Telangana Election Result 2023 : तेलंगणातील ११९ विधानसभा मतदारसंघासाठी आज (३ डिसेंबर) सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. सकाळी आलेल्या आकडेवारीनुसार काँग्रेस ६३ जागांवर विजयी असल्याचे दिसत आहे. बहुमतापेक्षाही तीन जागा अधिक असल्याचे दिसत आहे. तर विद्यमान सत्ताधारी भारत राष्ट्र समिती सध्या २५ ठिकाणी आघाडीवर आहे. जर हाच ट्रेंड दुपारपर्यंत कायम राहिला तर भारतातील सर्वात तरूण राज्यात (२०१३ साली स्थापना) पहिल्यांदाच बीआरएस व्यतिरिक्त दुसऱ्या पक्षाची सत्ता येऊ शकते. बीआरएसची याठिकाणी २०१४ पासून सत्ता आहे.

काँग्रेसने निकालात आघाडी घेतली असतानाच आता बीआरएस विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रेवंत रेड्डी यांनी शनिवारी (२ डिसेंबर) रात्री निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करून बीआरएसवर ६००० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. बीआरएसच्या रायतु बंधू या योजनेच्या माध्यमातून बेकायदेशीरित्या त्यांच्या जवळच्या कंत्राटदारांना पैसे ट्रान्सफर केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. रायतु बंधू आणि दलित बंधू या भारत राष्ट्र समितीच्या दोन महत्त्वपूर्ण योजना आहेत. दोन्ही योजनांच्या माध्यमातून अनुक्रमे शेतकरी आणि दलित कुटुंबांना मोठी रक्कम दिली जाते.

BJP challenges Ajit Pawar group MLA Sunil Shelke in Maval
मावळमध्ये अजितदादा गटाच्या आमदाराला भाजपचेच आव्हान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Jammu and Kashmir assembly elections
नंदनवनातील निवडणूक: जम्मू-काश्मीरमध्ये उद्या मतदान, १० वर्षांनंतर विधानसभेसाठी निवडणूक
ulta chashma, president appointment
उलटा चष्मा : अध्यक्ष नेमणे आहे
ashok Chavan and congress leader d p sawant
अशोक चव्हाण- डी. पी. सावंत प्रथमच ‘आमने-सामने’
Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
Congress on Madhabi Puri Buch :
Congress on Madhabi Puri Buch : “माधबी पुरी बूच यांनी कोट्यवधींची…”, काँग्रेसच्या नव्या आरोपाने खळबळ
congress chief mallikarjun kharge slams pm narendra modi over manipur violence
मणिपूरमध्ये पंतप्रधानांचे अपयश निंदनीय; काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

हे वाचा >> नव्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे?…

तसेच ‘धरणी पोर्टल’चा गैरवापर करून केसीआरच्या कुटुंबियांना मालमत्ता हस्तांतर केल्याचाही आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे निकाल काँग्रेसच्या बाजूने आल्यास बीआरएसला पुढे कठीण राजकीय परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो.

पिछाडीवर जाण्याची कारणे काय?

सत्ताधारी बीआरएसने ज्याप्रकारे कल्याणकारी योजना राबविल्या त्याविरोधात जनतेमध्ये मोठ्या अप्रमाणात असंतोष होता. शेतकऱ्यांसाठी रायतु बंधू आणि रायतु बिमा योजना, दलित आणि मागासवर्गीयांसाठी दलित बंधू योजना आणि गरिब नागरिकांना घर देण्यासाठी गृह लक्ष्मी योजना आणल्या गेल्या. मात्र त्याच्या अंमलबजावणीवरून काही प्रमाणात नाराजी आहे.

३० नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत तेलंगणामध्ये ७१.३४ टक्के मतदान झाले होते. २०१८ पेक्षा यावेळी दोन टक्के कमी मतदान झालेले आहे.

हे वाचा >> BRS व भाजपात पडद्यामागे हातमिळवणी? खासदाराच्या विधानामुळे तर्क-वितर्कांना उधाण!

२०१८ साली झालेल्या निवडणुकीत तेलंगणा राष्ट्र समितीला (नंतर नाव बदलले) ८८ जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर आंध्र प्रदेशच्या तेलगु देसम पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. एमआयएमने सात जागा जिंकल्या तर भाजपाला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले होते.

केसीआर दोन्हीकडे पिछाडीवर

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) हे गजवेल विधानसभा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. भारत राष्ट्र समितीने २०१४ आणि २०१८ साली हा मतदारसंघात विजय मिळविला होता. काँग्रेस नेते तुमकांता रेड्डी हे सध्या या मतदारसंघातून आघाडीवर आहेत.

आणखी वाचा >> देशकाल: तेलंगणात वारा की वादळ?

केसीआर हे कामारेड्डी या मतदारसंघातूनही निवडणुकीस उभे आहेत. तिथूनही ते पिछाडीवर असल्याचे सध्याच्या आकडीवारीवरून दिसत आहे.