून 2024 ला 400 पार !

And Festival of Democracy declared.. !
400+ on 4th June 2024

लोकतंत्र का सबसे बड़ा त्योहार घोषित !
4 जून 2024 को 400 पार !

मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषांमध्ये X या सोशल मीडिया हँडलवर देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट लिहिली आहे. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काही वेळाने त्यांनी ही पोस्ट केली आहे.