News Flash

समजून घ्या सहजपणे: स्पॅनिश फ्लूशी करोनाची तुलना का केली जाते आहे?

स्पॅनिश फ्लूमध्ये मृत्यू दर २.४ टक्के होता असे म्हणतात पण करोनामध्ये तो त्यापेक्षा कमी आहे

समजून घ्या सहजपणे: स्पॅनिश फ्लूशी करोनाची तुलना का केली जाते आहे?

राजेंद्र येवलेकर

आपल्याला नेहमी तुलनेचा मोह आवरत नाही हे खरेच कारण आता जी करोना विषाणूची साथ सुरू आहे त्याची तुलना पहिल्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या स्पॅनिश फ्लूच्या साथीशी केली जात आहे. अशी तुलना करताना तेव्हाची व आताची स्थिती यातील अंतर लक्षात घेणेही तितकेच गरजेचे आहे. स्पॅनिश फ्लूमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आजोबा बळी पडले होते असे म्हणतात. स्पॅनिश फ्लू व करोना या खऱ्या अर्थाने जागतिक साथी आहेत त्यामुळे ही तुलना केली जात आहे आज आपण स्पॅनिश फ्लू व करोना विषाणूमुळे निर्माण झालेला फ्लू यांचा तुलनात्मक आढावा आता घेणार आहोत.

स्पॅनिश फ्लू हा काय प्रकार होता ?

स्पॅनिश फ्लू हा १९१८ मध्ये पसरलेला साथीचा रोग होता तो विषाणूनेच निर्माण झाला. त्यातील विषाणू हा अव्हियन म्हणजे पक्ष्यांमधून आलेला होता पण त्या साथीची भयानकता फार मोठी होती. पहिल्या महायुद्धानंतर पसरलेल्या या विषाणूने ५ ते १० कोटी बळी घेतले होते. पहिल्या महायुद्धात मारले गेले त्यापेक्षा अनेक पटींनी ही संख्या जास्त होती. मानवी इतिहासातील ती सर्वात भयानक साथ होती. पण त्यावेळी प्रतिबंधात्मक उपायांचा फारसा विचार केला गेलेला नव्हता. आता जशी विषाणू प्रतिबंधक औषधे आहेत तशी नव्हती.

तेव्हाही स्पॅनिश फ्लूच्या बातम्या दाबल्या गेल्या होत्या का ?

करोना विषाणूच्या बाबतीत चीन सरकारने सुरूवातीला माहिती दाबून ठेवली पण नंतर ती बाहेर आलीच कारण समाजमाध्यमांतून लोकांनी सरकारवर टीका केली. त्यात काही डॉक्टरांना पोलिसांनी तंबी दिली. आता चीन सरकारविरोधात लेख लिहिणाऱ्या एकाला चीनने अज्ञात ठिकाणी छळछावणीत टाकले आहे, त्या काळात स्पॅनिश फ्लूचे केंद्र स्पेन होते आता करोनाचे केंद्र चीन आहे. त्यावेळी अमेरिका, ब्रिटन व फ्रान्स या देशात हा स्पॅनिश फ्लू पसरला होता. स्पेनमध्ये या रोगाचा प्रसार झाला. तेव्हा स्पेन सोडून इतर देशात वृत्तपत्रे व इतर माध्यमांनी त्याच्या बातम्या लपवल्या. स्पेनमध्ये तेव्हा सेन्सॉरशिप नव्हती. लॉरा स्पिननी यांनी ‘दी गार्डियन’मध्ये लिहिलेल्या लेखानुसार म्हटले आहे की, बातम्या सुरूवातीला दाबण्यात आल्या तरी नंतर स्पेनमध्येच त्याची पहिली बातमी प्रसिद्ध झाली. त्या काळात ब्राझीलने त्याला मुद्दाम जर्मन फ्लू तर सेनेगेलने ब्राझिलियन फ्लू असे नाव दिले होते. आताही चीन व अमेरिका यांच्यात हा विषाणू कुणामुळे पसरला यावरून वादंग सुरूच आहे तसाच हा एकमेकांना दुषणे देण्याचा प्रकार होता.

स्पॅनिश फ्लू व करोना ही नावे कुठून आली ?

