मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात (वायव्य मुंबई) एका बाजूला एकनाथ शिंदे यांचे उमेदवार रवींद्र वायकर उभे आहेत. तर त्यांच्यासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर यांनी आव्हान उभं केलं आहे. अमोल कीर्तिकरांचे वडील गजानन कीर्तिकर हे शिवसेनेच्या शिंदे गटात आहेत. गजानन कीर्तिकर हे वायव्य मुंबईचे विद्यमान खासदारदेखील आहेत. दरम्यान, कीर्तिकर पिता-पुत्राबाबत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. प्रकाश आंबेडकर म्हणाले, “मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात एका बाजूला एकनाथ शिंदे यांचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला अमोल कीर्तिकर हे उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत. एक भाजपाबरोबर (एकनाथ शिंदेंची शिवसेना) आहे. पण, निवडणूक झाल्यानंतर दुसरासुद्धा १०० टक्के भाजपाबरोबर जाणार आहे. मग काँग्रेसवाल्यांनो तुम्ही त्यांना मतदान का करताय?” वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार परमेश्वर रणशूर यांच्या प्रचारार्थ वंचितने मुंबईच्या गोरेगाव येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत प्रकाश आंबेडकर बोलत होते.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, लोकसभा निवडणुकीतील तमाशा आपण पाहत आहोत. बाप एका पक्षात तर पोरगा दुसऱ्या पक्षात आहे. सत्ता आपल्या कुटुंबातून जाता कामा नये यासाठी ही सगळी धडपड चालू आहे. शिवसेनेची (ठाकरे गट) महाविकास आघाडीबरोबर युती झाली आहे, असं सर्व प्रचारसभांमध्ये सांगितलं जातं. परंतु, मुंबईतील महाविकास आघाडीच्या कोणत्याही सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा (शरद पवार गट) एकही कार्यकर्ता दिसत नाही. त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्तेदेखील दिसत नाहीत. कदाचित मुंबईमध्ये तमाशा होणार आहे आणि महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांचे नेते या तमाशात सहभागी असतील.

Sandeep Dhurve, mustache,
भाजप आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी आता मिशी काढून… खासदार प्रतिभा धानोरकर यांचा टोला
ubt chief uddhav thackeray slams pm narendra modi without taking name over degree certificate
माझे पदवी प्रमाणपत्र खरे! उद्धव ठाकरे यांचा मोदींना टोला
Supriya Sule, Ajit Pawar,
सुप्रिया सुळे यांची अजितदादांच्या निवासस्थानी भेट; ‘हे’ आहे कारण
Prakash Ambedkar, akola,
ॲड. प्रकाश आंबेडकरांचे राजकारण जनतेने ओळखले; काँग्रेस पाडण्यासाठीच… डॉ. अभय पाटील यांची टीका
anup dhotre, akola lok sabha constituency, lok sabha election 2024, BJP
Akola Lok Sabha Election Result 2024 : अकोल्यात सलग पाचव्यांदा कमळ फुलले; अनुप धोत्रे यांचा ४० हजार ६२६ मतांनी विजय
Make Nitin Gadkari Prime Minister workers deamad in front of gadkari residence
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नितीन गडकरींना पंतप्रधान करा, निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांच्या घोषणा
Only 942 votes for Kishore Gajbhiye in the first round
वंचित आघाडीला झटका, पहिल्या फेरीत किशोर गजभिये यांना केवळ ९४२ मते
Modi converted Lok Sabha elections into Gram Panchayat
मोदींनी लोकसभा निवडणुकीचे ग्रामपंचायत निवडणुकीत रुपांतर केले अन् लक्ष्मणरेषा पार केली : प्रकाश आंबेडकर

वंचितचे प्रमुख म्हणाले, “खासगीकरणाच्या माध्यमातून इथल्या मागासवर्गीयांच्या आणि वंचितांच्या नोकऱ्या घालवल्या जात आहेत. खासगीकरण कशासाठी केलं जातंय? मालमत्ता लोकांची आहे आणि ती लोकांचीच राहिली पाहिजे, हे लक्षात ठेवा.”

प्रकाश आंबेडकर म्हणाले, “२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये ७० ते ७२ टक्क्यांपर्यंत मतदान झालं होतं. मात्र यावेळी मतदानाचं प्रमाण ५० ते ६० टक्क्यांपर्यंत खाली आलं आहे. मतदान कमी झाल्याचा सर्वात मोठा फटका भारतीय जनता पार्टीला बसणार आहे. भाजपाने ‘अब की बार ४०० पार’चा नारा दिला असला तरी यंदा ते ४०० पार जाणार नाहीत. त्यांची गाडी २५० जागांवर अडकेल.”

हे ही वाचा >> राज ठाकरेंची मागणी अन् पंतप्रधान मोदींचं तिथल्या तिथे उत्तर; मुंबईतल्या सभेत नेमकं काय घडलं?

वंचित बहुनज आघाडीने गोरेगावात आयोजित केलेल्या सभेला प्रकाश आंबेडकरांसह वंचितचे वायव्य मुंबई लोकसभेचे उमेदवार परमेश्वर रणशूर, प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे, युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, ऋषिकेश नांगरे पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.