Gold-Silver Price Today: सोने चांदीची खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. देशांतर्गत बाजारात आजा सोन्या चांदीच्या दरात चांगलीच घट झाल्याचे दिसून आले. मोठ्या उसळीनंतर आज घसरण दिसून आली. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही मौल्यवान धातूच्या दरवाढीला आज ब्रेक लागल्याचे दिसत आहे. आता सोने आणि चांदीचा असा आहे भाव… 

१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,९१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७४,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदी ९१,३९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ९४,४८० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

Gold Silver Price 8 June
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! सोने झाले स्वस्त; १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात उसळली गर्दी
Gold Silver Price 30 May
Gold-Silver Price: ग्राहक आनंदी! सोन्याचा भाव कोसळला, १० ग्रॅमचा दर पाहून बाजारात गर्दी
Wedding video bride dance after seeing his groom
नवरदेवाला मंडपात पाहून नवरीचा काय तो आनंद; VIDEO पाहून नेटकरी म्हणतात “नवरी भारी हौशी”
Gold Silver Price on 06 June
Gold-Silver Price: सोन्याच्या किमतीने केला कहर, १० ग्रॅमचा दर ऐकून बाजारात पसरली शांतता!
Heart-touching Letters to Son from father
Photo: “प्रेम ही एक क्षणिक भावना” प्रत्येक बापानं वयात येणाऱ्या मुलाला लिहावं असं पत्र; नक्की वाचा
The women danced to the pink saree song wearing Nauvari
याला म्हणतात मराठमोळा डान्स! नऊवारी नेसून गुलाबी साडी गाण्यावर महिलांनी धरला ठेका… Viral Video पाहून युजर्स करतायत कौतुक
Gold Silver Price
Gold-Silver Price: लोकसभेच्या निकालादिवशी सोन्याच्या दरात बदल; मुंबईतील १० ग्रॅमची किंमत आता…  
Gold Silver Price on 13 June 2024
Gold-Silver Price: बाजारपेठेत सोन्याचे भाव गडगडले, मुंबई-पुण्यात १० ग्रॅमचा दर आता… 

बुलियन मार्केट वेबसाईटनुसार पाहा तुमच्या शहरातील सोन्याचा दर

शहर२२ कॅरेट सोन्याचा दर२४ कॅरेट सोन्याचा दर
मुंबई२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,७०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,७७० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,७७० रुपये आहे.
नागपूरप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०६ रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याचा दर ७२,७७० रुपये इतका आहे.
नाशिकप्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,७०६ रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,७७० रुपये आहे.

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?

सोनेखरेदी करताना सराफाकडून असे विचारले जाते की तुम्हाला २२ कॅरेटचे सोने खरेदी करायचे आहे की, २४ कॅरेटचे? त्यामुळे तुम्ही देखील हे जाणून घेणे आवश्यक आहे की तुम्ही खरेदी करताय ते सोनं काय शुद्धतेचं आहे. जर तुम्हाला कॅरेटबाबत माहित असेल तर ही बाब चांगली आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देत आहोत. 

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.