बेळगावी : महाराष्ट्रातही बजरंग दलावर बंदी घालावी अशी सूचना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गुरुवारी केली. भाजपनेही धार्मिक मूलतत्त्ववाद आणि दहशतवादाशी लढण्याचे वचन दिले आहे असे ते म्हणाले. कर्नाटक निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यामध्ये बजरंग दल आणि पीएफआयवर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यामुळे भाजप आणि विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसला लक्ष्य केले आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण प्रचारासाठी बेळगावी येथे आहेत. त्यावेळी कर्नाटक सरकारने बजरंग दलाविरोधात केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला तर महाराष्ट्र सरकारनेही तसेच करावे का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपने धार्मिक मूलतत्त्ववाद आणि दहशतवाद याविरोधात लढण्यासाठी स्वतंत्र पोलीस शाखा स्थापन करण्याचे आश्वासन दिले आहे, त्याचा अर्थ काय होतो हे त्यांना विचारा. कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत आणि बजरंग दल, पीएफआय आणि इतर कोणत्याही संघटना किंवा व्यक्तींना बहुसंख्याक किंवा अल्पसंख्याक यांच्यामध्ये शत्रुत्व किंवा द्वेषाचा प्रसार करू देता कामा नये. आम्ही अशा संस्थांवर बंदी घालण्यासह निर्णायक कायदेशीर कारवाई करू असे ते म्हणाले.

Congress, reservation, Muslims,
हिंदूंना एकमेकांत लढवून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा काँग्रेसचा मनसुबा, योगी आदित्यनाथांचा आरोप
sangli lok sabha seat , Jayant patil, former bjp mla Vilasrao jagtap accuses, Vilasrao jagtap accuses Jayant patil, not getting sangli lok sabha seat to congress, vishal patil,
काँग्रेसची जागा जाण्याच्या खेळीत जयंत पाटीलच खलनायक – माजी आमदार विलासराव जगताप
Raj Thackeray Melava
MNS Gudi Padwa Melava : “विधानसभेच्या तयारीला लागा”, राज ठाकरेंचे खास शैलीत आदेश; म्हणाले, “गावागावांतून आलेल्या…”
Prithviraj Chauhan
भिवंडीच्या बदल्यात सातारा काँग्रेसला? पृथ्वीराज चव्हाण यांना लढण्यासाठी आग्रह

महागाईबाबत प्रियंका गांधींची भाजपवर टीका

कनकगिरी : कर्नाटकमधील भाजपच्या भ्रष्ट सरकारमुळे महागाई वाढली आहे. चुकीच्या धोरणांमुळे राज्यात जीवनावश्यक वस्तू व सेवांच्या किमती वाढल्या आहेत, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी- वढेरा यांनी गुरुवारी केली. राज्यात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून कर्नाटकातील सरकार ‘४० टक्के कमिशन सरकार’ म्हणून ओळखले जाते, अशा शब्दांत प्रियंका यांनी घणाघात केला. ‘‘राज्यात किमती गगनाला भिडल्या आहेत.  स्वयंपाकाचा गॅस सििलडर, तांदूळ, डाळी आणि मैद्याच्या किमती वाढल्या आहेत. भ्रष्ट सरकार भ्रष्ट धोरणे आखत असल्याने ही दरवाढ झाली आहे,’’ असे प्रियंका गांधी म्हणाल्या. कर्नाटकातील कोप्पल जिल्ह्यात एका निवडणूक सभेत त्या बोलत होत्या. कर्नाटक सरकारला ‘४० टक्के कमिशन सरकार’ असे कंत्राटदार संघटनेनेच संबोधले आहे. कंत्राटदारांना कंत्राटे मिळविण्यासाठी सरकारला लाच म्हणून मोठी रक्कम द्यावी लागत असल्याने ते आत्महत्या करत आहेत, असे प्रियंका म्हणाल्या.