Cannes Film Festival यंदाचा कान फिल्म फेस्टिवल भारतासाठी खूप खास राहिला. १४ ते २५ मेदरम्यान पार पडलेल्या या कान फिल्म फेस्टिवलमध्ये अनेक भारतीय कलाकारांनी प्रमुख पारितोषिके जिंकली आणि त्यांच्या कामांसाठी समीक्षकांनीही त्यांची प्रशंसा केली. दिग्दर्शिका पायल कपाडियाची डेब्यू फीचर फिल्म ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’ने प्रतिष्ठित ग्रॅण्ड प्रिक्स पारितोषिक जिंकले. भारतीयांनी तयार केलेले अनेक चित्रपट यंदा स्पर्धेत होते. त्यामध्ये भारतीय अभिनेत्री अनसूया सेनगुप्तालाही सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. बल्गेरियन दिग्दर्शक कॉन्स्टँटिन बोजानोव्ह दिग्दर्शित ‘द शेमलेस’मधील तिच्या भूमिकेसाठी ‘अन सर्टन रिगार्ड प्राइज सेगमेंट’मध्ये तिला पुरस्कार मिळाला. ‘कान’मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार मिळविणारी ती पहिली भारतीय ठरली. त्यामुळे हे म्हणणे वावगे ठरणार नाही की, यंदाचा महोत्सव भारतीयांनी गाजवला.

चित्रपटांव्यतिरिक्त हा महोत्सव दरवर्षी उपस्थितांच्या फॅशनने सातत्याने लक्ष वेधून घेतो. वर्षानुवर्षे भारतीय कलाकारही या महोत्सवात उपस्थिती दर्शवत आले आहेत. प्रत्येक कान फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कलाकारांचे पोशाख चर्चेचा विषय ठरतात. मात्र, कान फिल्म फेस्टिवलला चित्रपटसृष्टीत इतके महत्त्व का? याची सर्वत्र इतकी लोकप्रियता का? कान फिल्म फेस्टिवलची सुरुवात कधी आणि कशी झाली? याविषयी सविस्तर जाणून घेऊ…

What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
narendra modi on economy
मोदी सरकारची १० वर्षे; भारतीय अर्थव्यवस्थेनं नेमकं काय कमावलं अन् गमावलं?
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Shikhar Dhawan and Mithali Raj Marriage Talks
‘मी मिताली राजशी लग्न करत आहे…’, शिखर धवनचा मोठा खुलासा, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण?
mrunal dusanis says live in america is more difficult than India
“अमेरिकेत राहणं खूप अवघड”, चार वर्षांनी भारतात आलेल्या मृणाल दुसानिसने सांगितलं परदेशातील राहणीमान, म्हणाली…
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kiran Mane Said About Manusmruti?
“सुंदर स्त्री हीन जातीतली असली तरी तिला भोगण्यात…”, ‘मनुस्मृती’तलं वाक्य सांगत किरण मानेंची खरमरीत पोस्ट
प्रत्येक कान फिल्म फेस्टिवलमध्ये भारतीय कलाकारांचे पोशाख चर्चेचा विषय ठरतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेही वाचा : Watermelon at Cannes: हमास-इस्रायल युद्धादरम्यान कलिंगड कसे ठरले पॅलेस्टाईन एकतेचे प्रतीक?

