ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू. सामान्यपणे अगदीच सहाजिक गोष्ट असल्याप्रमाणे आपण ऑक्सिजनकडे फारसं लक्ष देत नाही. मात्र मागील काही काळापासून देशभरामध्ये करोनाची दुसरी लाट अधिक घातक असल्याचे समोर येत असतानाच ऑक्सिजन आणि रुग्णालयांमध्ये होणारा ऑक्सिजन पुरवठा देशभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

थेट श्वसन यंत्रणेवर, फुफ्फुसांवर आणि शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर घात करणाऱ्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरामध्ये हाहाकार उडालाय. ऑक्सिजनला देशभरातून मागणी वाढली आहे. त्यामुळेच अनेक मोठ्या कंपन्यांनीही आता आवश्यकतेनुसार रुग्णालयांमध्ये वापरणारल्या जाणाऱ्या ऑक्सिजनचा पुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र रुग्णालयांमध्ये पुरवला जाणारा ऑक्सिजन हा निसर्गामध्ये उपलब्ध असणाऱ्या ऑक्सजिनप्रमाणे नसतो. मेडिकल ऑक्सिजन म्हणजे काय?, तो कसा पुरवला जातो आणि त्याचा फायदा कसा होतो अशा अनेक गोष्टी सर्वसामान्यांना ठाऊक नसतात त्याचसंदर्भात आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

How useful was the Green Revolution really
हरितक्रांती खरंच कितपत उपयुक्त ठरली?
How to Identify Chemically Injected Watermelon FSSAI Suggestion
कलिंगड सुया टोचून, पावडर घालून पिकवलाय का हे एका झटक्यात ओळखा; ‘या’ खुणा पाहूनच करा खरेदी
madhya pradesh high court marathi news, live in relationship marathi news
लिव्ह-इन हे कायद्याने शक्य आहे म्हणजे व्यवहार्य आहेच असे नाही… मध्यप्रदेश उच्च न्यायालयाचे निरीक्षण
bhang uses
विश्लेषण : भांगेचे ‘हे’ गुणकारी फायदे माहीत आहेत का?

रुग्णालयामध्ये प्रामुख्याने तीन पद्धतीचा ऑक्सिजन पुरवला जातो…

पहिला प्रकार > व्हीआयई

व्हॅक्युम इन्सुलेटेड इव्हॉपरेटर असा व्हीआयईचा फुलफॉर्म आहे. मोठ्या प्रमाणात द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन जेव्हा रुग्णालयांना पुरवला जातो तेव्हा त्याला व्हीआयई असं म्हणतात.

दुसरा प्रकार > ऑक्सिजन सिलिंडर

सर्वसामान्यांना ठाऊक असणारा हा प्रकार म्हणजे ऑक्सिजन गॅस उच्च दाबाखाली सिलिंडरमध्ये भरुन वापरला जातो.

तिसरा प्रकार > ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स

सामान्यपणे हवेत उपलब्ध असणारा ऑक्सिजन हवेतून खेचून रुग्णांना पुरवणारे यंत्र म्हणजे कॉन्सट्रेटर्स. हवेतील ऑक्सिजनवर एका छोट्या यंत्राच्या सहाय्याने प्रक्रिया करुन तो रुग्णांजवळ सातत्याने सोडला जातो. ज्यामुळे रक्तात कमी ऑक्सिजन असणाऱ्या रुग्णांना फायदा होतो. हवा शुद्ध करुन अधिक ऑक्सिजन असणारी हवा सोडणाऱ्या यंत्रांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स म्हणतात.

व्हीआयई कसं काम करतं?

> व्हॅक्युम इन्सुलेटेड इव्हॉपरेटर हे द्रव्य स्वरुपात असणारा ऑक्सिजन वायू स्वरुपात बदलतात. क्रायोजेनिक म्हणजेच नैसर्गिक अवस्थेत वायू स्वरुपात असणाऱ्या पदार्थांना द्रव्य स्वरुपात साठवण केली जाते. असा वायूचा साधा नंतर पुन्हा वापरण्यासाठी वायू स्वरुपात आणताना व्हीआयईचा वापर केला जातो. द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची वाफ करुन तिचे केंद्रीकरण म्हणजेच कॉन्सट्रेटेड स्वरुप करुन तो रुग्णांना पुरवला जातो.

