मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आरक्षणाच्या निमित्ताने जातीपातींचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून हिंदू वगळता इतर धर्मियांमध्येही जातीव्यवस्था आहे का आणि कशी यावर आता नव्याने चर्चेला सुरुवात झाली आहे. या निमित्ताने मुस्लीम धर्मियांमध्ये असलेल्या जातींचा घेतलेला हा संशोधनपर आढावा.

अहमद अली यांच्या ‘ट्वायलाइट इन दिल्ली’ (१९४०) या कादंबरीत तत्कालीन दिल्लीचे लालित्यपूर्ण चित्रण रंगविण्यात आलेले आहे. मुख्यतः या कथानकात २० व्या शतकाच्या सुरुवातीच्या कालखंडातील मुस्लीम मोहल्ल्याचे वर्णन आहे. मुघलांच्या शेवटच्या राजवटीतील दिल्लीत असलेल्या मुस्लीम समाजाभोवती हे कथानक फिरते. अली यांच्या कथेतील पात्रे दक्षिण आशियातील मुस्लीम समाजातील जातीभेदावर भाष्य करतात. असगर हा या कथनातील मुख्य पात्र आहे, तो बिल्किस नामक निम्न जातीच्या मुलीच्या प्रेमात पडतो. बिल्किसच्या जातीमुळे असगरचे वडील त्यांच्या लग्नाला नकार देतात. वेगेवेगळ्या जाती, वंश अरबस्थानमधून भारतात स्थलांतरित झाले होते. असगरच्या वडिलांना ते सैय्यद असल्याचा आणि पैगंबर महम्मदांचे थेट वंशज असल्याचा गाढा अभिमान होता. याच पार्श्वभूमीवर मुस्लीम समाजातील जातव्यवस्था नक्की काय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे ठरावे.

robber bride
महिलेने केले ३२ पुरुषांशी लग्न, कुठल्याच नवऱ्याबरोबर मधुचंद्र नाही, कारण ऐकून धक्का बसेल
Navpancham Yog 2024
Navpancham Yog 2024 : १०० वर्षानंतर गुरू अन् केतू निर्माण करणार नवपंचम योग, ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा?
Rambhau Ingole, Vimalashram,
विमलाश्रमच्या रामभाऊ इंगोले यांना आर्थिक मदतीची गरज, दानशूर व्यक्तींना आवाहन
family court, judicial system,
कुटुंब सांधणारी न्यायसंस्था…
Sam Pitroda resign
“दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन लोकांसारखे दिसतात”, सॅम पित्रोदांचे वादग्रस्त विधान
Review of Mahesh Elkunchwars play Aatmakatha
‘ती’च्या भोवती..! सामान्याकडून असामान्याकडे!
dri arrested two with foreign currency worth 1 5 crore
दीड कोटींच्या परदेशी चलनासह दोघांना अटक -डीआरआयची कारवाई
Father-daughter love
बाप असावा तर असा…! लेकीच्या घटस्फोटानंतर वाजत-गाजत आणलं घरी! वडिलांच्या ‘या’ कृतीचा समाजाने का घ्यावा आदर्श?

अधिक वाचा: इंडोनेशियातील निवडणूक जगासाठी महत्त्वाची का?

मुस्लीम धर्मातील जातव्यवस्था हिंदू धर्मापेक्षा वेगळी आहे का?

आपण दक्षिण आशियासंदर्भात चर्चा करतो, त्या वेळेस प्रामुख्याने हिंदूंमधील जातिव्यवस्थेचा उल्लेख प्रकर्षाने करण्यात येतो. परंतु समाजशास्त्रीय संशोधनानुसार भारतातील मुस्लीम समाजात देखील जातीव्यवस्था आढळते. ही व्यवस्था हिंदू धर्मातील जातिव्यवस्थेपेक्षा भिन्न आहे. १९६७ मध्ये राजकीय- समाजशास्त्र विषयाचे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) प्राध्यापक इम्तियाज अहमद यांनी नमूद केल्याप्रमाणे मुस्लिमांमधला सामाजिक दर्जा आणि जातिव्यवस्था ही हिंदूंप्रमाणे शुद्ध-अशुद्धतेच्या आधारावर ठरत नव्हती. तर समाजातील विशेषाधिकार आणि वर्तणूक यांवरून मुस्लिमांमधील जातीव्यवस्था ठरत असे.

