जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करुन जैश-ए-मोहम्मदचा तळ उद्धवस्त केला होता. त्यानंतर दुसऱ्यादिवशी २७ फेब्रुवारीच्या सकाळी काश्मीरच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी फायटर विमाने घुसली होती. भारताच्या मिग-२१ बायसन आणि सुखोई ३०-एमकेआय या फायटर विमानांनी पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नाही. या डॉगफाइटमध्ये (दोन फायटर जेट्सची हवेत लढाई होते त्याला डॉगफाइट असं म्हणतात,) पाकिस्तानच्या एफ-१६ विमानामधून अम्राम क्षेपणास्त्रांनी मारा केला होता. त्यावेळी राफेल विमाने ताफ्यात असती तर चित्र आज वेगळे असते. यामागील मुख्य कारण म्हणजे राफेल विमानांमध्ये असणारे मिटिऑर हे क्षेपणास्त्र.

मेटेओर मिसाइल महत्वाचे का हे आधी अगदी थोड्यात जाणून घेऊयात…

मिटिऑर हे एअर टू एअर म्हणजेच हवेतून हवेत मारा करण्यासाठीचे सर्वोत्तम क्षेपणास्त्र आहे. बियाँड व्हिज्युअल रेंज म्हणजे नजरेपलीकडच्या लक्ष्याचा अचूक वेध घेणारे हे क्षेपणास्त्र आहे. मिटिऑर क्षेपणास्त्राद्वारे १२० ते १५० किलोमीटर अंतरावरील शत्रूचे फायटर विमान पाडणे शक्य आहे. सध्याच्या घडीला चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडे मिटिऑरसारखे अत्याधुनिक क्षेपणास्त्र नाही. २७ फेब्रुवारीला पाकिस्तानच्या एफ-१६ फायटर विमानांनी भारताच्या फायटर विमानांवर अम्राम मिसाइल्स डागले होते. अम्राम सुद्धा १०० किमी रेंज असलेले बियाँड व्हिज्युअल रेंज मिसाइल आहे. त्यावेळी आपल्या सुखोई फायटर विमानांनी ही सर्व अम्राम मिसाइल्स यशस्वीरित्या चुकवली होती. त्यामुळे तेव्हा भारताकडे राफेल असते तर पाकिस्तानी हवाई दलाच्या विमानांना भारताने चांगलीच अद्दल घडवली असते. मात्र आता यापुढे भारत आणि पाकिस्तानमध्ये बालाकोटनंतर निर्माण झालेल्या परिस्थितीप्रमाणे तणाव निर्माण झाला आणि त्यामधून हवाई युद्ध झाले तर भारताची राफेल विमाने थेट नजरेच्या पलीकडील लक्ष्याचा वेध घेत अगदी १२० ते १५० किमी दूरवर असणारे विमान सहज पाडू शकतील. विशेष म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतरही त्याचा नियोजित मार्ग बदलता येतो. त्यामुळे हे अधिक घातक आणि परिणामकारक ठरते. म्हणूनच हे क्षेपणास्त्र राफेच्या माध्यमातून भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात शामिल होणे हे अनेक अर्थांनी खास आहे.

What is space tourism Gopi Thotakura to be the first Indian space tourist
भारतीय व्यक्ती पहिल्यांदाच करणार अंतराळ पर्यटन; काय आहेत त्यामधील आव्हाने?
Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
india military attaches
आफ्रिकन देशांमध्ये भारत डिफेन्स अटॅची का तैनात करत आहे? त्यांचे नेमके कार्य काय?
chip manufacturing infrastructure
पोस्टाच्या तिकिटाएवढी दिसणारी सेमीकंडक्टर चिप नक्की कशी तयार होते?

