सध्या देशात चर्चा चालू आहे ती कर्नाटक विधानसभा निवडणुकीची! काँग्रेस नेते राहुल गांधींनी काढलेली भारत जोडो यात्रा, त्यापाठोपाठ विरोधी पक्षांनी सत्ताधारी भाजपाविरोधात उठवलेलं रान आणि भाजपविरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कर्नाटक निवडणुकांकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. नुकतीच भाजपानं आपल्या उमेदवारांची नावं जाहीर करायला सुरुवात केली आहे. त्यात उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज झालेल्यांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कर्नाटकचे भाजपाचे वरीष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा हे त्यांतलेच एक. त्यांच्या नाराजीच्या चर्चा एकीकडे चालू असताना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच त्यांना फोन केला. त्यांच्या चर्चेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भाजपानं कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांच्या याद्या जाहीर करायला सुरुवात करताच त्यात नावं न आलेल्यांमध्ये नाराजी पसरल्याचं चित्र निर्माण झालं. त्याचा परिणाम म्हणून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट काँग्रेस गाठली. त्यामुळे भाजपाला पक्षांतर्गत नाराजीचा आणि असंतुष्टांचा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत नाराजांशी संवाद साधण्याचा भाजपाकडून प्रयत्न चालू असून त्याचाच भाग म्हणून थेट मोजींनी ईश्वरप्पा यांना फोन केल्याची चर्चा सुरू झाली आहे.

sharad pawar
“…तर मोदींना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही”, आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचा अहवाल मांडत शरद पवारांची टीका
BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
sharad pawar
धमक्यांना घाबरू नका, ‘त्यांना’ दुरुस्त करण्याची वेळ; शरद पवार यांचे अजित पवारांना थेट आव्हान

देवेगौडा यांची घराणेशाही, सात जण पदांवर तरीही वादंग

मोदी बोलले, इश्वरप्पा भारावले!

एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यात के. एस. ईश्वरप्पा मोबाईल फोनवर थेट मोदींशी बोलताना दिसत आहेत. पाच वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या ईश्वरप्पांना तिकीट नाकारल्यामुळे अनेकांच्या भुवया इंचावल्या होत्या. मात्र, मोदींनी त्यांच्याशी फोनवर बोलून त्यांच्या कामाचं कौतुक केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

मोदींनी यावेळी पक्षाच्या निर्णयाचा स्वीकार केल्याबद्दल आणि पक्षाशी निष्ठा कायम राखल्याबद्दल इश्वरप्पा यांना धन्यवाद दिले. “तुम्ही आणि येडियुरप्पांनी पक्षासाठी जे काही केलंय, ते उल्लेखनीय आहे”, असं मोदी फोनवर बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

भाजपा निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणार? लिंगायत समाजाच्या नेत्याला संधी देण्याची मागणी!

ईश्वरप्पा म्हणतात, “मी शक्य ते सर्व करीन”

दरम्यान, फोनवर बोलताना ईश्वरप्पांनी मोदींना शक्य ते सर्व करण्याचं आश्वासन दिलं आहे. “माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन करून तुम्ही धीर दिल्यानं मला फार आनंद झाला. भाजपाला कर्नाटकमध्ये विजयी करण्यासाठी मी शक्य ते सर्वकाही करेन”, असं ईश्वरप्पांनी मोदींना सांगितलं. दरम्यान, नंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी “मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की मोदी मला फोन करतील, त्यांनी असं करणं माझ्यासाठी प्रेरणादायी आहे”, अशी प्रतिक्रिया दिली.

कर्नाटकमध्ये निवडणुका कधी, निकाल कधी?

कर्नाटकमध्ये येत्या १० मे रोजी मतदान होणार असून १३ मे रोजी मतमोजणी व निकाल लागणार आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून या निवडणुकांकडे पाहिलं जात आहे.