समाजशास्त्राचे अभ्यासक खालिद अनीस अन्सारी मुस्लिमांमधील जातीव्यवस्थेबाबत म्हणतात, ‘मूळ समस्या जातींच्या धार्मिकीकरणाची आहे, त्यामुळे जात ही हिंदू किंवा मुसलमान या चष्म्यातून पाहिली जाऊ नये’. शिवाय धर्मग्रंथाने समानतेला मान्यता दिलेली असताना इस्लामिक चौकटीत जात आली कशी हे समजून घेण्यासाठी धर्माचे आजच्या चालू परिस्थितीतील संदर्भ जाणून घेणे गरजेचे ठरते. प्रत्येक धार्मिक ग्रंथाचा अनुवाद हा वेगवेगळा असतो, मुख्यतः तो धर्मग्रंथ कुठल्या भागातील आहे त्यावर ते ठरते, प्रत्येक धार्मिक मजकूर ज्या प्रदेशात कार्यरत आहे त्यानुसार त्याचा वेगळा अर्थ लावला जातो.” परंतु, असे काही जण आहेत जे मुस्लिमांमधील जातीचे अस्तित्व नाकारतात. परंतु असे मानणे म्हणजे आधीच विखुरलेल्या समुदायाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहण्यासारखे आहे. मूलतः हिंदू- दलित ज्या समस्यांना सामोरे जात आहेत तो भाग वेगळा आहे, त्यामुळे मुस्लीम समाजातील जातींचा उल्लेख हा जात असा करण्यापेक्षा बिरादारी असा करणे अधिक श्रेयस्कर ठरणारे आहे असे युसूफ अन्सारी यांना वाटते.

इस्लाममधील जात व्यवस्था… नक्की परिणाम कोणाचा?

इम्तियाज अहमद यांनी जात समजून घेण्यासाठी भारतीय मुस्लिमांमध्ये आढळणाऱ्या दोन परस्पर विरोधी दृष्टिकोनांचा उल्लेख आपल्या संशोधनात केला आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे मुस्लिमांमधील जात व्यवस्था हिंदूंच्या प्रभावातून आली आहे, भारतातील मुस्लीम मोठ्या संख्येने हिंदूंमधून धर्मांतरित झाल्याने त्यांची पूर्वीची जातव्यवस्था इस्लाममध्ये आलेली आहे. तर दुसऱ्या मुद्द्यानुसार इस्लाम पर्शियातून प्रवास करत असतानाच त्याने सामाजिक श्रेष्ठत्त्वाची कल्पना आत्मसात केली. यावरून असे दिसून येते की, इस्लाममधील जात व्यवस्था ही केवळ हिंदूंचा प्रभाव नसून सामाजिक स्तरीकरणाचा एक प्रकार आहे, जो इस्लाममध्ये इतर मुस्लीम संस्कृतींशी आधीच आलेल्या संपर्कामुळे स्वीकारला गेला.

जातीचे अस्तित्व समजून घेण्यासाठी इस्लामिक समाजाच्या मूळ स्वरूपावर भर देणारे इतरही अनेक अभ्यासक आहेत. त्यात प्रामुख्याने रेमी डेलार्ज यांचा उल्लेख येतो. रेमी डेलार्ज यांनी “मुस्लीम कास्ट इन इंडिया ” या लेखात नमूद केल्याप्रमाणे, “हे लक्षात ठेवले पाहिजे की ७ व्या शतकात पैगंबरांचा उत्तराधिकार मिळविण्याचा वाद हा कुटुंब, जमात आणि त्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय शत्रुत्वावर आधारित होता. तेव्हापासून पैगंबरांच्या जवळचे कुटुंब, कूळ किंवा जमात हे अरब समाजातील सामाजिक भेदाचे निकष ठरले. जेव्हा भेदाचे हे निकष अरब प्रदेश सोडून बाहेर गेले, विशेषतः आठव्या शतकात भारतात आले त्यावेळी अरब आणि गैर-अरब अशा नवीन सामाजिक भेदाची निर्मिती झाली. आणि याचीच परिणती पुढे जाऊन इस्लामिकरणाच्या पहिल्या लाटेतील धर्मांतरित आणि दुसऱ्या लाटेतील धर्मांतरित अशाही भेदात झाली.

दक्षिण आशियात मुस्लिमांमधील तीन मुख्य गट

दक्षिण आशियात मुस्लिमांमधील तीन मुख्य सामाजिक गट उदयास आले, त्यात अश्रफ, अजलाफ आणि अरझल यांचा समावेश होतो. रेमी डेलाज यांनी नमूद केल्याप्रमाणे १३ व्या शतकापासून जेव्हा दिल्ली सल्तनतने या प्रदेशात राजकीय सत्ता स्थापन केली, तेव्हापासून ग्रंथांमध्ये या तीन मुख्य गटांचा उल्लेख होऊ लागला. इतकेच नाही तर या मुख्य गटांमध्ये लहान गट देखील आढळतात जे एकमेकांवर परस्परावलंबी असून आपल्या समाजामध्येच विवाह करतात. गटाबाहेर विवाह निषिद्ध मानतात.

अधिक वाचा: चीनचे परराष्ट्र मंत्री आफ्रिकेत? चीनच्या मनात नक्की आहे तरी काय?

