नागरिकत्व हा कोणत्याही देशाच्या संविधानाचा महत्त्वाचा पैलू आहे. नागरिकत्वाचा मुद्दा महत्त्वाचा यासाठीही आहे, कारण त्यावरून संबंधित देशात राहणाऱ्या व्यक्तीचा कायदेशीर दर्जा आणि अधिकार ठरतात. भारताबाहेर जन्मलेली मुले काही विशिष्ट अटींनुसार भारतीय नागरिकत्वासाठी पात्र ठरू शकतात. पण, या अटी नागरिकत्व कायदा १९५५ नुसार ठरवल्या आहेत. मुलाचा जन्म आणि जन्माचे वर्ष भारतीय अधिकाऱ्यांकडे नोंदवले आहे की नाही यावर या अटी अवलंबून असतात.

भारताबाहेर जन्मलेले मूल आपोआप भारतीय नागरिक ठरते का?

नाही. मुलाच्या जन्माच्या वेळी त्याच्या पालकांपैकी किमान एक जण भारतीय नागरिक असेल आणि त्या मुलाचा जन्म भारतीय दूतावासात ठराविक कालावधीत नोंदवलेला असेल, अशावेळी भारताबाहेर जन्मलेल्या मुलाला आपोआप भारतीय नागरिकत्व मिळते.

जन्माच्या वर्षांवर आधारित नियम काय?

नागरिकत्वाची पात्रता ही जन्माच्या वर्षावर अवलंबून आहे.
३ डिसेंबर २००४ च्या आधीचा जन्म- मुलाच्या जन्माच्या वेळी एक पालक भारतीय असेल तर मूल भारतीय नागरिकच असेल.

३ डिसेंबर २००४ ते ९ डिसेंबर २०१५ दरम्यान जन्मलेली मुले- मुलाच्या जन्माच्यावेळी त्याच्या एका पालकाचे भारतीय नागरिकत्व असणे गरजेचे आहे. त्या मुलाचा जन्म एका वर्षाच्या आत भारतीय वाणिज्य दूतावासात नोंदवणे आवश्यक आहे.

१० डिसेंबर २०१५ नंतर जन्मलेली मुले- जेव्हा मुलाचे दोन्ही पालक भारतीय नागरिक असतील किंवा एक पालक भारतीय नागरिक असेल आणि दुसरा पालक भारतात बेकायदा राहत नसेल तेव्हाच मुलाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. अशा प्रकरणातही जन्माच्या एका वर्षाच्या आत वाणिज्य दूतावासात नाव नोंदवणे बंधनकारक आहे.

परदेशात जन्मलेल्या मुलाची नोंदणी कशी करावी?

पालकांनी मुलाच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत जवळच्या भारतीय वाणिज्य दूतावासात अर्ज करावा लागतो. हा अर्ज फॉर्म I या नावाने मिळतो आणि त्यासोबत काही कागदपत्रेही सादर करावी लागतात. जन्माचा दाखला, दोन्ही पालकांचे पासपोर्ट फोटो, भारतीय नागरिकत्वाचे पुरावे आणि आवश्यकतेनुसार प्रतिज्ञापत्र आणि घोषणापत्र या कागदपत्रांची प्रामुख्याने गरज लागते.

जन्मानंतरच्या एक वर्षाची मुदत चुकली तर काय?

एका वर्षानंतर जन्म नोंदणीसाठी भारत सरकारची विशेष परवानगी घेणे आवश्यक असते. मात्र, ही परवानगी मिळेलच की नाही याची खात्री देता येत नाही.

भारतीय नागरिकत्व कायदा नेमकं काय सांगतो?

  • परदेशात जन्मलेलं मूल काही अटींविना भारतीय नागरिक ठरू शकत नाही
  • काही अटी पूर्ण झाल्यावरच नागरिकत्व मिळू शकतं
  • पालकांपैकी एक जण भारतीय नागरिक असणे गरजेचे
  • मुलाच्या जन्मावेळी किमान एक पालक भारतीय नागरिक असणं गरजेचं
  • मुलाचा जन्म भारतीय दूतावासात एक वर्षाच्या आत नोंदवणे अनिवार्य आहे
  • नोंदणी न झाल्यास विशेष परवानगीची आवश्यकता असते
  • जन्माच्या तारखेनुसार नियम वेगवेगळे
  • भारतात दुहेरी नागरिकत्वाची परवानगी नाही
  • दुसऱ्या देशाचं नागरिकत्व घेतल्यास भारताचं नागरिकत्व रद्द होऊ शकतं
  • भारतीय नागरिकत्व शक्य नसल्यास ओसीआय कार्डचा पर्याय असतो

मुलाला दुहेरी नागरिकत्व मिळू शकते का?

भारत दुहेरी नागरिकत्वाची परवानगी देत नाही. जर मुलाला जन्माच्या वेळी दुसऱ्या देशाचे नागरिकत्व मिळाले असेल तर त्याला पूर्ण भारतीय नागरिकत्व न मिळता ओसीआय (ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया) हे कार्ड मिळू शकते.

ओसीआय हा पर्याय वापरता येतो का?

जर तुमच्या मुलाकडे परदेशी नागरिकत्व असेल आणि तुम्हाला भारताशी संबंध टिकवून ठेवायचा असेल तर तो पात्र ठरल्यानंतर त्याच्यासाठी ओसीआय कार्डसाठी अर्ज करता येतो. हे कार्ड भारतात आजीवन व्हिसा-मुक्त प्रवास, वास्तव्य आणि काही मर्यादित अधिकारांसाठी परवानगी देते.

ओसीआय आणि भारतीय नागरिकत्व यात फरक काय?

ओसीआय (ओव्हरसिज सिटिझन ऑफ इंडिया) दर्जा अनेक सुविधा देतो. मात्र, तो भारतीय नागरिकत्वाप्रमाणे संपूर्ण अधिकार देत नाही