आता हे मेटेओर खास का आहे त्याबद्दल थोडं सविस्तर जाणून घेऊयात…

मागील अडीच दशकांपासून हवाई युद्धामध्ये अत्यंत महत्वाचे आणि कायमच ज्या विमानाबद्दल आदरयुक्त दबदबा राहिला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे या विमानामधील क्षेपणास्त्र. त्यातही खास करुन विमानामधील एमबीडीएचे मिटिऑर हे क्षेपणास्त्र हवेतून हवेत मारा करु शकतं आणि ते ही व्हिज्युएल रेंजच्या पुढे म्हणजेच समोरचे लक्ष्य दिसत नसले तरी या क्षेपणास्त्राच्या मदतीने त्याचा वेध घेता येतो. मिटिऑर क्षेपणास्त्र हे इतर कोणताही हवेतून हवेत मार करणाऱ्या क्षेपणास्त्रापेक्षा वेगळे कसे आहे हेच आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत. सर्वात दोन महत्वाच्या गोष्टी ज्या मिटिऑरला इतरांपेक्षा वेगळं बनवातात त्या म्हणजे

अ) प्रोपल्शन सिस्टीम आणि
ब) कम्युनिकेशन सिस्टीम

अ) प्रोपल्शन सिस्टीम >> सर्वात पहिले कारण म्हणजे या विमानाची प्रोपल्शन सिस्टीम. ही सिस्टीम काय आहे हे आपण पाच मुख्य मुद्द्यांच्या मदतीने समजून घेणार आहोत.

१)
पारंपारिक पद्धतीच्या रॉकेट मोटरऐवजी मिटिऑर क्षेपणास्त्रात जीएमबीएचचे घन इंधन, व्हेरिएबल फ्लो, डक्टेड रॉकेट सिस्टम यासारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरले जाते. याला रॅमजेट देखील म्हणतात. रॅमजेट प्रोपल्शन तंत्रज्ञानामुळे लक्ष्याचा वेध घेताना मिटिऑरला इंजिनमध्ये जाणार्‍या वाफेचे नियंत्रण ठेवता येते. म्हणजेच इंजिनवर अधिक जास्त सक्षमपणे नियंत्रण ठेवणे शक्य होते. यामुळे लक्ष्याचा वेध घेताना अधिक वेगाने जाण्याबरोबरच ऊर्जेचा वापरही अधिक सक्षमपणे आणि गरजेनुसार करता येणे शक्य होते. सामान्यपणे इतर कोणत्याही हवेतून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये हा पर्याय उपलब्ध नसतो. त्यामुळेच मिटिऑर क्षेपणास्त्र हे इतर कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा उजवे ठरते.

२)
“रॅमजेट मोटरमुळे (प्रोपल्शन सिस्टीम) मिटिऑरला थेट लक्ष्याचा भेद घेण्यापर्यंत ऊर्जेचा साठा होत राहतो. त्यामुळे मिटिऑर क्षेपणास्त्र हे हवेतून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये सर्वाधिक नो एस्केप झोन म्हणजेच ज्यापासून बचाव करणं शक्य होणार नाही असं शस्त्र आहे,” अशी माहिती या तंत्रज्ञानासंदर्भात एमबीएडीच्या वेबसाईटवरील लेक्चरमध्ये देण्यात आली आहे. एमबीडीए ही क्षेपणास्त्रांसदर्भात इंत्यंभूत माहिती देणारी नावाजलेली वेबसाईट आहे.

३)
आता या तांत्रिक भाषेमध्ये सांगण्यात आलेल्या व्याख्याचे अर्थ काय असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा मिटिऑर क्षेपणास्त्र डागले जाते तेव्हा ते स्वत:च्या ऊर्जेवर नियंत्रण ठेवत मर्यादित वेगाने म्हणजेच क्रुझ फेजमध्ये प्रवास करु शकते. आपल्या लक्ष्याचा वेध घेताना ते ऊर्जेवर नियंत्रण ठेवत मिटिओर लक्ष्याच्या दिशेने जाते. यामुळे क्षेपणास्त्रामधील इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत होते. मात्र जेव्हा हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याच्या जवळ पोहचते तेव्हा प्रवासादरम्यान वाचवलेल्या ऊर्जेचा वापर करते. लक्ष्य जवळ आल्यानंतर संपूर्ण ताकद वापरुन हे क्षेपणास्त्र सर्वाधिक वेगाने लक्ष्याचा भेद घेण्यास सक्षम आहे.