अश्रफ- मुस्लिमांमधील उच्च वर्णीय

भारतीय मुस्लिमांमधील वरिष्ठ श्रेणीत अग्रस्थानी अरब, पर्शियन, तुर्की किंवा अफगाण वंशाचे अश्रफ किंवा कुलीन लोकांचा समावेश होतो. ते आपला संबंध प्रतिष्ठित वंशाशी असल्याचा दावा करतात. जे पैगंबरांशी आपला संबंध जोडतात, जसे की सय्यद पैगंबरांच्या मुलीशी नातेसंबंध असल्याचे सांगतात. “अश्रफांपैकी अनेकांचे हिंदूमधील उच्च जातीतून धर्मांतर झाले. ते सुद्धा पैगंबरांचे वंशज असल्याचा दावा करतात, हे सिद्ध करणे कठीण असले तरी त्यांच्याकडून हा दावा करण्यात येतो,” असे समाजशास्त्राचे अभ्यासक तन्वीर फझल नमूद करतात. हिंदूंमधील बहुतांश निम्न वर्गीय लोकांनीच इस्लाम स्वीकारला असे मानले जात होते. परंतु अभ्यासकांनी नमूद केल्याप्रमाणे यात उच्च वर्णियांचाही समावेश होता, किंबहुना इस्लाममधील जातीव्यवस्था टिकवून ठेवण्यामागे त्यांनीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मूलतः धर्मांतराची कारणे बहुआयामी आणि किचकट होती. “मुघल राजवटीत, उच्च आणि मध्यम वर्गांमध्ये अभिजनांचा भाग होण्यासाठी राज्यकर्त्यांच्या परंपरा आणि प्रथा स्वीकारण्याची प्रवृत्ती होती. ब्रिटीश राजवटीत भारतीय उच्चभ्रूंच्या एका वर्गाने स्वत:ला पाश्चिमात्य ठरविण्यासाठी अशाच प्रकारे पद्धत अवलंबल्याचे,” फझल सांगतात. किंबहुना अन्सारी नमूद करतात, “उत्तर प्रदेशातील गौर ब्राह्मणांपैकी अनेकांनी इस्लाम स्वीकारला.” त्यागी समाजातील धर्मांतरित लोकांना तागा मुस्लीम म्हणून ओळखले जाते.” शेरवानींप्रमाणे अनेक राजपूत कुळांनी इस्लाम स्वीकारला आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या जातीच्या संकल्पनाही नवीन धर्मात आणल्या.

“द म्युझिक रूम” या पुस्तकात लेखिका नमिता देवीदयाल यांनी जयपूर घराण्याचे संस्थापक अल्लादिया खान यांच्या धर्मांतराची कथा दिलेली आहे. अल्लादिया खान यांचे कोणी एक पूर्वज दरबारी संगीतकार आणि दिल्लीजवळील अनुप शहर नावाच्या छोट्या संस्थानाचे मुख्य हिंदू पुजारी होते. हा कालखंड मुस्लीम पातशहांच्या विस्ताराचा होता. अनुप संस्थानाचा राजा दिल्ली बादशहाकडून ज्या वेळेस पकडला गेला, त्यावेळी राज्याच्या दरबारी संगीतकाराने दिल्लीपर्यंत प्रवास करून सम्राटासमोर सादरीकरण केले, त्याच्या प्रभावी कामगिरीबद्दल बक्षीस म्हणून आपल्या राजाला सोडण्याची मागणी केली. बादशहाने इस्लाम स्वीकारण्याच्या अटीवर राजाला सोडण्याची सहमती दर्शवली. देवीदयाल लिहितात, “संरक्षणाच्या कारणास्तव” अल्लादिया खान यांचे पूर्वज धर्मांतरित झाले, इतकेच नाही तर खान यांच्यासारख्या अनेक व्यावसायिक संगीतकारांचा यात समावेश आहे.

अजलाफ

मुस्लिमांमधील सामाजिक स्तरातील दुसऱ्या स्तरावर येणारा वर्ग म्हणजे अजलाफ. हा अश्रफांपेक्षा वेगळा आहे. यांचा दर्जा इस्लाम स्वीकारणाऱ्यांचे वंशज म्हणून आहे. अन्सारी आणि जुलाहा यांसारख्या जातींचा समावेश या वर्गात होतो. मुख्यत्त्वे या गटात विणकर, शेतकरी, व्यापारी इत्यादी व्यावसायिक गटांचा समावेश होतो.

अरझल

मुस्लिमांच्या सामाजिक स्तरातील सर्वात खालच्या स्तरात अरझल या गटाचा समावेश होतो. मुख्यतः धोबी, केशकर्तन करणारे आणि तत्सम हिंदूंमधील अस्पृश्यांमधून धर्मांतरित झालेल्या समूहाचा समावेश यात होतो. डेलार्ज यांनी नमूद केल्याप्रमाणे भारतात सर्वत्र या तीन गटांप्रमाणे विभाजन आढळत नाही. काश्मीर आणि उत्तर प्रदेशमध्ये हे तीन गट त्यांच्या बोलीभाषेचा भाग नाहीत. दुसरीकडे केरळमध्ये, मलबारमधील मोपला हे थांगल, अरबी, मलबारीस, पुसालर्स आणि ओसन्स नावाच्या पाच श्रेणींमध्ये विभागले गेले आहेत. त्यामुळे भारतातल्या प्रांतिक भेदानुसार मुस्लीम समाजातील जात व्यवस्थेत भिन्नता आढळून येत असल्याचे निदर्शनात येते.