कान फिल्म फेस्टिवलचा इतिहास

१९३८ मध्ये युरोपमध्ये युद्ध सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वी व्हेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्यासाठी काही देश इटलीमध्ये जमले. १९३६ बेनिटो मुसोलिनी आणि ॲडॉल्फ हिटलर यांनी आपल्या आवडत्या कलाकारांना पुरस्कार देण्यासाठी व्हेनिस फिल्म फेस्टिवलची सुरुवात केली होती. इटलीवर बेनिटो मुसोलिनी आणि जर्मनीवर ॲडॉल्फ हिटलर यांचे राज्य असताना या महोत्सवाची सुरुवात झाली होती. या महोत्सवात अमेरिका आणि युरोपमधील काही देश सहभागी झाले होते.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्याची वेळ आली, तेव्हा परीक्षकांचे अमेरिकन चित्रपटाच्या निवडीवर एकमत होते. “पण हिटलरच्या दबावाखाली दिग्दर्शक लेनी रीफेनस्टाहलचा नाझी प्रोपगंडा चित्रपट ऑलिंपिया आणि लुसियानो सेरा या इटालियन चित्रपटाला पुरस्कार देण्यात आला,” असे त्यांच्या वेबसाइटवर लिहिलेले आहे. रिफेनस्टाहलने हिटलरच्या नाझी राजवटीसाठी प्रोपगंडा चित्रपट तयार केले होते. युरोप, अमेरिका व फ्रान्सने याला विरोध केला. फ्रेंच प्रतिनिधी फिलिप एर्लांगर यांनी नंतर पर्याय म्हणून फ्रेंच महोत्सव सुरू करण्याची योजना आखली.

फ्रान्सचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री जॉर्जेस बोनेट यांना फ्रँको-इटालियन संबंधांवर परिणाम होईल अशी चिंता होती. परंतु, शिक्षणमंत्री जीन झे व गृहमंत्री अल्बर्ट सर्राउट यांनी युरोपसाठी चित्रपट महोत्सवाच्या कल्पनेला पाठिंबा दिला आणि यावर राजकीय प्रभाव राहणार नाही, असे सांगितले. अशा प्रकारे १९३९ मध्ये अमेरिकेसारख्या देशांच्या पाठिंब्याने उत्सव घोषित करण्याची तयारी करण्यात आली. वादात असलेल्या शहरांपैकी कान हे फ्रान्सच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील शहर होते; जे रिसॉर्ट टाउन म्हणून निवडले गेले.

कान फिल्म फेस्टिवलमध्ये सुनील दत्त आणि नर्गिस दत्त (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

परंतु, युरोपमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावामुळे महोत्सवाला १९४६ पर्यंत पुढे ढकलण्यात आले. अखेर दुसरे महायुद्ध संपल्यानंतर कान फिल्म फेस्टिवल यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. पहिल्याच महोत्सवाला कर्क डग्लस, सोफिया लॉरेन, ग्रेस केली, ब्रिजिट बार्डॉट, कॅरी ग्रँट, जीना लोलोब्रिगिडा व चित्रकार पाब्लो पिकासो यांसारखे तारे उपस्थित होते. त्यात १९ देशांचा आणि आंतरराष्ट्रीय परीक्षकांचा समावेश होता.

‘कान’मध्ये काय होते?

‘अमेरिकन प्रेस’ (एपी)ने दिलेल्या वृत्तानुसार या महोत्सवात चित्रपटाचे प्रीमियर आणि स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन केले जाते. त्यामध्ये मीडिया सदस्य आणि सामान्य लोकांना संपूर्ण कार्यक्रमांमध्ये मर्यादित प्रवेश असतो. कार्यक्रमाची आमंत्रणे मर्यादित सदस्यांनाच असतात. ‘कान’मध्ये रात्री दोन किंवा तीन प्रीमियरचे आयोजन केले जाते. त्यासाठी ज्यांच्या चित्रपटाचा प्रीमियर आहे, ते कलाकार दिग्दर्शकांबरोबर रेड कार्पेटवर दिसतात. आजूबाजूला मोठ्या संख्येने रिपोर्टर असतात. बर्‍याच चित्रपटांच्या प्रीमियरला रिपोर्टर नसतात. त्याऐवजी चित्रपट निर्माते व कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रीमियरच्या दुसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलतात.

कान फिल्म फेस्टिवल इतका लोकप्रिय कसा झाला?

सुरुवातील कान फिल्म फेस्टिवलमध्ये चित्रपटांव्यतिरिक्त मनोरंजनाच्या अनेक पर्यायांचा समावेश होता. समुद्रकिनाऱ्यावर परेड, फटाक्यांची आतषबाजी आणि हवेत कबुतरे सोडण्यासारख्या अनेक गोष्टी केल्या जायच्या. आजकाल बक्षीस वितरणाव्यतिरिक्त संपूर्ण महोत्सवात चित्रपटांचे प्रदर्शन, मैफिली व रेड कार्पेट यांसारखे इतर सामाजिक कार्यक्रम असताता. या कार्यक्रमांचा लाभ केवळ निमंत्रितांनाच घेता येतो.

