लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुसाठी समाजवादी पक्षाने १५९ उमेदवारांची यादी सोमवारी जाहीर केली. पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांना मैनपुरीतील करहाल येथून आणि तुरुंगात असलेले नेते आझम खान यांना रामपूरमधून उमेदवारी देण्यात आली असून, पक्षाचे आमदार नाहिद हुसेन यांना कैरानातून पुन्हा संधी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी सपमध्ये आलेले राज्याचे माजी मंत्री धरम सिंह सैनी यांना सहारनपूर जिल्ह्यातील नाकुर मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार करण्यात आले आहे. तुरुंगवासात असलेले नेते आझम खान यांना त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून रिंगणात उतरवण्यात आले असून, त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम याला सुअर तांडा येथून पक्षाची उमेदवारी देण्यात आली आहे.