Rajasthan Vidhan Sabha Election Result 2023 Updates, 3 December 2023 : राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तिन्ही राज्यांमध्ये भाजपाने स्पष्ट बहुमत मिळवत हिंदी भाषिक पट्ट्यात आपलं वर्चस्व निर्माण केलं आहे. त्याचवेळी दक्षिणेकडे भाजपाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नसताना काँग्रेसने मात्र तेलंगणात बहुमताचा आकडा पार केला आहे. हे राज्य स्थापनेपासून बीआरएसच्या ताब्यात होतं. परंतु, तेलंगणात आता काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. दुसऱ्या बाजूला तीन राज्यांमधील निवडणुकांचा निकाल भाजपासाठी लोकसभा निवडणुकीआधीच्या पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण झाल्याची पावती आहे, असं म्हटलं जात आहे.

मध्य प्रदेशमध्ये भाजपाचीच सत्ता होती, जी त्यांनी कायम राखली आहे. परंतु, राजस्थान आणि छत्तीसगड ही दोन राज्ये भाजपाने काँग्रेसकडून हिसकावली आहे. त्यामुळे उत्तर आणि मध्य भारतात भाजपाचा दबदबा निर्माण झाला आहे. राजस्थानमध्ये भाजपाने १९९ जागांपैकी ११५ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ ६९ जागा जिंकता आल्या आहेत. राजस्थानमध्ये भारत आदिवासी पक्षाने तीन, बहुजन समाज पार्टीने दोन आणि राष्ट्रीय लोकदलाने एक जागा जिंकली आहे. यासह राजस्थानच्या विधानसभेत आठ अपक्ष आमदारदेखील असतील.

Narendra Modi and rahul gandhi (2)
“काँग्रेसने अनुसूचित जाती-जमातींचं आरक्षण काढून मुस्लिमांना दिलं”, नरेंद्र मोदींचा पुन्हा हल्लाबोल; म्हणाले, “खास जमातीला…”
BJP candidate Anil Antony
LS Elections 2024: मुलगा पराभूत व्हावा ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचीच इच्छा
Himachal Pradesh Lok Sabha Election 2024
हिमाचल, उत्तराखंडमध्ये यंदा काँग्रेस खाते उघडणार?
bjp s Maharashtra in charge Dinesh Sharma Slams Congress Manifesto as Full of False Promises
‘पक्षाला ओहोटी, काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधीच राहणार….’

दरम्यान, राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत अनेक एग्झिट पोलचे अंदाज खरे ठरले आहेत. ‘टोटल’ एग्झिट पोलच्या अंदाजानुसार राजस्थानात भाजपाला ११५ च्या आसपास जागा मिळतील आणि काँग्रेसला ७१ जागांवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं होतं. ‘टाइम्स नाऊ’च्या एग्झिट पोलमध्ये भाजपाला १०८ ते १२८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता, तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागांवर समाधान मानावं लागेल असा दावा करण्यात आला होता. ‘जन की बात’ या एग्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाला राजस्थानात १०० ते १२२ जागा मिळतील हा अंदाज वर्तवण्यात आला होता तर काँग्रेसला ६२ ते ८५ जागांवर समाधान मानावं लागेल असं म्हटलं होतं. हे तिन्ही एग्झिट पोल खरे ठरले आहेत.

हे ही वाचा >> “…तर काँग्रेसची कामगिरी चांगली झाली असती”, निवडणूक निकालावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया; अखिलेश यादवांचा उल्लेख करत म्हणाले…

दरम्यान, ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’चा पोल चुकीचा ठरला आहे. ‘अ‍ॅक्सिस माय इंडिया’ने म्हटलं होतं की राजस्थानमध्ये काँग्रेसला ८६ ते १०६ जागा, तर भाजपाला ८० ते १०० जागांवर समाधान मानावं लागेल. परंतु, भाजपाला ११५ आणि काँग्रेसला ६९ जागा मिळाल्या आहेत.