26 January 2021

News Flash

सिडनीत खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला ‘पिंक टेस्ट’ का म्हटलं जातं?

तिसरा कसोटी सामना सिडनीमध्ये

अॅडिलेड येथे याआधीच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पिंक बॉल कसोटी सामना झाला आहे. आता दोन्ही संघामध्ये सिडनी क्रिकेट मैदानावर “पिंक टेस्ट” (Pink Test) सामना खेळवला जाणार आहे. आता तुम्ही विचार करत असाल की पुन्हा भारतीय संघ दिवसरात्र कसोटी सामना खेळणार का? पण असं काही नाही. । सिडनी येथे खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्याला पिंक टेस्ट म्हणून ओळखलं जातं. या सामन्यात यजमान संघातील खेळाडू गुलाबी टोपी घालून मैदानात उतरतात. या सामन्यातून मिळणारा फंड एखाद्या चांगल्या कामासाठी वापरला जातो. जाणून घेऊयात पिंक टेस्ट म्हणजे नेमकं काय?

माजी वेगवान गोलंदाजा ग्लेन मॅकग्रा याच्या सेवाभावी संस्थेला मागील १२ वर्षांपासून क्रिकेट ऑस्ट्रेलिया मदत करत आहे. त्यासाठी सिडनी येथे पिंक टेस्ट आयोजन करण्यात येतं. ग्लेन मॅकग्रा याची सेवाभावी संस्था ब्रेस्ट कॅन्सरबाबत समाजात जागरुकता करत आहे. त्याशिवाय ब्रेस्ट कॅन्सर असणाऱ्यांच्या उपचारासाठी पैसेही गोळा करत आहे. या सेवाभावी संस्थेची स्थापना ग्लेन मॅकग्रानं २००५ मध्ये केली. पहिली पत्नी जेन हिच्या निधनानंतर ग्लेन मॅकग्रा आपल्या ब्रेस्ट कॅन्सच्या सेवभावी संस्थेची स्थपाना केली. ग्लेन मॅकग्राच्या पत्नीच्या नावामुळे सिडनी कसोटीच्या तिसऱ्या दिवसाला जेन मॅकग्रा डे म्हणूनही ओळखलं जातं.

२००९ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यादरम्यान पहिला पिंक टेस्ट सामना खेळवण्यात आला होता. २०१८-१९ मध्ये नूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पिंक टेस्ट सामना झाला होता. या सामन्यातून ग्लेन मॅकग्रा याच्या सेवाभावी संस्थेला $1.2 मिलियनपेक्षा जास्त फंड मिळाला होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सात जानेवारीपासून पिंक टेस्ट सामन्याला सुरुवात होणार आहे. जो संघ या सामन्यात विजय मिळवेल तो संघ बॉर्डर गावसकर मालिकेत २-१ ने आघाडी घेईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2020 1:32 pm

Web Title: explained why is the scg test called the pink test nck 90
Next Stories
1 समजून घ्या : मेलबर्न कसोटीतला विजय भारतीय संघासाठी महत्वाचा का ठरतो?
2 समजून घ्या : ‘वन नेशन, वन मोबिलिटी कार्ड’; काय आहे पंतप्रधानांची महत्वाकांक्षी योजना?
3 समजून घ्या : …म्हणून विराटपेक्षा अजिंक्यचं नेतृत्व ठरतंय वेगळं
Just Now!
X