विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तिकीट नाकारल्यामुळे येथे भाजपाच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. याच कारणामुळे भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. नुकतेच जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी या बड्या नेत्यांनीही भाजपाला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. परिणामी लिंगायत समाज दूर जाण्याची भाजपाला भीती वाटत आहे. हा फटका बसू नये म्हणून भाजपाच्या लिंगायत समाजाच्या नेत्यांची बधवारी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली आहे.

निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार घोषित करा

लिंगायत समाजाला आकर्षित करण्यासाठी काय करावे? यावर भाजपा नेत्यांची बुधवारच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीला कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा, मुख्यमंत्री तथा भाजपाचे नेते बसवराज बोम्मई यांच्यासह लिंगायत समाजाचे अन्य महत्त्वाचे नेते उपस्थित होते. लिंगायत समाजाची मतं फुटू नयेत यासाठी निवडणुकीपूर्वीच मुख्यमंत्रिपदासाठीचा उमेदवार म्हणून एखाद्या लिंगायत समाजाच्या नेत्याची घोषणा करावी, असे मत यावेळी मांडण्यात आले.

Raj Thackeray
“राज ठाकरे भाजपाचं स्क्रिप्ट वाचतात, करमणुकीसाठी निवडणुकीआधी इव्हेंट…”, काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
himanta Sarma on Lok sabha Election
“४०० जागा मिळाल्या की..”, संविधान बदलाच्या चर्चेनंतर आता भाजपा नेत्याकडून वेगळा विषय समोर
supreme court to consider granting interim bail to arvind kejriwal
केजरीवाल यांना जामिनाची आशा; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे सुतोवाच
ajit pawar criticized congress
“ज्या काँग्रेसने कधी संविधान दिवस साजरा केला नाही, ती काँग्रेस आज…”; संविधान बदलण्याच्या आरोपांवर अजित पवारांची प्रतिक्रिया
What Narendra Modi Said?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप, “काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लिम लीगची छाप”
Narendra Modi criticism that it is a ploy by Congress to implement the Karnataka model for Muslims
ओबीसी आरक्षणाला धोका! मुस्लिमांसाठीचे कर्नाटक प्रारूप लागू करण्याचा काँग्रेसचा डाव : मोदी
narendra modi
धर्माच्या आधारावर आरक्षणाचा प्रयत्न! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काँग्रेसवर आरोप
independent candidate, madha constituency, buffalo, yamraj costume, filed nomination, independent candidate, ram gaikwad
‘यमराज’ लोकसभा निवडणूकीच्या रिंगणात ? रेड्यावर बसून उमेदवाराची जोरदार एन्ट्री

हेही वाचा >> Karnataka Election : “मी पळून जाणारा मुख्यमंत्री नाही,” बसवराज बोम्मई यांचे सिद्धरामय्या यांच्यावर टीकास्र

लिंगायत समाजाची मतं फुटू नयेत यासाठी भाजपाकडून प्रयत्न

याविषयी बोम्मई यांनी अधिक माहिती दिली आहे. “सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्जा करण्यासाठी आम्ही ही बैठक बोलावली होती. भाजपा लिंगायत समाजाच्या विरोधात आहे, असा चुकीचा प्रचार काँग्रेसकडून केला जात आहे. यावरही या बैठकीत चर्चा झाली. काँग्रेसच्या या रणनीतीला कसे उत्तर द्यावे, यावरही चर्चा झाली. भाजपाने निवडणुकीच्या अगोदरच लिंगायत समाजातील नेत्याची मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करावी, असे काही नेत्यांचे मत आहे. पक्षाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान हेदेखील या चर्चेचा भाग होते. आमची मतं ते दिल्लीला कळवणार आहेत,” असे बोम्मई म्हणाले.

काँग्रेसकडून लिंगायत समाजावर अन्याय, भाजपाचा दावा

काँग्रेसने लिंगायत समाजावर कसा अन्याय केलेला आहे, हे आम्ही समोर आनणार आहोत, असेही बोम्मई यांनी सांगितले. “१९६७ सालापासून मागील साधारण ५० वर्षांत काँग्रेसने विरेंद्र पाटील वगळता एकाही लिंगायत समाजाच्या नेत्याला मुख्यमंत्रीपद दिलेले नाही. विरेंद्र पाटील हेदेखील फक्त आठ महिनेच मुख्यमंत्री होते. विरेंद्र पाटील यांना त्या आठ महिन्यांत वाईट वागणूक देण्यात आली. यावरूनच काँग्रेस लिंगायत समाजाला कशी वागणूक देते, हे स्पष्ट होते.” असे बोम्मई म्हणाले.

हेही वाचा >> सोलापुरातील राजकीय वातावरण पुन्हा तापू लागले; विमानसेवा आणि चिमणी दोन्ही मुद्दे वादग्रस्त

भाजपात सर्व समाजाचा आदर केला जातो- बोम्मई

भाजपामध्ये सर्वच जाती-धर्मांचा आदर केला जातो, असा दावा बोम्मई यांनी केला. “भाजपामध्ये सर्वच समुदायांना सन्मान मिळतो. काँग्रेसमध्ये मात्र हे शक्य नाही. त्यांनी दलित, लिंगायत, मागासवर्गीयांची फसवणूक केलेली आहे,” असे बोम्मई म्हणाले.

प्रचारात मोदी सहभागी होणार

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २४ एप्रिल आहे. त्यानंतर भाजापकडून प्रचाराला सुरुवात केली जाणार आहे. या मोहिमेत पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी होणार आहेत. मोदींच्या कर्नाटकमध्ये बैठका, सभा, रोडशो आयोजित केले जातील, अशी माहिती बोम्मई यांनी दिली. २७ एप्रिलपासून मोदी कर्नाटकमधील प्रचारात सहभागी होणार आहेत.