पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. धन्वंतरी विष्णुचा अवतार असल्याचे मानले जाते. जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णुंनी दिवाळीच्या दोन दिवस अगोदर धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरीचा अवतार धारण केला होता.

नक्की वाचा >> यंदा धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त कधी?

Earth Day History and importance in Marathi
Earth Day 2024 : जागतिक वसुंधरा दिनाची सुरुवात का आणि कधी झाली? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व
SSC CHSL 2024 Recruitment OTR and Application Module
SSC CHSL 2024 Recruitment: बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! अर्ज करताना OTR आणि Live फोटो काढणे आवश्यक
hanuman jayanti 2024 date time shubh muhurat puja mantra and signification
Hanuman Jayanti 2024: २३ की २४ एप्रिल, यंदा हनुमान जयंती कधी आहे? जाणून घ्या योग्य तिथी, पूजेचा मुहूर्त, मंत्र आणि महत्त्व
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व

भगवान धन्वंतरीच्या प्रकटीकरणाच्या दिवशीच धनत्रोयदशी साजरी केली जाते. याव्यतिरिक्त अन्य कारणांनीदेखील धनत्रयोदशी साजरी केली जाते. कार्तिक कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीला धन्वंतरीचा जन्म झाला होता यामुळे या तिथीला धनत्रयोदशी म्हणून ओळखले जाते. धन्वंतरी जेव्हा प्रकट झाले होते तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रकट झाले असल्यामुळे या दिवशी भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन खरेदी केल्याने धनामध्ये १३ पट वाढ होते असे म्हटले जाते देवतांचे वैद्य असलेल्या धन्वंतरीना वैद्यशास्त्राचे देव मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांसाठी हा दिवस फार महत्वाचा असतो. यादिवशी घराबाहेर आणि आंगणात दिवे लावण्याची देखील प्रथा आहे.

या दिवशी सोने अथवा चांदीची खरेदी करणे शुभ मानले जाते. आपल्यावर धनाची कृपा व्हावी म्हणून या दिवशी अनेकजण भांडी आणि दागिन्यांची खरेदी करतात. धातूमुळे नकारात्मक उर्जा नष्ट होत असल्याचे मानले जाते. एवढेच नव्हे तर धातूमधून निर्माण होणारी तरंग लहरी थेराप्यूटिक प्रभाव निर्माण करतात. यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी सोने आणि चादी खरेदीची परंपरा पुर्वापार चालत आली आहे. केवळ सोने अथवा चांदीच नव्हे तर या दिवशी अन्य वस्तूंचीदेखील खरेदी केली जाते. अनेकजण या दिवशी बाईक अथवा कार घेणे पसंत करतात.