४)
या उलट हवेतून हवेत मारा करणारी इतर क्षेपणास्त्रे ही डागल्यानंतर लक्ष्याचा भेद घेईपर्यंत एकाच पद्धतीने ऊर्जेचा वापर करतात. विमानापासून ते लक्ष्यापर्यंत प्रवास आणि त्यानंतर लक्ष्याचा भेद घेतानाही एकाच स्तरावरील ऊर्जा हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे वापरतात. त्यामुळे लक्ष्य जर दूर अंतरावर असेल तर सामान्य क्षेपणास्त्राला लांब पल्ल्याचा प्रवास करुन जास्त परिणामकारकपणे लक्ष्याचा भेद घेऊन ते उद्धवस्त करता येत नाही. मात्र रॅमजेट पद्धतीमध्ये हे सहज शक्य आहे.

५)
आपल्या टर्मिनल फेजमध्ये म्हणजेच क्षेपणास्त्र डागल्यानंतर समोरच्या लक्ष्याकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यामध्ये मिटिऑर क्षेपणास्त्राची कमीत कमी ऊर्जा खर्च होते. थोड्यात सांगायचं झाल्यास रॅमजेट तंत्रज्ञानावर काम करणारे मिटिऑर क्षेपणास्त्र हे इतर कोणत्याही हवेतून हवेत मार करणाऱ्या क्षेपणास्त्रापेक्षा अधिक अचूकपणे लक्ष्यभेद करु शकते. यामुळेच मिटिऑर क्षेपणास्त्रालाचा नो एस्केप झोन हा इतर कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा अधिक आहे. म्हणजेच हवेमधून प्रवास करताना एखाद्या लक्ष्यावर हे क्षेपणास्त्र डागले तर ते त्या लक्ष्याचा भेद घेण्याची शक्यता इतर कोणत्याही क्षेपणास्त्रापेक्षा अनेकपटींनी अधिक आहे.

ब) कम्युनिकेशन सिस्टीम >> प्रोपल्शन सिस्टीम दुसरा महत्वाचा मुद्दा जो मिटिऑरला अधिक घातक बनवतो तो म्हणजे यामधील संवाद साधण्याची यंत्रणा म्हणजेच कम्युनिकेशन सिस्टीम.

१)
कोणत्याही क्षेपणास्त्रांनी त्यांचे लक्ष्य अचूकपणे गाठण्यासाठी ती डागल्यानंतर त्यांच्या मार्गामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा करण्याच्या उद्देशाने मिड-कोर्स अपडेट आवश्यक असतात. म्हणजेच क्षेपणास्त्र डागल्यानंतर ते लक्ष्याचा वेध घेण्याआधी त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार बदल केल्यास ते अधिक परिणामकारक ठरते.

२)
लक्ष्याच्या ठिकाणासंदर्भात क्षेपणास्त्राकडे अचूक आणि अद्यावत माहिती असेल तर लक्ष्याचा वेध अधिक अचूकपणे घेतला जाण्याची शक्यता ही अधिक असते.

३)
मिटिऑर क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याला असे महत्वाचे अपडेट्स हे ते डागण्यात आलेल्या फायटर विमानाबरोबरच थर्ड पार्टीकडूनही ही माहिती देता येते. या थर्डी पार्टीमध्ये इतर सहाय्यक विमाने, हवेतील धोक्यासंदर्भात इशारा देणाऱ्या यंत्रणा आणि नियंत्रित विमाने आणि जमीनीवरुन तसेच जहाजांवरील रडार सिस्टीमचा समावेश होतो. म्हणजे हे क्षेपणास्त्र डागल्यानंतर त्याला लक्ष्याचा वेग, लक्ष्याची सध्याची लोकेशन अशी सर्व माहिती पुरवणे सहज शक्य आहे.

४)
एकदा का मिटिऑर डागले की त्याला कोणत्याही माध्यमातून डेटा फिड करता येऊन शकतो. यामुळे अधिक दूरच्या पल्ल्यापर्यंत लक्ष्याचा पाठलाग करणे शक्य होते. अगदी विमानाच्या क्षमतेपेक्षाही अनेक पटींनी दूरवर असलेल्या लक्ष्याचा या तंत्रज्ञानामुळे वेध घेता येतो.