scorecardresearch

Premium

“सर्कसमध्ये माकडाची जागा रिकामी आहे, ते येऊ शकतात”, चरणजीत सिंग चन्नींचा ‘आप’ला खोचक टोला!

पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी आपचे उमेदवार भगवंत मान यांच्यावर खोचक टीका केली आहे.

charanjeet singh channi on bhagwant mann aap
चरणजीत सिंग चन्नींचा भगवंत मान यांना खोचक टोला!

पंजाबमध्ये येत्या २० फेब्रुवारी रोजी विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे राज्यातील प्रचार शिगेला पोहोचला असून भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी यांच्यामध्ये सत्तेचा सारीपाट रंगणार आहे. दुसरीकडे शिरोमणी अकाली दल आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यामुळे ही निवडणूक पंचरंगी होणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढण्याची एकही संधी सोडलेली नाही. आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार भगवंत मान यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे उमेदवार चरणजीतसिंग चन्नी यांनी मान यांना खोचक शब्गांमध्ये टोला लगावला आहे.

पंजाब निवडणुकांसाठी अमृतसरमध्ये आयोजित केलेल्या एका प्रचारसभेत बोलताना मान यांनी काँग्रेसचा उल्लेख सर्कस असा केला होता. “काँग्रेस पक्ष आता पंजाबमध्ये एक सर्कस बनला आहे. चन्नीसाहेबांचा ते लढत असलेल्या दोन्ही मतदारसंघांमध्ये पराभव होणार आहे. आप त्यांचा पराभव करेल. ते जर आमदारच नसतील, तर ते कधीच मुख्यमंत्री बनू शकणार नाहीत”, असं मान म्हणाले होते.

Eknath Shinde viral video of karyakram karen
“मुख्यमंत्री साहेब, कार्यक्रम म्हणजे काय समजायचं?”, मुख्यमंत्र्यांचा ‘तो’ VIDEO शेअर करत काँग्रेसचा सवाल
Criticism of Prime Minister Narendra Modi as division in the name of caste by India alliance
‘इंडिया’आघाडीकडून जातीच्या नावावर फूट! पंतप्रधान नरेंद्र मोदींची टीका, संत रविदास यांच्या पुतळय़ाचे अनावरण
expansion of the Vadhvan Port
पालघर : वाढवण बंदर संदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक निष्फळ
ED raids properties of AAP MP ND Gupta personal secretary of Delhi Chief Minister Arvind Kejriwal and other AAP leaders
दिल्ली, प. बंगालमध्ये ‘ईडी’चे छापासत्र; पंतप्रधानांच्या इशाऱ्यानंतर कारवाई

“जर काँग्रेस सर्कस असेल तर…”

दरम्यान, मान यांच्या टीकेला चरणजीत सिंग चन्नी यांनी एका टीव्ही कार्यक्रमात बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे. “ही जर आमची सर्कस असेल, तर तिथे माकडाची जागा रिकामी आहे. त्यासाठी त्यांचं (भगवंत मान) स्वागत आहे. त्यांना दिल्लीतून, हरयाणामधून किंवा उत्तर प्रदेशमधून दाखल व्हायचं असेल तरी ते होऊ शकतात”, असं चन्नी म्हणाले.

पंतप्रधान मोदींमुळे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर उड्डाणाला परवानगी नाकारली; काँग्रेसकडून टीकास्त्र

पंजाब आणि खेळ!

दरम्यान, चन्नी यांनी यावेळी पंजाब आपसोबत खेळत असल्याचं म्हटलं. “पंजाब फक्त आपसोबत खेळत आहे. पंजाब इतर कुणाबरोबरही जाणार नाही”, असं ते म्हणाले. आपला ‘काले अंग्रेज’ अशी उपमा देत चन्नी यांनी “हे ब्रिटिश पंजाबला लुटण्याचा प्रयत्न करत आहेत”, असं चन्नी म्हणाले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab cm charanjeet singh channi mocks aap candidate bhagwant mann on circus comment pmw

First published on: 15-02-2022 at 13:55 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×