लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचा प्रचार संपला आहे. उद्धव ठाकरेंनी विविध शाखांना भेटी दिल्या. तसंच विक्रोळीतल्या टागोर नगरमध्ये आले. या वेळी सभेत बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांचा उच्चार फडतूणवीस असा केला. देवेंद्र फडणवीस यांना आधीही उद्धव ठाकरेंनी फडतूस असं म्हटलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख फडतूणवीस असा केला आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“ठाणे, कल्याण पालघर या ठिकाणी आपल्या प्रचाराची सभा नाही तर विजयी सभा पार पडली आहे असंच मी म्हणतो. आता केवळ मी तुमचं दर्शन घ्यायला आलो आहे. एका जिद्दीने ईशान्य मुंबईची जागा आपण मागून घेतली आहे. गद्दारांच्या आणि हरामखोरांच्या पालख्या किती काळ वाहायच्या? आजपर्यंत तुम्हाला पालखीत बसवून मिरवलं. ज्यांना पालखीत बसवलं त्यांनी शिवसेनेशी घात केला. शिवसेना संपवायला निघाले, त्यामुळेच त्यांना (भाजपा) राजकारणात संपवावंच लागेल.” असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Video Neeta Ambani Requesting Chats With Rohit Sharma
नीता अंबानी रोहित शर्माला काय म्हणाल्या? मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर ‘ते’ संभाषण कॅमेऱ्यात कैद, Video पाहा
Nitin Gadkari Kundali Predictions
मोदींच्या पंच्याहत्तरीच्या चर्चेत ज्योतिषांची मोठी भविष्यवाणी; २०२६ नंतर गडकरींच्या कुंडलीत राजकीय बहुमानाचा योग
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
sharad pawar narendra modi (4)
“जर मोदींना स्पष्ट बहुमत मिळालं नाही, तर ते…”, शरद पवारांचं मोठं विधान; निवडणूक निकालांबाबत केलं भाष्य!
navi Mumbai lok sabha voting
Maharashtra Lok Sabha Election 2024 Phase 5 Voting Live: महाराष्ट्रात सायंकाळी ५ वाजेपर्यंत ४८.६६ टक्के मतदान!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य

हे पण वाचा- उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर शाब्दिक प्रहार, “टरबूज कोण? मी त्यांना फडतूस, कलंक वगैरे..”

देवेंद्र फडणवीस यांचा फडतूणवीस असा उल्लेख

“मला आत्ता उमेदवार सांगत होते की शिवसैनिकांनी जी धाड टाकली त्यात महिला आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि पोलिसांनी मारहाण केली. मला त्या पोलिसांची नावं हवी आहेत. बघतो मी त्यांचं काय करायचं. पोलिसांनाही सांगतो आहे की तुम्ही भाजपा किंवा फडण.. फडणतूणवीसचे नोकर नाहीत. तुम्ही जनतेचे सेवक आणि मित्र आहात. हे सरकार जातं आहे, आमचं सरकार आल्यावर तुमचं काय करायचं हे ठरवल्याशिवाय मी राहणार नाही हा इशारा मी पोलिसांना देतो आहे. माझा जाहीर इशारा आहे, कुणीही असूदेत. लोकशाहीसमोर तुमची मस्ती आम्ही खपवून घेणार नाही. ज्या ज्या नेभळट पोलिसांनी महिला कार्यकर्त्यांवर हात उचलला आहे त्या हातांचं काय करायचं ते सरकार आल्यावर मी बघून घेतो.” असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

मोदी भ्रमिष्ट झाले आहेत

शिवतीर्थावर मोदी येऊन गेले, शिवाजी पार्क मैदानावर त्यांनी भाषण केलं पण ते भरकटले आहेत, भ्रमिष्ट झाले आहेत. मला नकली संतान आणि शिवसेनेला नकली शिवसेना म्हणत आहेत कारण त्यांच्या मेंदूला शीण आला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या जाहीरनाम्याला मुस्लिमांचा जाहीरनामा म्हणत आहेत, ते म्हणाले हा माओवादी जाहीरनामा आहे, पण निवडणूक रोख्यांचं तुम्ही जे काही केलं ते पाहता तुमचा जाहीरनामा खाओवादी आहे. जिकडे जायचं तिकडे खायचं, कंत्राटदारांची दिवाळी साजरी होते आहे. आपलं सरकार आल्यानंतर मुंबई आणि महाराष्ट्राच्या लुटारूंना मी तडीपार केल्याशिवाय शांत बसणार नाही.