Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : देशातल्या चार मोठ्या राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येऊ लागले आहेत. या चारपैकी तीन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळाल्याचं चित्र आता स्पष्ट होऊ लागलं आहे. राजस्थान हे राज्य भाजपाने काँग्रेसकडून हिरावलं आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार राजस्थानमधल्या १९९ पैकी ११५ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस ७० जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजपा बहुमताचा १०० हा आकडा पार करणार आहे. परंतु, राजस्थानात मुख्यमंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदासाठी वसुंधराराजे सिंधिया यांच्यासह ‘राजस्थानचे योगी’ अशी ओळख असलेल्या बाबा बालक नाथ यांचं नाव चर्चेत आलं आहे. तसेच जयपूर घराण्याच्या राजकुमारी दिया कुमारी यांचं नावही चर्चेत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या विद्यमान खासदार दिया कुमारी यांनी यावेळी राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली. जयपूरमधल्या विद्याधर नगर विधानसभा मतदारसंघात त्यांचा मोठ्या मतफरकाने विजय झाला आहे. वसुंधरा राजे आणि बालक नाथ यांच्यासह दिया कुमारी यांचं नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. मुख्यमंत्रिपदाबद्दल विचारल्यावर दिया कुमारी म्हणाल्या, “पक्ष नेतृत्व याबाबतचा निर्णय घेईल.” त्या इंडिया टुडेशी बोलत होत्या.

Mahayutis Srirang Barne Show of Power An 80-year-old lady Shiv Sainik also participated in rally
महायुतीच्या श्रीरंग बारणेंचं शक्ती प्रदर्शन; ८० वर्षाच्या कट्टर शिवसैनिक आजीही रॅलीत सहभागी
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?
cm eknath shinde supporters holding public meetings to create pressure on bjp for thane lok sabha seat
Lok Sabha Election 2024: भाजपवर दबावासाठी शिंदे सेनेच्या दंड बैठका

दिया कुमारी म्हणाल्या, “लोकांचं प्रेम आहे की ते मला मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात. परंतु, मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचा निर्णय पूर्णपणे पक्षाचं संसदीय मंडळ घेईल. तसेच भारतीय जनता पार्टी आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी करेल. भाजपा तीन राज्यांमध्ये जिंकत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे. जनतेने भ्रष्ट काँग्रेस सरकारला नाकारलं आहे आणि भाजपाला मतदान केलं आहे.”

हे ही वाचा >> “मर्द कोण हे कळलं का?” भाजपाचा उद्धव ठाकरेंना प्रश्न; राहुल गांधींवर टीका करत म्हणाले, “पनवती…”

आगामी लोकसभा निवडणुकीबाबत दिया कुमारी म्हणाल्या, आम्ही लोकसभेबाबत आता खूप सकारात्मक आहोत. भाजपा पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकेल. जयपूरमधील विद्याधर नगर मतदारसंघात दिया कुमारी ७१,३६८ मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांना एकूण १,५८,५१६ मतं मिळाली आहेत. या मतदारसंघात दिया कुमारी यांनी काँग्रेसच्या सीताराम अग्रवाल (८७,१४८) यांना पराभूत केलं आहे. निवडणुकीतील विजयानंतर दिया कुमारी यांनी जयपूरच्या गोविंद देवजी मंदिरात जाऊन प्रार्थना केली आणि त्यानंतर त्यांनी निवडणुकीतील विजयाबाबत प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.