> गरजेप्रमाणे मोठ्या साठ्यामध्ये ऑक्सिजन सोडला जातो. तो व्हेपरायझर म्हणजेच जिथे द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजनची वाफ होते अशा भागातून पाठवला जातो. त्यानंतर हा वायू स्वरुपातील ऑक्सिजन वॉर्डनुसार विभागणी करुन प्रत्येक वॉर्डमधील रुग्णापर्यंत पोहचवला जातो.

> ज्यावेळी हा ऑक्सिजन द्रव्य स्वरुपातून वायू स्वरुपामध्ये बदलला जातो आणि तो रुग्णालयांमधील ऑक्सिजन वायू वाहून नेणाऱ्या पाईपद्वारे नियोजित वॉर्डात पोहचवला जातो तेव्हा त्यावरील दाब रेग्युलेटरच्या माध्यमातून नियंत्रित केला जातो. म्हणजेच पुरवठा केला जाणारा ऑक्सिजन हा एका ठराविक प्रेशरमध्येच रुग्णांना पुरुवला जातो.

> सामान्यपणे हे प्रेशर ३४५-३८० केपीए (किलोपास्कल) किंवा (५०.० ते ५५.१ पीएसआय (पाऊण्ड पर स्वेअर इंच)) इतकं असतं. युके आणि युरोपियन पद्धतीने सांगायचं झाल्यास तिथे हे प्रेशर चार ते पाच बार म्हणजेच ४००-५०० केपीए (किलोपास्कल) किंवा (५८ ते ७३ पीएसआय (पाऊण्ड पर स्वेअर इंच)) इतकं असतं.

समजून घ्या >> आता महाराष्ट्रात करोना रूग्णसंख्या वाढण्याची शक्यता कमी, कारण…

> द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन हा उणे १६० अंश तापमानाला साठवला जातो तिथून त्याला पुन्हा वायू स्वरुपात बदलण्यासाठी व्हेपरायझरमध्ये पाठवलं जातं. त्यानंतर एका नियंत्रित खटक्याच्या माध्यमातून त्याला प्रेशर रेग्युलेटरमध्ये सोडलं जातं. तिथे योग्य आणि नियोजित दाबाखाली हा वायू नियंत्रित केला जातो आणि त्यानंतरच तो रुग्णालयांमधील वायू वाहिन्यांमध्ये सोडला जातो. योग्य प्रक्रिया करुन रुग्णांपर्यंत ठराविक दाबाखाली ऑक्सिजन सोडण्यात आला नाही तर ते रुग्णाच्या जीवासाठी घातक ठरु शकतं.

> मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी टँकर्सचा वापर केला जातो. या टँकर्समध्ये आर्टिफिशियल प्रेशरच्या मदतीने द्रव्य स्वरुपातील ऑक्सिजन भरला जातो आणि तो ठिकठिकाणी पोहचवला जातो. मात्र या टँकरचा अपघात झाल्यास बाहेर पडणारा ऑक्सिजन हा जीवघेणा असतो कारण त्यावर योग्य पद्धतीने प्रक्रिया केलेली नसते. या टँकरमधून ऑक्सिजन बाहेर पडला तर तो वायू स्वरुपातच पडतो पण तो मनुष्यासाठी घातक ठरतो. अशाप्रकारचा अपघात आज (२१ एप्रिल २०२१ रोजी) नाशिकमध्ये घडल्याने ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणा कोलमडली आणि २२ जणांना प्राण गमवावे लागले.

ऑक्सिजन सिलिंडर कसा काम करतो?

> या सिलिंडरच्या आकारावरुनच हा व्हॅक्युम इन्सुलेटेड इव्हॉपरेटरपेक्षा कमी प्रमाणात असतो हे स्पष्ट होतं. सामान्यपणे छोट्या मेडिकल सेंटर्सवर कमी प्रमाणात गरज असणाऱ्या ठिकाणी हे ऑक्सिजन सिलिंडर वापरले जातात. हे ऑक्सिजन सिलिंडर एखाद्या मध्यम उंचीच्या व्यक्तीएवढे असतात. सिलिंडरच्या वरच्या बाजूला गोलाकार व्हॉलव्ह असतो.

