भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या आमदार के. कविता या मागच्या वर्षी दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी चर्चेत आल्या होत्या. यावर्षी मार्च महिन्यात के. कविता यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकासाठी एक दिवसाचे उपोषण केले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत के. कविता यांचा निझामाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून पराभव झाला होता, त्यानंतर यावेळी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीत (३० नोव्हेंबर रोजी मतदान) त्या उतरलेल्या नाहीत. मतदानाला काही दिवस उरले असताना द इंडियन एक्स्प्रेसच्या प्रतिनिधी विधात्री राव यांनी के. कविता यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. बीआरएस सरकारच्या कल्याणकारी योजना, त्यांच्या पक्षावर झालेले आरोप आणि काँग्रेससह इतर विरोधी पक्षांबाबत त्यांचे मत या मुलाखतीमध्ये त्यांनी व्यक्त केले.

प्रश्न : तेलंगणामध्ये चुरशीची लढत दिसते. काँग्रेसला मतदान करू नका, असे आवाहन तुम्ही का करत आहात?

rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
dhairyasheel mohite patil marathi news
मोहिते-पाटील यांच्या बंडामुळे माढ्यातील राजकीय समीकरणे बदलली
congress chief jitu patwari on bjp
“भाजपा काँग्रेस कार्यकर्त्यांना त्रास देत आहे, म्हणून…”, काँग्रेस खासदाराचा भाजपावर गंभीर आरोप
hema malini and yogi
‘काँग्रेसचे मानसिक संतुलन ढळले’; हेमा मालिनी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह विधानांनंतर भाजपची टीका

२०१८ सालीदेखील अनेक सर्व्हेंनी काँग्रेस पुढे असल्याचे सांगितले होते, पण शेवटी निकाल बीआरएसच्या बाजूनेच लागले. काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष (ए. रेवंथ रेड्डी) सांगतात की, शेतकऱ्यांना तीन तास वीज पुरवठा पुरेसा आहे; तर माजी प्रदेशाध्यक्ष (उत्तम कुमार रेड्डी) म्हणाले होते की, रायथू बंधू योजनेला सरकारी पैशांचा अपव्यव आहे. काँग्रेस नेत्यांचा उद्दामपणा आणि बेजबाबदार विचार जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला. काँग्रेसने मागच्या ५० वर्षांत जे केले नाही, ते आम्ही १० वर्षांत करून दाखविले.

प्रश्न : काँग्रेसच्या जाहीरनाम्यातून बीआरएसच्या योजनांना आव्हान दिले आहे, याकडे कसे पाहता?

नक्कल ही मूळ कल्पनेसारखी असू शकत नाही. पिकासोच्या चित्रांची नक्कल कुणीही करू शकणार नाही. जो मुहूर्तमेढ रोवतो, तो खरा लाभार्थी ठरतो. बीआरएसने सुरू केलेल्या योजनांचा लाभ आमच्याच पक्षाला मिळाला. या योजना आमच्या नेत्यांच्या डोक्यातून प्रसवल्या. शेतकऱ्यांना कसे प्रोत्साहन द्यावे, याची कुणालाही कल्पना नव्हती. आमच्या रायथू बंधू या क्रांतिकारी योजनेमुळे देशालाही चकित केले. शाश्वत कृषी विकास कसा करावा, हे या योजनेने दाखवून दिले. इतर राज्यानींही या योजनेचा स्वीकार केला. ओडिशामध्ये कालिया (KALIA) उपक्रम हाती घेतला. त्यानंतर पीएम किसान सन्मान योजनाही केंद्राकडून घोषित झाली.

आम्ही जे बोलतो, ते करतो. जिथे विश्वासार्हतेचा प्रश्न येतो, तिथे काँग्रेस कुचकामी ठरते. याउलट जनतेचा आम्हाला उदंड असा प्रतिसाद लाभतो.

प्रश्न : दहा वर्ष सत्ता भोगल्यानंतर निर्माण झालेल्या अँटी-इन्कम्बन्सीचे काय? तुम्ही विद्यमान १० आमदारांचे तिकीट कापले.

