या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमद पटेल यांच्याबद्दल संशय

उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षासोबत आघाडीच्या संदर्भात झालेल्या वादात प्रियंका गांधी यांचे नाव जोडणे, चर्चेसाठी कोण कोण गेले याची नावे उघड करणे यामागे पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे महत्त्व पद्धतशीरपणे कमी करण्याचे प्रयत्न पक्षातूनच झाले आहेत. या संदर्भात अहमद पटेल यांनी केलेल्या ट्वीटकडे लक्ष वेधण्यात येत आहे.

राहुल गांधी यांना अपशकुन करण्यासाठी पक्षातील जुनी नेतेमंडळी कायम प्रयत्नशील असतात. त्यातूनच मागे राहुल यांच्या अध्यक्षपदाचा मुहूर्त चुकला होता. उत्तर प्रदेशात पक्षाला फार काही यशाची अपेक्षा नव्हती. पण समाजवादी पक्षातील अंतर्गत यादवीने काँग्रेसला मित्र पक्ष सापडला. अखिलेश यादव-काँग्रेस आघाडी सत्तेत आल्यास राहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाचा मार्ग लगेचच मोकळा होऊ शकतो. यातूनच उत्तर प्रदेशात विघ्ने आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. जुन्या नेत्यांच्या या साऱ्या उद्योगांमुळेच राहुल गांधीही नाराज असून, या साऱ्यांना घरचा रस्ता दाखविण्याची त्यांची योजना आहे. पण त्यासाठी आवश्यक अध्यक्षपद त्यांना अद्यापही मिळालेले नाही. समाजवादी पक्षाने आघाडीची चर्चा करतानाच काँग्रेसचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची नावे जाहीर केली. ़प्रियंका गांधी यांच्यामुळे आघाडीची गाडी रुळावर आली, असे दिल्लीत चित्र निर्माण करण्यात आले. अखिलेश यांच्याबरोबर चर्चेला कोण गेले याची नावेही माध्यमांकडे पुरविण्यात आली. हे सारे होत असतानाच काँग्रेस अध्यक्षांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांनी ट्वीट करीत आपण चर्चेत नाही, असे स्पष्ट केले. अहमद पटेल यांनी प्रियंकाचा उल्लेख करताना राहुल यांचे नावही घेतले नाही.

मराठीतील सर्व उत्तर प्रदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Internal issue in congress for up election
First published on: 24-01-2017 at 02:34 IST