कान फिल्म फेस्टिवलमध्ये विविधता आहे. इथे जगाच्या प्रत्येक भागातील प्रसिद्ध कलाकार येतात. एकाच ठिकाणी जगातील प्रतिष्ठित व्यक्ती, कलाकार येत असल्याने हा महोत्सव जगप्रसिद्ध झाला, असे ‘कान’च्या वेबसाइटवर लिहिले आहे. अभिनेत्री ऐश्वर्या राय २००२ मध्ये तिच्या देवदास या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी प्रथम या फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. तेव्हापासून ती ब्युटी ब्रॅण्ड लॉरियलची ग्लोबल अ‍ॅम्बेसिडर म्हणून हजेरी लावते.

अभिनेत्री ऐश्वर्या राय २००२ मध्ये तिच्या देवदास या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी प्रथम या फेस्टिवलमध्ये सहभागी झाली होती. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

चित्रपटांची निवड कोण आणि कशी करतात?

१९५५ मध्ये चित्रपट उद्योगातील परदेशी ख्यातनाम व्यक्तींचा समावेश असलेल्या परीक्षकांनी महोत्सवातील सर्वोच्च पारितोषिक म्हणून पहिला पाल्मे डी’ओर पुरस्कार दिला. टॅक्सी ड्रायव्हर, एपोकॅलिप्स नाऊ, पल्प फिक्शन व पॅरासाइट यांसारख्या काही आयकॉनिक चित्रपटांना आतापर्यंत हा पुरस्कार मिळाला आहे. त्यात चेतन आनंद दिग्दर्शित १९४६ चा ‘नीचा नगर’ हा पहिला व एकमेव भारतीय चित्रपट होता; ज्याचा श्रेणीत समावेश झाला. १९८० च्या दशकापर्यंत परीक्षणासाठी फिलिपिन्स, चीन, क्यूबा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड व अर्जेंटिना या देशांना आमंत्रित केले गेले. २०२२ मध्ये भारतीय चित्रपट निर्माते शौनक सेन यांचा ऑस्कर-नामांकित माहितीपट ‘ऑल दॅट ब्रीद्स’ने गोल्डन आय पुरस्कार जिंकला.

हेही वाचा : अकरावी बारावीत आता इंग्रजीची सक्ती नाही; काय आहे नवीन अभ्यासक्रम आराखडा?

गेल्या वर्षी सौदी अरेबियाने तेल व्यवसायाव्यतिरिक्त संस्कृती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी अनेक चित्रपटांना पाठिंबा दिला. जॉनी डेप अभिनीत फ्रेंच दिग्दर्शक मायवेनचा चित्रपट ‘Jeanne du Barry’ हा या चित्रपटांपैकी एक होता आणि त्याचा प्रीमियर कान येथे झाला.

लैंगिक गैरवर्तनाची प्रकरणे अधोरेखित करणाऱ्या #MeToo चळवळीचाही या महोत्सवाला फटका बसला. माजी फ्रेंच अभिनेत्री ॲडेल हेनेल यांनी एका पत्रात खुलासा केला की, फ्रेंच सिनेमाच्या संस्थांपैकी एक असलेल्या ‘कान’चे प्रमुख बलात्कारी आहेत आणि त्यांचा बचाव केला जात आहे. अभिनेत्री ॲडेल हेनेलने त्यानंतर चित्रपटसृष्टी सोडली. फेस्टिवलचे प्रमुख थियरी फ्रेमॉक्स यांनी अभिनेत्रीचे दावे फेटाळले; परंतु शोषण आणि छळाचा आरोप असलेल्या कलाकारांना आमंत्रण दिल्याबद्दल भूतकाळातही महोत्सवाला इतर चिंतायुक्त बाबींचा सामना करावा लागला.