लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून जागावाटपाला वेग आला आहे. यंदाची निवडणूक इंडिया आघाडी विरुद्ध एनडीए अशी रंगणार आहे. या दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक घटकपक्ष असल्याने जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न वरिष्ठ पातळीवर केला जातोय. शिंदेच्या शिवसेनेतही असाच तिढा निर्माण झाला आहे. याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विद्यमान खासदारांची बैठक घेतली. ही बैठक नुकतीच संपली असून यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी माध्यमांशी संवाद साधत बैठकीतील इतिवृत्त दिलं आहे.

खासदार राहुल शेवाळे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांनी आज विद्यमान खासदारांची सकाळी ११ वाजता बैठक बोलावली होती. विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांची माहिती त्यांनी जाणून घेतली असून त्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली. भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून महायुतीच्या जागावाटपासंदर्भात निर्णय होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सूचित केलं.”

eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
Raj Thackeray Ankita walavalkar
“राज ठाकरेंनी महायुतीच्या सत्तेत सहभागी होण्यापेक्षा…”, कोकण हार्टेड गर्लची खास इच्छा; अमित शाहांबरोबरच्या भेटीवर म्हणाली…
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
Ayodhya Paul and uddhav thackeray
अयोध्या पौळ यांच्या ‘त्या’ पोस्टमुळे कल्याणच्या उमेदवारीची चर्चा; नंतर खुलासा करत म्हणाल्या…

हेही वाचा >> राज ठाकरे महायुतीत येणार का? छगन भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट ही आहे की..”

दरम्यान, जागावाटपात अनेक खासदार नाराज असल्याच्या चर्चा आहेत. या चर्चेवर उत्तर देताना राहुल शेवाळे म्हणाले, खासदारांची नाराजी नाही. खासदारांचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे. खासदारांनी एकच चिंता व्यक्त केली की प्रसार माध्यमातून महायुतीसंदर्भात वेगळं वातावरण निर्माण होतंय. असं वातावरण निर्माण होऊ नये याकरता महायुतीच्या सर्व घटकपक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना सूचना देण्यात याव्यात. महायुतीचा फॉर्म्युला घोषित होत नाही तोवर कोणत्याही नेत्याने वक्तव्य करू नये, असं राहुल शेवाळे म्हणाले.

“महायुतीत एकवाक्यता आहे. महायुतीत सर्वांचा सन्मान राखला जाईल आणि महाराष्ट्रात ४५ पेक्षा जास्त जागा जिंकणे हा महायुतीत समान फॉर्म्युला आहे. त्यामुळे, सर्वांचा सन्मान राखून जागावाटप होणार आहे. दोन दिवसांत याबाबत घोषणा होईल, असंही ते म्हणाले.

महायुतीत नवा भिडू येणार?

जागावाटपाची चर्चा सुरू असताना महायुतीमध्ये आणखी एक नवा भिडू येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांनी आज केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीमुळे राज ठाकरेही महायुतीत सामील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, राज ठाकरे महायुतीत आल्यानंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला कसा राहील याकडे सर्वांचं लक्ष आहे.