बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटातील नेत्यांनी मतांसाठी पैसे वाटल्याचा, सातारा लोकसभेत भाजपाने पैसे वाटल्याचा आरोप होत असतानाच आता शिवसेनेच्या शिंदे गटावरही असाच आरोप होत आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी आरोप केला आहे की, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात पैसे वाटले आहेत. संजय राऊत म्हणाले मुख्यमंत्री, सलग दोन दिवस कोल्हापुरात पैसे वाटत फिरत होते. कोल्हापूरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती (दुसरे) यांचा पराभव करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी १०० कोटी रुपये वाटले आहेत.

संजय राऊत म्हणाले, नकली शिवसेनावाले पैसे वाटत फिरत आहेत. चोरलेला धनुष्यबाण विजयी करण्यासाठी मतदारांना पैसे वाटत आहेत. कोल्हापूरला आमच्या शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी रडीचा डाव खेळतायत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांना हरवण्यासाठी नकली शिवसेनावाले महाशय कोल्हापूरमधील एका हॉटेलमध्ये तब्बल १०० कोटी रुपये घेऊन बसले होते. ज्या शाहू आणि शिवाजी महाराजांपुढे आपण नतमस्तक होतो. ज्यांच्या नावाने आपली शिवेसना चालली आहे, त्यांच्या वंशजांचा पराभव करण्यासाठी हे लोक मतदारांना पैशाचं अमिष दाखवत आहेत. मुळात पैशांशिवाय त्यांच्याकडे आहे तरी काय?

narendra modi
“मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदींकडून भूमिका स्पष्ट
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Ambadas Danave
मोठी बातमी! ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी लष्करी जवानाने अंबादास दानवेंकडे मागितले अडीच कोटी, टोकन रक्कमही घेतली!
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
prithviraj chavan loksabha election 2024
“या निवडणुकांनंतर महाराष्ट्रात दोन पक्ष लोप पावतील”, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा; म्हणाले, “या पक्षांमधली माणसं…”
Ajit pawar and sharad pawar (1)
“माझ्या वडिलांना कोणत्या आजारावर उपचार करायला नेलं होतं?”, अजित पवारांचा शरद पवारांना थेट प्रश्न
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

ठाकरे गटातील खासदार म्हणाले, तोतया मुख्यमंत्र्यांकडे चोरीच्या मालाशिवाय काहीच नाही. सगळा चोरीचा माल घेऊन बसलेत. चोरीचा पक्ष, लुटीचा धनुष्यबाण घेऊन बसलेत. ठाणे महानगरपालिकेत लोकांना पगार द्यायला पैसे नसतील, मात्र यांच्याकडे मतदारांना वाटण्यासाठी पैसे आहेत. एकेका आमदाराला ५०-५० कोटी रुपये देऊन खरेदी केलंय. एकेका खासदाराला १००-१०० कोटी रुपये दिले आहेत. मी आमचा ठाण्याचा लोकसभेचा उमेदवार राजन विचारेला एकच सांगेन. या लोकांनी ५०-५०, १००-१०० कोटी रुपयांसाठी निष्ठा विकली आहे. मात्र तू निष्ठेच्या नावाखाली वणवण फिरतोयस. त्यामुळे लोक तुलाच मतदान करतील. ठाणे लोकसभेची निवडणूक खूप रंगतदार होणार आहे. राजन, तू या निवडणुकीत फार घाम गाळू नकोस, तू शिवसेनेच्या शाखेत नुसता बसून राहिलास तरी लोक तुझ्या पारड्यात भरघोस मतदान टाकतील.

हे ही वाचा >> “मी मुस्लिम समुदायाला पहिल्यांदाच सांगतोय, त्यांनी आता…”, पंतप्रधान मोदींची रोखठोक भूमिका

राऊत म्हणाले, ४ जूननंतर (लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर) ठाण्यातील जनता एकनाथ शिंदेंना ठाण्यातून पळवून लावेल आणि मोदी नावाचं पार्सल हिमालयात जाणार. त्यामुळे मला वाटतं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि नरेंद्र मोदींचा पासपोर्ट आत्ताच जप्त करायला हवा. कारण त्यांनी अनेक अपराध केले आहेत, आपला देश लुटला आहे. ब्रिटीशांपेक्षा अधिक लुटमार या लोकांनी केली आहे.