ही आमच्या सरकारची आणि पक्षप्रमुखांची ताकद आहे. त्यांच्या (मुख्यमंत्री केसीआर) सहकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट असे काम केले. त्यामुळे आमदारांना वगळण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती. कोणत्याही भ्रष्टाचाराशिवाय आम्ही आमच्या मोठ्या योजना उत्तम पद्धतीने कार्यान्वित केल्या.

प्रश्न : दलित बंधू योजनेअंतर्गत दलित कुटुंबीयांना दहा लाखांची मदत करण्यात येते. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आमदारांनी कमिशन घेतले असल्याचा आरोप होत आहे?

आतापर्यंत या योजनेची केवळ चाचणी सुरू आहे. सुरुवातीला आम्ही प्रत्येक मतदारसंघातून फक्त १०० लाभार्थी निवडले. त्यानंतर ही संख्या ३०० वर नेण्यात आली. या पैशांतून दलित कुटुंबाला कोणता व्यवसाय सुरू करता येईल आणि त्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण दिले जावे, याचा विचार सरकारी पातळीवर केला जातो.

ही एक लवचिक योजना आहे. या पैशांतून त्या कुटुंबाने काय करायचे हा सर्वस्वी निर्णय त्या कुटुंबाचा आहे. दलित कुटुंबीयांना उद्ममशील योजना आणि मार्केटिंग करण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी खुद्द जिल्हा दंडाधिकारी लक्ष घालतात. ही मोठी रक्कम असल्यामुळे यात भ्रष्टाचार होण्याची आम्हाला चिंता आहेच. योजनेची अंमलबजावणी करत असताना नक्कीच एक-दोन चुकीचे प्रसंग घडले असतील, पण योजना पुढे नेत असताना आम्ही या समस्या सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे.

प्रश्न : विरोधी पक्षाने मिशन भगीरथ, कालेश्वरममध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे, तसेच दिल्ली मद्य घोटाळ्यात तुमच्या सहभागाबाबतची चर्चा झाली.

जर तेलंगणात भ्रष्टाचार झाला असता तर आज आम्ही प्रत्येक घराला नळाद्वारे पिण्याच्या पाण्याची जोडणी देऊ शकलो नसतो. कालेश्वरम येथे ७३ लाख एकर क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा जगातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प बांधू शकलो नसतो. शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रयत्न करण्यासाठी आम्ही पैसे खर्च केले आहेत.

प्रश्न : मद्य घोटाळ्याबाबत काय सांगाल?

माझा त्यात कोणताही सहभाग नव्हता. त्यांनी माझ्यावर भरमसाट आरोप केले आणि ते आरोप खोटे असल्याचे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावरच टाकली. पण, या विरोधात आमचा लढा सुरू आहे. आम्ही केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराबाबत बोलत राहू.

प्रश्न : राज्यातील दलित समाजाचे उपवर्गीकरण करण्याचे आश्वासन देऊन भाजपाने त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे?

हा या शतकातला सर्वात मोठा विनोद आहे. भाजपाचा डीएनए दलित विरोधी आहे. २०१४ रोजी आमचे पहिले विधानसभा अधिवेशन झाले, तेव्हाच आम्ही अनुसूचित जातींच्या आरक्षणात उपवर्गीकरण करण्याची मागणी केलेली होती. जर ते प्रामाणिक असतील तर ते त्याची अंमलबजावणी करतील. ज्याप्रकारे त्यांनी महिला आरक्षणाच्या विधेयकाबाबत प्रयत्न केले, त्याप्रकारे हे देखील पुढच्या तारखेचा धनादेश दिल्यासारखे आहे. खरेतर मदिगा समाज संतप्त आहे, त्यामुळे असे आश्वासन देऊन भाजपाला कोणताही लाभ होणार नाही.

प्रश्न : खम्मम (१० मतदारसंघ) आणि नालगोंडा (१२ मतदारसंघ) या दोन्ही प्रांतात काँग्रेस बळकट असल्याचे बोलले जाते?

काँग्रेसने कधीही आश्वासने पाळलेली नाहीत, अशी तेलंगणातील जनतेची समज आहे. काँग्रेसने नेहमीच सामान्य नागरिकांना दगा दिला आहे. तेलंगणा राज्याच्या निर्मितीवेळीही काँग्रेसची मानसिकता हीच होती. ज्या जागांवर काँग्रेसने दावा केला आहे, त्या त्यांना मिळणार नाहीत.