> याच व्हॉलव्हच्या खालोखाल लगेच फ्लो अॅडजेस्टमेंट रेग्युलेटर असतो. त्याला ९० डिग्रीमध्ये एक छोटा पाईप जोडण्यात आलेला असून ज्यामधून पुढे अॅडॅप्टर जोडला जातो. अॅडप्टरखाली ह्युमिडिफाइड बॉटल आणि त्या खाली नेझल ट्यूब म्हणजेच बारी नळी असते, ज्यामधून ऑक्सिजन मास्कपर्यंत पोहचतो.

> या सिलिंडरमधून ऑक्सिजन मास्क, नेझल कॅन्यूअल, ऑक्सिजन टेंट आणि हायपर बॅरिक पद्धतीने ऑक्सिजन पुरवला जातो.

ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स म्हणजे काय ते कुठे वापरतात?

> ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स हे अशा ठिकाणी वापरतात तिथे व्हॅक्युम इन्सुलेटेड इव्हॉपरेटर किंवा सिलिंडर ऑक्सिजन पुरवला जाऊ शकत नाही.

> ज्या लोकांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे अशा लोकांना हे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स मदत करतात. एखाद्या पंख्याप्रमाणे ते विजेवर चालतात. काही कॉन्सट्रेटर्स हे बॅटरीवरही चालतात. मुळात हे कॉन्सट्रेटर्स ऑक्सिजन एका ठिकाणी गोळा करण्यास मदत करतात.

कॉन्सट्रेटर्सची संकल्पना काय?

> ऑक्सिजन कॉन्सट्रेटर्स हवा खेचतात आणि ती शुद्ध करतात. ती इतकी शुद्ध करतात की त्यामध्ये ९० ते ९५ टक्के ऑक्सिजन असतो. नंतर हीच हवा ते बाहेर फेकतात ज्याचा रुग्णांना फायदा होतो.

> सामान्यपणे हवेत ७८ टक्के नायट्रोजन, २०.९ टक्के ऑक्सिजन, ०.१७ टक्के इतर वायू, ०.९० टक्के अरगॉन आणि ०.०३ टक्के कार्बन डायऑक्साइड असतो.

> कॉन्सट्रेटर्स काम कसं करतात हे पाच सोप्प्या टप्प्यांमध्ये सांगायचं झाल्यास…

१) घरातील उपकरणांप्रमाणे विजेच्या मदतीने कॉन्सट्रेटर्स सुरु केल्यानंतर ते हवा आत खेचतात.

२) हवेतील ऑक्सिजन कम्प्रेस करतात

३) आत खेचलेल्या हवेतील नायट्रोजन बाहेर फेकतात.

४) उरलेली हवा कशापद्धतीने बाहेर सोडायची यासंदर्भातील नियंत्रण ऑटो मोडवर ठरवतात.

५) ऑक्सिजनचं प्रमाण अधिक असणारी हवा बाहेर फेकतात.

कॉन्सट्रेटर्स काम कसं करतात?

> कॉन्सट्रेटर्स जिथून हवा आत खेचतात तिथे मॉनेटर किंवा कम्पेसर असतात. हवा खेचल्यानंतर तिच्यावर दाब दिला जातो आणि ति पुढे ढकलली जाते.

> पुढे गेल्यावर ही हवा इन बिल्ट हिटरमुळे गरम होते.

> गरम हवेला सामावून घेण्यासाठी आतमध्ये सर्ज टँक म्हणजेच हवेचा आकार वाढल्याने ती साठवण्यासाठी सिलिंडरसारखा भाग असतो.> त्यानंतर ही हवा बेड फिल्टर्समध्ये पाठवली जाते.

> या बेड फिटर्समध्ये असणाऱ्या झोलाइटच्या मदतीने हवेतील नायट्रोजन काढून घेतला जातो.

> उरलेली हवा ज्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण अधिक असतं ती प्रोडक्ट टँकमध्ये जाते जिथून ती रेग्युलेटरच्या माध्यमातून पुन्हा बाहेर फेकली जाते.