उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वाराणसी येथील एक सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच, “मी मरेन पण तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की १५ लाख रुपये घ्या आणि बँक खात्यात जमा करा. तुम्हाला चांगलं वाटेल, नाही वाटणार पण मला काही फरक नाही पडत. कारण, मी तुमचा एवढा आदर करतो की मी तुम्हाला खोटं बोलू शकत नाही.” असंही राहुल गांधी यांनी यावेळी बोलून दाखवलं. या प्रसंगी काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची देखील उपस्थिती होती. राहुल गांधी म्हणाले, “उत्तर प्रदेशला आपले आपले सरकार बनवायचे आहे. तुम्हाला तुमच्या भविष्याबाबत एक मोठा निर्णय घ्यायचा आहे. उत्तरप्रदेश कोणत्या मार्गावरून चालणार. विविध पक्ष आहेत, एकीकडे भाजपा, समाजवादी पार्टी, काँग्रेस, बसपा. सर्व पक्ष उत्तर प्रदेशला एक मार्ग दाखवण्याबाबत बोलत आहेत. नरेंद्र मोदी २०१४ पासून पंतप्रधान आहेत. मला आठवतं की २०१४ पासून त्यांच्या प्रत्येक भाषणात रोजगाराबाबत बोललं जात होतं. नरेंद्र मोदी म्हणायचे प्रत्येक वर्षी२ कोटी तरूणांना रोजगार दिला जाईल. नरेंद्र मोदी दुसरं आश्वासन देत होते की ते शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करतील आणि तिसरं आश्वासन ते म्हणजे काळा पैसा नष्ट करेल आणि तुमच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करून दाखवेन.” तसेच, “मी तुम्हाला विचारू इच्छितो या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या भाषणात ते रोजगाराबाबत का नाही बोलत? १५ लाख रुपयांबद्दल का नाही बोलत? शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याबाबत का नाही बोलत? याच उत्तर तुम्ही मला द्या. काय कारण आहे की पाच वर्षांपूर्वी प्रत्येक भाषणात मी रोजगार मिळवून देईन, १५ लाख रुपये बँक खात्यांमध्ये जमा करेन, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करेन असं सांगत होते. परंतु आताच्या भाषणात ते रोजगार, शेतकरी उत्पन्न, काळापैसा, १५ लाख रुपये जमा करण्याबाबत काहीच बोलत नाहीत.” असंही राहुल गांधी यांनी यावेळी सांगितलं. याचबरोबर, “मी मरेन पण तुम्हाला असं कधीच म्हणणार नाही की १५ लाख रुपये घ्या आणि बँक खात्यात जमा करा. तुम्हाला चांगलं वाटेल, नाही वाटणार पण मला काही फरक नाही पडत. मी तुमचा एवढा आदर करतो की मी तुम्हाला खोटं बोलू शकत नाही. नरेंद्र मोदींनी माध्यमांना दाबून ठेवलं आहे त्यामुळे माध्यम प्रतिनिधी देखील नोकरी जाण्याच्या भीतीने त्यांना काही विचारू शकत नाहीत. मोदी येतात खोटं बोलतात आणि म्हणतात मी हिंदू धर्माबाबत बोललो, मी हिंदू धर्माची रक्षा करतो. मोदी तुम्ही हिंदू धर्माचे रक्ष करत नाही तर खोट्याचं रक्षण करतात. स्वत:ची खुर्ची वाचवण्यासाठी असत्याचे रक्षण तुम्ही करतात.” असा आरोप राहुल गांधी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.