स्पॅनिश फ्लू हा मूळ स्पेनमधला त्यामुळे त्याला स्पॅनिश फ्लू असे नाव देण्यात आले होते. कोरोना विषाणूचे मूळ केंद्र हे चीनमधील वुहान आहे त्यामुळे त्याला खरे तर चिनी फ्लू म्हणायला हवे होते पण आता काळ बदलला आहे करोना विषाणूला सीओव्हीआयडी १९ असे शास्त्रीय नाव जागतिक आरोग्य संघटनेने दिले आहे. जागतिक साथीच्या नावाखाली एखाद्या देशाची प्रतिमा खालावून त्याची बदनामी होऊ नये यासाठी ही योग्य पद्धत आहे. पण तरी करोना विषाणूला हे नाव कसे पडले हा प्रश्न आहे तर त्याचे उत्तर असे की, या विषाणूवर काही काट्यासारखे भाग दिसतात त्यामुळे त्याला करोना असे नाव पडले.

करोना व स्पॅनिश फ्लूची तुलना योग्य आहे का ?

लॉरा स्पिननी यांनी त्यांच्या दी गार्डियनमधील लेखात असे म्हटले होते की, अशी तुलना खऱेतर न्याय्य ठरणार नाही कारण आताचा सीओव्हीआयडी विषाणू हा पक्ष्यातून आलेला नाही तर पशुंमधून आलेला आहे. त्याचा पक्ष्यांशी संबंध नाही. स्पॅनिश फ्लूमध्ये गंभीरता जेवढी होती तेवढी करोनाच्या संदर्भात नाही कारण त्यावेळी याच्या लाखो पट अधिक बळी गेले होते. सार्स सोओव्ही २ हा २००२ मध्ये चीन देशात निर्माण झालेल्या सिव्हियर अक्युट रेस्पेरिटरी सिंड्रोमला कारण ठरलेल्या सार्स सीओव्ही १ चे भावंड आहे. मिडल इस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम म्हणजे एमइआरएसची घातकता करोना पेक्षा अनेक पट अधिक होती तो उंटांमुळे पसरला होता.

स्पॅनिश फ्लू प्रमाणे करोना घातक का ठरला नाही ?

स्पिननी यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे स्पॅनिश फ्लूचा विषाणू हा लोकांमधून खूप वेगाने व समान पसरणारा होता. करोना विषाणू हा समूहाच्या माध्यमातून पसरणारा आहे. त्यामुळे स्पॅनिश फ्लू पेक्षा करोना रोखणे सोपे आहे. १९१८ व २०२० या काळातील अंतर यात महत्वाचे आहे. तेव्हापेक्षा या विषाणूवर थेट नसली तरी तर विषाणू मारणारी औषधे उपलब्ध आहेत तेव्हा तीही नव्हती. लोक त्या काळात आरोग्य तज्ञांवर विश्वास ठेवत नव्हते स्पॅनिश शहर जमोरा येथे फ्लूची साथ जोरात असताना तेथील संत रोको यांनी रोज सायंकाळी प्रार्थनेचे आदेश दिले होते विशेष म्हणजे युरोपातील सर्वात जास्त बळी त्याच भागात गेले होते. यावेळी (२०२०) दक्षिण कोरियात एका ख्रिश्चन पंथाच्या अनुयायांमुळे सीओव्हीआयडी १९ पसरला हेही तेवढेच खरे आहे फक्त त्यासाठी कुणी प्रार्थनेचे आदेश दिलेले नव्हते. स्पॅनिश फ्लूमध्ये मृत्यू दर २.४ टक्के होता असे म्हणतात पण करोनामध्ये तो त्यापेक्षा कमी आहे.

राजेंद्र येवलेकर

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2020 5:49 pm

Web Title: do you know what is the difference between spanish flu and corona virus scj 81
टॅग : Coronavirus
Next Stories
1 समजून घ्या सहज सोपे: जवळचा मित्र इराण भारतावर का उलटला ?
2 Coronavirus: समजून घ्या सहजपणे : भारताने केले स्वत:ला ‘विलग-बंदिस्त’
3 समजून घ्या सहजपणे : जागतिक साथ (pandemic) म्हणजे काय?
Just Now!
X