History of 200 year’s old condom video viral: अ‍ॅमस्टरडॅममध्ये एका जगप्रसिद्ध संग्रहालयात सध्या एक अशी वस्तू प्रदर्शनात ठेवली आहे, जिच्याबद्दल ऐकताच अनेकांच्या भुवया उंचावतील! २०० वर्षांपूर्वी, एका मेंढीच्या आतड्यापासून एक खास वस्तू तयार करण्यात आली होती आणि ती म्हणजे गर्भनिरोधक अर्थात कंडोम! हा गर्भनिरोधक साधा-सुधा कंडोम नसून ती एक कामोत्तेजक कलाकृती असल्याचे मानले जात आहे.

सेफ सेक्स

अ‍ॅमस्टरडॅममधील रिज्क्सम्युझियममध्ये ‘Safe Sex?’ या विशेष प्रदर्शनात, डच आणि फ्रेंच चित्र- कलाकृतींबरोबर हा गर्भनिरोधक काचेच्या पेटीत ठेवण्यात आला आहे. १९ व्या शतकातील हा गर्भनिरोधक म्युझियमच्या कलासंग्रहात समाविष्ट होणारा पहिलाच आहे. यापूर्वी कोणत्याही म्युझियमने गर्भनिरोधक कंडोम प्रदर्शनासाठी ठेवलेला नव्हता.

या गर्भनिरोधकाची निर्मिती सुमारे १८३०च्या सुमारास मेंढीच्या आतड्यांपासून करण्यात आली होती. तो १९ व्या शतकातील पॅरिसमधील एका उच्चभ्रू शरीरविक्रयालयात सापडला.

Voila, mon choix

या गर्भनिरोधकावर एक कामोत्तेजक चित्र आहे. या चित्रात अर्धवस्त्रात असलेली एक महिला अर्धवस्रातील तीन पुरुषांकडे बोट दाखवत आहे. त्यावर “Voila, mon choix” म्हणजेच ‘हीच माझी निवड आहे’ असं वाक्य अंकित केले आहे.

सुशिक्षित आणि सुसंस्कृत माणसाचा गर्भनिरोधक

रिज्क्सम्युझियमच्या क्युरेटर जॉईस झेलेन सांगतात, “या गर्भनिरोधकावरील चित्र ग्रीक पुराणकथांतील ‘जजमेंट ऑफ पॅरिस’ या कथेचा संदर्भ देणारे आहे. या कथेत, ट्रॉयचा राजकुमार पॅरिस याला तीन देवींपैकी सर्वात सुंदर कोण आहे हे ठरवण्यास सांगितले जाते. म्हणूनच आम्हाला वाटते की, हा गर्भनिरोधक ज्याने विकत घेतला, तो माणूस नक्कीच सुशिक्षित आणि सुसंस्कृत असावा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Video Courtesy: TheArtRevival (@theartrevival)

९० हजाराचा गर्भनिरोधक

  • हा गर्भनिरोधक गेल्या नोव्हेंबरमध्ये हार्लेममधील लिलावात भारतीय किंमतीनुसार तब्बल ९० हजाराला खरेदी करण्यात आला होता. ‘Safe Sex?’ या लघुप्रदर्शनात तो मुख्य आकर्षण ठरला असून, यात डच आणि फ्रेंच छपाईचित्रे व रेखाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. या प्रदर्शनाचा विषय लैंगिक आरोग्य आणि देहविक्रीव्यवसाय या मुद्द्यांभोवती फिरतो.
  • १८३९ साली वल्कनाइज्ड रबरचा शोध लागण्यापूर्वी कंडोम तयार करण्यासाठी linen, animal membranes किंवा अगदी कासवाच्या कवचाचा सुद्धा वापर केला जात असे.
  • मात्र, या पारंपरिक गर्भनिरोधकामुळे लैंगिक संबंधातून पसरणाऱ्या सिफिलिस सारख्या आजारांपासून फारशी सुरक्षा मिळत नसे, तसेच गर्भधारणाही रोखता येत नव्हती.
  • “१८३०च्या दशकात जेव्हा हा गर्भनिरोधक कंडोम तयार करण्यात आला, तेव्हा एकूणच कंडोमचा वापर समाजात, विशेषतः चर्चकडून निषेधार्ह मानला जात होता,” असे झेलेन यांनी सांगितले.
  • “गर्भनिरोधक मुख्यत्त्वे देहविक्रीची ठिकाणे किंवा तेथील दुकानात गुपचूप विकले जात असत. तरीही, काही लक्झरी वस्तूंची दुकाने वैयक्तिक मापानुसार तयार केलेलं खास गर्भनिरोधक देत असत, अशाही काही नोंदी आढळतात,” असे त्या पुढे म्हणाल्या.

तो प्रत्यक्षात कधीच वापरलेला नाही

हा गर्भनिरोधक २० सेंमी लांब आहे. झेलेन सांगतात की, “आम्ही हा गर्भनिरोधक यूव्ही लाईटखाली तपासला असता तो प्रत्यक्षात कधीच वापरलेला नाही, हे लक्षात आलं.”

(Photo: Kelly Schenk/Rijksmuseum via AP
(Photo: Kelly Schenk/Rijksmuseum via AP)

‘हे तर अगदी माझ्यासाठीच आहे!

  1. त्यांनी मिश्कील टिपणी करत पुढे सांगितलं की, चित्रातली महिला बोट नेमकं कुणाकडे दाखवतेय हे सांगणं कठीण आहे.
  2. त्या व्यक्तीला टक्कल आहे का? किंवा ती बारीक आहे का? की तो पोटसुटलेला स्थूल गृहस्थ आहे, हे निश्चित सांगता येत नाही आणि म्हणूनच हे चित्र इतकं हुशारीने रेखाटलेलं आहे की, ते पाहून कुठलाही पुरुष मनात म्हणू शकतो ‘हे तर अगदी माझ्यासाठीच आहे!
  3. मेंढीच्या आतड्यांपासून तयार केलेला, अर्धवस्त्र महिलेचे चित्र असलेला आणि आजवर कधीही न वापरलेला वापरला हा ९०,००० रुपयांचा गर्भनिरोधक काहींना ‘Safe Sex’ प्रदर्शनाच्या नावाखाली लैंगिक शिक्षणाचा भाग वाटू शकतो, तर काहींसाठी ही एक कामोत्तेजक कलाकृती असू शकते.
  4. परंतु, काचेच्या पेटीतील या बंदिस्त गर्भनिरोधक कंडोमने इतिहासातलं एक गुपित उलगडलं आहे. असं असलं तरी, त्या महिलेचं बोट नक्की कुणाकडे आहे, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.