निवडणूक आली की, निवडणूक लढविणाऱ्यांचा पुढाऱ्यांचा ओढा पक्ष कार्यलायकडे असतो. तिकीट मिळावे म्हणून ज्येष्ठ नेत्यांचे उंबरे झिजवले जातात. पण ओडिशामध्ये एक अजबच प्रसंग घडला. इथे पुरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवाराने मिळालेले तिकीट पक्षाला परत केले आहे. सुचरिता मोहंती यांना काँग्रेसने तिकीट दिले, मात्र प्रचारासाठी पुरेसा निधी दिला नाही. मोहंती यांनी लोकवर्गणीतून पैसे जमा केले आणि प्रचारावरील खर्चही कमी केला, तरीही त्यांच्या आर्थिक अडचणी संपल्या नाहीत. पैसे नसल्यामुळे प्रभावी प्रचार करता येत नव्हता, त्यामुळे “मी निवडणुकीतून माघार घेत आहे”, असा ईमेल त्यांनी पक्षश्रेष्ठींना पाठविला.

सुचरिता मोहंती यांनी २०१४ सालीदेखील निवडणूक लढविली होती. त्यावेळी बिजू जनता दलाच्या (BJD) पिनाकी मिश्रा यांनी त्यांचा पराभव केला. मिश्रा यांना ५,२३,१६१ इतके मतदान झाले, तर मोहंती यांना २,८९,८०० इतकी मते मिळाली.

Ajit pawar mahadev jankar
महादेव जानकर अजित पवारांना म्हणाले भा**, चूक लक्षात येताच केली सारवासारव, नेमकं काय झालं?
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Sanjay Nirupam on Shiv sena joining
“मी आलो आणि भंडारा संपला”, संजय निरुपम यांचे पक्षप्रवेशावेळी विधान; एकनाथ शिंदेंची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
garry kasparov rahul gandhi
गॅरी कास्पारोव्ह यांची रायबरेली लोकसभा मतदारसंघाबाबत पोस्ट; काही तासांत त्यावर उत्तर देत म्हणाले, “माझा विनोद…”!
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
ajit pawar narendra modi
नरेंद्र मोदींच्या शरद पवारांवरील ‘अतृप्त आत्मा’ टीकेवर अजित पवार म्हणाले, “मी पुढच्या सभेत मोदींनाच…”

मोहंती म्हणाल्या की, मला पक्षाने पैसे देण्यास असमर्थतता दर्शविली. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षाकडून कमजोर उमेदवार देण्यात आले आहेत. दुसरीकडे भाजपा आणि बीजेडी पक्ष पैशांच्या राशीवर उभे आहेत. संपत्ती-पैसा याचे बीभत्स प्रदर्शन सगळीकडे होत असताना मला अशा परिस्थितीत निवडणूक लढवायची इच्छा नाही. त्यामुळे मी माघार घेत आहे.

शहरी भागातील मतदार मतदानाबाबत उदासीन; टक्केवारी घसरल्याने निवडणूक आयोगाने व्यक्त केली चिंता

मला लोककेंद्रीत प्रचार करायचा आहे. थेट लोकांशी संपर्क साधण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. पण माझ्याकडे पुरेसा निधी नाही. तसेच पक्षानेही कोणती जबाबदारी घेतलेली नाही. भाजपा सरकारने आमच्या पक्षाला आर्थिक पंगू केले आहे. त्यामुळे खर्चावर निर्बंध आले आहेत, अशीही खंत मोहंती यांनी बोलून दाखविली. तसेच ३ मे रोजी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस यांना पत्र पाठवून मोहंती यांनी पुरी मतदारसंघातील अवघड परिस्थिती कथन केली. पक्ष निधी देत नसल्यामुळे मी तिकीट परत देत आहे, असेही त्या म्हणाल्या.

काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजोय कुमार यांच्यावरही मोहंती यांनी आरोप केले. त्या म्हणाल्या की, प्रदेशाध्यक्षांनी माझा खर्च मीच करावा, असे स्पष्टपणे सांगितले. मी एक पगारी नोकरदार आहे. मी व्यवसायाने पत्रकार असून १० वर्षांपूर्वी राजकारणात आले. पुरी मतदारसंघात प्रचार करण्यासाठी माझी जेवढी बचत होती, ती मी खर्च केली. विकासात्मक राजकारणासाठी लोकवर्गणीतून पैसे उभारण्याचाही मी प्रयत्न केला. पण मला लोकांकडूनही फारसा प्रतिसाद लाभलेला नाही. तसेच प्रचाराच्या खर्चावरही मी कात्री लावण्याचा प्रयत्न केला. पण काही शक्य झाले नाही.

Sucharita Mohanti email
सुचरिता मोहंती यांचे काँग्रेस श्रेष्ठींना पत्र

ओडिशामध्ये चार टप्प्यात निवडणुका होणार आहेत. १३, २०, २५ मे आणि १ जून रोजी चार टप्प्यात मतदान होणार आहे. ओडिशात लोकसभा आणि विधानसभा दोन्हीच्या एकत्र निवडणुका होत आहेत.