काँग्रेसने कर्नाटकची निवडणूक एकहाती जिंकल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा गेल्या तीन दिवसांपासून सुरु होत्या. त्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आणि सिद्धरामय्यांचं नाव फायनल झालं. काही वेळापूर्वीच सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. कर्नाटकच्या राजकारणात सिद्धरामय्या यांनी प्रवेश केला तेव्हा ते काँग्रेसमध्ये नव्हते. मात्र आता ते दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून त्या पदावर विराजमान झाले आहेत. त्यांची मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द कशी असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र आपण जाणून घेऊ की त्यांची राजकीय कारकीर्द कशी आहे?

१९७८ पासून सक्रिय राजकारणात

सिद्धरामय्या हे कर्नाटकच्या राजकारणातलं मोठं नाव आहे. पेशाने वकील असणारे सिद्धरामय्या हे १९७८ पासून सक्रिय राजकारणात आहेत. सिद्धरामय्यांच्या आई वडिलांना वाटत होतं की त्यांनी डॉक्टर व्हावं. मात्र सिद्धरामय्यांनी वकील व्हायचा निश्चय केला. त्यानंतर वकिली सोडून ते राजकारणात आले. भूकमुक्त कर्नाटक हे त्यांच स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ते वाटचाल करु लागले.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Udayanraje bhosle show of power tomorrow in Satara
उदयनराजेंचे उद्या गुरुवारी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह साताऱ्यात जोरदार शक्ती प्रदर्शन
Chief Minister Eknath Shinde
“मला रोज फोन यायचे, साहेब त्यांना काहीतरी सांगा”; शिवतारेंच्या निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितला किस्सा

२०१३ मध्ये पहिल्यांदा झाले कर्नाटकचे मुख्यमंत्री

सिद्धरामय्यांनी कर्नाटक विधानसभेत विविध पदं सांभाळली आहेत. आमदार, अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री ही पदं सांभाळल्यानंतर सिद्धरामय्यांनी २०१३ मध्ये कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. ७५ वर्षांचे सिद्धरामय्या हे कुरुबा समुदायचे नेते आहेत. या समुदायावर सिद्धरामय्यांची चांगली पकड आहे. सिद्धरामय्या कायमच शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत आले आहेत. तसंच ते स्पष्टवक्ते म्हणूनही ओळखले जातात. त्यांच्या याच गुणांमुळे आता ते दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री होणार आहेत. जनतेची साथ त्यांना कशी लाभते हे त्यांना दुसऱ्यांदा अनुभवता येणार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.

आधी देवेगौडांसोबत केलं काम मग काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसमध्ये येण्याधी सिद्धरामय्या हे एच. डी. देवेगौडांसह जेडीएस मध्ये कार्यरत होते. एच. डी. देवेगौडांसह त्यांनी निष्ठेने काम केलं. जेडीएसमध्ये अशी चर्चाही होत होती की सिद्धरामय्यांना पक्षाचं प्रमुख केलं जाईल. मात्र जेव्हा पक्षाची धुरा सांभाळण्याची वेळ आली तेव्हा एच. डी. देवेगौडांनी सिद्धरामय्यांना न निवडता आपला मुलगा कुमारस्वामीची निवड केली. कुमारस्वामींनी सुरुवातीला राजकारणात येण्यास नकार दिला होता. मात्र पक्षाचं प्रमुखपद आल्यानंतर कुमारस्वामी राजकारणात प्रचंड सक्रिय झाले. सिद्धरामय्यांना हे कळून चुकलं की आता आपण जेडीएसमध्ये राहण्यात काही राम नाही. एच. डी. देवगौडांसह झालेल्या मतभेदानंतर सिद्धरामय्यांना पक्षाबाहेर करण्यात आलं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसशी हात मिळवणी केल्यानंतर मात्र ते काँग्रेसशी निष्ठावान झाले. त्यामुळे त्यांचं राजकीय करिअर शिखरावर गेलं. आता सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले आहेत.